Sena Divas esakal
देश

Sena Divas : आज भारताचा 75 वा सेना दिवस, जाणून घ्या याचे मूळ!

भारताला स्वतंत्र होऊन दोन वर्ष झालेली तरी सैन्यावर सेनापती ब्रिटिशच, मग झाले असं..

सकाळ डिजिटल टीम

Sena Divas : आज 15 जानेवारी, दरवर्षी 15 जानेवारी हा दिवस दरवर्षी ‘सेना दिवस’ म्हणून साजरा केला जातो. यंदा भारताचा 75 वा आर्मी डे आहे. ज्यांनी देशासाठी बलिदान दिले अशा सैनिकांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आजचा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो.

भारताची लष्करी परंपरा फार प्राचीन आहे. हिंदू धर्मानुसार, आपले सगळे देव हे शस्त्रधारी आहेत. विष्णू देवांनी सुदर्शन चक्र, महादेवांनी त्रिशूल तर आई जगदंबेने खड्ग धारण केल्याचे अनेक पुरावे पुराणात सापडतील. रामायण-महाभारत काळातले रथी, अतिरथी, महारथी हे महान योद्धे आपल्या सैन्याच्या मदतीने युद्ध करत होते. सम्राट चंद्रगुप्त, सम्राट विक्रमादित्य, सम्राट शांतिवाहन या दिग्विजयी राजांनी ग्रीक-शक-हूण-कुशाण अशा अनेक परकीय आक्रमक पराभूत करून पचवून टाकले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि बाजीराव पेशव्यांचा इतिहास तर तोंड पाठ आहे.

भूदल किंवा लष्कर हे कोणत्याही सैन्याचे सगळ्यात महत्त्वाचे अंग असते. अर्थात, नौदल आणि हवाईदल सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत पण भूदलाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण, आपल्या देशाची भूमी प्रत्यक्षात ताब्यात ठेवणं, तीच संरक्षण करणं हे काम भूदलच करत असतं. हवाईदल शत्रूची भूमी बॉम्बने उद्ध्वस्त करेल; नौदल शत्रूच्या व्यापाराची नाकेबंदी करेल. पण, शत्रूची भूमी ताब्यात घेण्याच काम भूदलच करते.

भूदलाचे विभाग

भूदलाचे मुख्यतः दोन विभाग असतात. पहिला झुंजी विभाग म्हणजे ‘कॉम्बॅट आर्म्स.’ यात इन्फन्ट्री, एअरबोर्न इन्फन्ट्री, मॅकेनाईल्ड इन्फन्ट्री, पॅराशूट रेजिमेंट, आर्मर्ड कोअर, एव्हिएशन कोअर, आर्टिलरी एअर, डिफेन्स आर्टिलरी, इंजिनिअर्स कोअर, सिग्नल कोअर असे उपविभाग असतात.

दुसरा विभाग म्हणजे मदतगार विभाग किंवा ‘सपोर्टिंग सर्व्हिसेस’ यात आर्मी कोअर मेडिकल, कोअर ऑर्डनन्स कोअर, इलेक्ट्रिकल अ‍ॅण्ड मेकॅनिकल कोअर मिलिटरी पोलीस हे उपविभाग असतात. झुंजी विभागइतकाच मदतगार विभागही महत्त्वाचा असतो.

भारताच लष्कर

स्वतंत्र्य भारताच्या आजच्या अत्याधुनिक लष्कराचा पाया इंग्रजी राजवटीत घातला गेला. इंग्रजी ‘ईस्ट इंडिया’ कंपनीने पगारी सैनिक म्हणून मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक आपल्या सैन्यात भरती केले. इंग्रजी सेनापतींच्या तालमीत या जवानांना युरोपातले अत्याधुनिक युद्धतंत्र शिकवले गेले होते.

मूळचाच शूर असलेला भारतीय सैनिक आधुनिक युद्धतंत्रात पारंगत झाल्यावर युरोपियानांनाही भारी पडला याचा पहिला प्रत्यय 1914 ते 1918च्या पहिल्या महायुद्धात आला. इंग्रजी सैन्याच्या टोळीने माघार घेतलेल्या रणभूमीत जेव्हा भारतीय टोळी उतरवली गेली तेव्हा या टोळीने संयम, चिकाटी आणि योग्य वेळी जबरदस्त आक्रमण यांचा मिलाफ करून समोरच्या जर्मन सैन्याला माघार घ्यायला लावली.

