Afternoon_7.jpg
Afternoon_7.jpg 
देश

राष्ट्रवादीबाबत अमित शहांची प्रतिक्रिया ते पुण्यात भाजप आक्रमक, वाचा एका क्लिकवर

सकाळवृत्तसेवा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या तामिळनाडु दौऱ्यावर आहेत. पाच राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांचे प्रचार दौरे सुरु आहेत. या प्रचार दौऱ्यावेळी दिलेल्या मुलाखतीत अमित शहांनी शरद पवार यांच्यासोबत भेटीच्या चर्चेवर तसंच महाराष्ट्रातील कोरोनाच्या परिस्थितीबद्दल भाष्य केलं आहे. पुणेकरांची गैरसोय पीएमपीची बससेवा बंद असल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. 'आम्हाला सरकारला सहकार्य करायचे आहे, राजकारण करायचे नाही, असे भाजपने म्हटले. यासह महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

आता पाच राज्यांच्या निवडणुका सुरु असून त्याचे निकाल 2 मे रोजी लागणार आहेत. त्यानंतर भाजपचं मिशन महाराष्ट्र सुरु होणार का? असा प्रश्न अमित शहांना मुलाखतीत विचारण्यात आला होता. वाचा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आसाममध्ये तामुलपूरमध्ये एका रॅलीमध्ये प्रचारसभेसाठी पोहोचले आहेत. यावेळी प्रचारसभेत बोलत असताना एका व्यक्तीची तब्येत बिघडल्याचं त्यांना दिसलं. तेव्हा पंतप्रधानांनी भाषण थांबवून व्यासपीठावरूनच त्यांच्यासोबत आलेल्या मेडिकल टीममधील डॉक्टरांना त्या व्यक्तीच्या उपचारासाठी पाठवलं. वाचा सविस्तर

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वात हायप्रोफाइल मतदारसंघ नंदीग्राममध्ये मतदान झाले. या मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि एकेकाळी त्यांचे निकटचे सहकारी राहिलेले आणि नुकताच भाजपत सामील झालेले सुवेंदू अधिकारी यांच्यात काट्याची लढत पाहायला मिळाली. वाचा सविस्तर

आपण डॉक्टरांना देव मानतो. कारण, अनेकदा तेच माणसाला मृत्यूच्या दाढेतून परत आणतात. त्यामुळे डॉक्टरांना देवदूत म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाही. रशियातही डॉक्टरांच्या या रुपाचं दर्शन झालं. वाचा सविस्तर

ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी (दि.3) सकाळी शरद पवार हे रुग्णालयातून घरी परतले. वाचा सविस्तर

पीएमपीएल बस सेवा बंद केल्याने पुणेकरांची गैरसोय  होत असून भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली स्वारगेट पीएमपीएल डेपोसमोर आंदोलन सुरु करण्यात आले. वाचा सविस्तर

सारडा सर्कल भागातील इगतपुरीचाळच्या येथील संजरीनगर सोसायटीच्या फ्लॅट क्रमांक ७ मध्ये घरगुती गॅस सिलिंडर बदलताना गॅस लिक होऊन गळती सुरू झाली. वाचा सविस्तर

व्ही. शांताराम यांच्या अध्यक्षतेखाली साठच्या दशकात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ स्थापन झाले. कलावंत आणि मराठी चित्रपटसृष्टीला ग्लॅमर मिळवून देण्यासाठी या महामंडळाचा मोठा वाटा आहे. वाचा सविस्तर

सध्याची कोविडची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने मिशन बिगेन अगेनमधील तरतुदी १५ एप्रिलपर्यंत लागू केल्या आहेत. वाचा सविस्तर

राज्यात मार्चच्या तुलनेत एप्रिलमध्ये रुग्णवाढ आणि रुग्णांच्या तुलनेत मृत्यूदरही वाढू लागला आहे. दररोज सरासरी 45 हजार रुग्ण वाढत असून दोनच दिवसांत 451 जणांचा मृत्यू झाला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अहवालानुसार मृत्यूदर वाढत असलेल्या टॉप टेन जिल्ह्यांमध्ये सोलापूर सातव्या क्रमांकावर आहे. वाचा सविस्तर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : सीएसकेचं शतक पार मात्र निम्मा संघ झाला गारद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT