बियाँड द क्लाऊडस् गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
बियाँड द क्लाऊडस् गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 
देश

बियाँड द क्लाऊडस् जगभरात आवडेल - ख्यातनाम इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी 

अवित बगळे

पणजी (गोवा) - बियाँड द क्लाऊडस् हा चित्रपट सार्वत्रिक भावणारा असून, प्रदर्शित झाल्यानंतर जगभरातल्या जनतेला हा विषय आवडेल. अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर हा अनुभव घेता आला, असे ख्यातनाम इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी यांनी येथे पत्रकार परिषदेत नमूद केले.

या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवास (इफ्फी) सुरुवात झाली.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2017च्या उद्‌घाटनपर सत्रात बियाँड द क्लाऊडस् हा चित्रपट दाखविण्यात आल्यानंतर या चित्रपटातले कलावंत इशान खट्टर, मालविका मोहनन्, निर्माता पुनित गोएंका, शरीन मंत्री, किशोर अरोरा, रेझा तश्कोरी आणि संजय कुट्टी यांच्यासह ख्यातनाम इराणी दिग्दर्शक माजिद माजिदी यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद घेण्यात आली.

मानवी मुल्ये, प्रेम, मैत्री आणि कौटुंबिक बंध यावर बियाँड द क्लाऊडस् हा चित्रपट आधारित आहे. मानवी भाव-भावनांना भाषा आणि भौगोलिक बंध नसतात हा माजिद माजिदी यांच्या दृष्टीकोनाचे दर्शन या चित्रपटात घडते. मुंबई महानगरात संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वाढत असलेल्या भाऊ-बहिणी भोवती हे कथानक फिरते.

बियाँड द क्लाऊडस् या चित्रपटासाठी निपुण भारतीय कलाकार आणि इतरांबरोबर काम करणे हा सुंदर अनुभव होता, असे माजिदी म्हणाले. इशान आणि मालविका यांनी भूमिकांना संपूर्ण न्याय देत आपापल्या भूमिका साकारल्या आहेत. 

माजिदी, अनिल मेहता, विशाल भारद्वाज आणि ए. आर. रेहमान यांसारख्या मान्यवरांबरोबर काम करणे हा उद्‌बोधक अनुभव होता यातून खूप शिकता आले अशी प्रतिक्रिया इशान खट्टर यांनी व्यक्त केली. चित्रपट-निर्माता म्हणून माजिद यांचा दृष्टीकोन साकार करण्याच्या हेतूने सर्वच जण काम करत असल्याचे ते म्हणाले.

बियाँड द क्लाऊडस्साठी एकत्रित काम करणे हा महान अनुभव असल्याचे सुजय कुट्टी यांनी सांगितले. जगभरातल्या लोकांना पहायला आवडेल अशी निर्मिती आम्हाला करायची होती. उद्‌घाटनपर कार्यक्रम उत्तम होता, लोकांनी आमच्या चित्रपटाची प्रशंसा केली. असे चित्रपट बनवायला आवडेल, असेही त्यांनी सांगितले.

माजिद माजिदी यांच्यासारखा महान चित्रपट-निर्माता रुपेरी पडद्यावर जी कलाकृती सादर करतो, ती अद्वितीय असते. या पडद्यावर चित्तवेधक भूमिका आणि कलाकार म्हणून आणखी आव्हानात्मक भूमिका साकारायला आपल्याला आवडेल, असे मालविका मोहनन् यांनी पत्रकार परिषदेत बोलतांना स्पष्ट केले. 48वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 28 नोव्हेंबर पर्यंत गोव्यात सुरु राहील. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे पहिल्यांदाच काँग्रेसला देणार मत; मतदानापूर्वी केली मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update: भाजपचे उमेदवार पराभूत होणार हे लक्षात आल्याने भाजप सरकारने कांदा निर्यातीचा निर्णय घेतला आहे- राजू शेट्टी

Majhyashi Nit Bolaycha Rap Song: अनीचा आळस आणि आईचा ओरडा; 'या' तरुणानं लिहिलेलं भन्नाट रॅप साँग सोशल मीडियावर घालतंय धुमाकूळ

Summer Trip: उन्हाळ्यात चेरापुंजीला फिरायला जाण्याता प्लॅन करत असाल तर 'या' ठिकाणांना नक्की भेट द्या

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीला दुसरा मोठा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले पॅव्हेलियनमध्ये

SCROLL FOR NEXT