esakal | Viral Satya : बंद बॅगेतून 5 महिन्यांच्या बाळाचा 1180 किमी प्रवास (Video)
sakal

बोलून बातमी शोधा

Viral Satya Video  five month old baby in a closed bag

तुम्ही जर ही बातमी पाहिली तर तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. 5 महिन्यांचं हे बाळ, बिचाऱ्या या बाळाला काय कळणार पण, पैशांच्या हव्यासापोटी तस्करानं काय केलंय बघा.

Viral Satya : बंद बॅगेतून 5 महिन्यांच्या बाळाचा 1180 किमी प्रवास (Video)

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

तुम्ही जर ही बातमी पाहिली तर तुमच्याही तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. 5 महिन्यांचं हे बाळ, बिचाऱ्या या बाळाला काय कळणार पण, पैशांच्या हव्यासापोटी तस्करानं काय केलंय बघा. सामानाप्रमाणेच या बाळाला प्रवासी बॅगेत कोंबलंय. बॅगेत बाळाला काही त्रास होऊ नये म्हणून बाजूला कपडे ठेवले. इतकंच नव्हे तर बाळाच्या डोक्यावर दोन छोटे छोटे स्टीलचे ग्लास ठेवले होते. आपल्यासोबत नक्की काय घडतंय? आपण कुठे आलोय? हे बाळाला काहीच कळत नव्हतं. बिचारं घाबरलेलं बाळ शांतपणे बॅगेत पडून होतं.

हा सगळा उपद्याप करून मानवी तस्करानं पाकिस्तानच्या कराचीतून दुबईपर्यंत सहज विमान प्रवास केला. इथंपर्यंत त्याला कुणीही विचारलंही नाही आणि आडवलंही नाही. सगळा प्लान याचा यशस्वी होत होता. पण, दुबईच्या एअरपोर्टवर मात्र, तस्कराची युक्ती त्याच्या अंगलट आली. सुरक्षा रक्षकांनी तस्कराची तपासणी केली आणि बॅग उघडली त्यावेळी तस्कराचा काळा चेहरा उजेडात आला. बिचारा हा चिमुरडा निरागसपणे बॅगेत पडून होता. पैशांसाठी तस्कर कोणत्या थराला जाऊ शकतील याचं हे जिवंत उदाहरण. पाकिस्तानच्या कराची एअरपोर्टवर जर बॅगेची नीट तपासणी केली असती तर बाळ दुबईपर्यंत पोहोचलं नसतं. पण,सुरक्षा रक्षकांनाही गंडवून तस्करानं बाळाला पळवलं. मात्र, बाळाचं नशीब चांगलं म्हणून तस्करी होण्याआधीच तस्कराला पोलिसांनी ताब्यात घेतलं. 

आता 5 महिन्यांच्या बाळाची सुखरुप सुटका झाली आहे. हे बाळ बॅगेत गुदमरलं असतं तर काय झालं असतं याचा विचार न केलेलाच बरा. पण, पैशांसाठी तस्कर कुणाच्याही जीवावर उठू शकतात हे या घटनेतून पाहायला मिळालंय.

***************************************************************

आणखी वाचा  : 

Viral Satya : नागिन डान्स केला आणि जीव गेला! (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : पाकिस्तानात एक्सरे मशीनमधून निघाली माणसं ! (Video)

Viral Satya : गाडी चालवताना झोप लागल्यास उठवणारं यंत्र? (Video)

Viral Satya : आता मिळणार तिखट टोमॅटो? (Video)

Viral Satya : मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी? (Video)

Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video)

Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video)

***************************************************************

loading image
go to top