ही घटना फ्रान्समध्ये घडली. फ्रेंच जनता भारतीय सैनिकांच्या या पराक्रमावर एवढी खूश झाली की, यानंतर कुठेही भारतीय सैनिक दिसले की, ‘हिंदू आले, हिंदू आले’ या शब्दांनी त्यांचे स्वागत केले जात असे.

लेफ्टनंट जनरल शंकरराव पाटील-थोरात यांनी आपल्या आत्मचरित्रात एक सुंदर किस्सा सांगितला आहे, इंग्लंडच्या ‘सँडहर्स्ट मिलिटरी अकॅडमी’तून आपले प्रशिक्षण पूर्ण करून थोरात भारतात परत येत होते. त्यांच्याच जहाजात योगायोगाने लाला लजपतरायही होते. दोघांची तिथे मैत्री झाली. लालाजींच्या व्यक्तिमत्त्वाने तरुण थोरात अगदी भारावून गेले.

ते लालाजींना म्हणाले, “भारतात पोहोचल्यावर मी ही इंग्रजांची नोकरी सोडून देतो आणि तुमच्या सोबत स्वातंत्र्य आंदोलनात येतो.” त्यावर लालाजी उतरले, “छे: छे:! अहो, हा इंग्रज आज ना उद्या भारतातून जाणारच आहे. त्यानंतर स्वतंत्र भारताला तुमच्यासारख्या कुशल, तरबेज सेनानायकांची अत्यंत गरज आहे. तेव्हा, त्या क्षणावर दृष्टी ठेवून तुमची गुणवत्ता सतत वाढवीत राहा.

1947ची कसोटी

इंग्रजांच्या सैन्यातली भारतीय टोळी आपली गुणवत्ता वाढवत होती, याचा प्रत्यय स्वातंत्र्यानंतर लगेचच आला. कारण, काश्मीर हिसकून घेण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने टोळीवाल्यांच्या वेशात काश्मीरवर आक्रमण केले.

दुसर्‍या महायुद्धात गाजलेले ब्रिटिश सेनानी जनरल क्लॉड ऑकिनलेक हे यावेळी भारताचे सरसेनापती होते. पण, ते निवृत्तीच्या वाटेवर होते. त्यामुळे अतिशय त्वरेने लेफ्टनंट जनरल करिअप्पा यांना लष्कराच्या पश्चिम विभागात प्रमुख पदावर आणण्यात आले.

करिअप्पा वेगाने कामाला लागले. फाळणीमुळे सैन्याची रचना विस्कळीत झाली होती. साधनसामग्री अपुरी होती पण तरीही पाकिस्तानी सैन्याने जवळजवळ पूर्ण गिळलेले काश्मीरचे माणिक त्यांनी पराक्रमाची शर्थ करून परत मिळवले.

अखेर 1949 मध्ये जनरल रॉय बुचर यांना नारळ देऊन जनरल कोदंडेरा मदाप्पा करिअप्पा हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय सरसेनापती बनले. तो दिवस दि. 15 जानेवारी, 1949 चा होता. यादिवसाची आठवण म्हणून सैन्य दिन आज साजरा केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T Raja Singh Resignation : ‘’आजच्याच दिवशी बरोबर ११ वर्षांपूर्वी मी...’’ ; भाजपने राजीनामा मंजूर करताच टी.राजा भावनिक!

Pune: सूपमध्ये झुरळ सापडले; पण तक्रारीकडे हॉटेल व्यवस्थापनाचे दुर्लक्ष, नंतर महिलेनं...; पुण्यातील खळबळजनक घटना

IND vs ENG 3rd Test: KL Rahul ने झेल सोडला! शुभमन गिल अम्पायरसोबत भांडला; Umpire ने मागे ढकलले अन् म्हणाले, जा...

Hinjewadi Electric Supply : हिंजवडीतील वीजपुरवठा ७२ तासांनी पूर्वपदावर; नागरिकांकडून सुटकेचा निःश्वास

World Record Internet Speed: इंटरनेट स्पीडचा वर्ल्ड रेकॉर्ड! 10,000 पेक्षा जास्त 4K सिनेमे एका क्षणात झाले डाउनलोड, कुठे घडला हा चमत्कार?

SCROLL FOR NEXT