viral story
viral story sakal
देश

गुरुजी करतात सायकलवरून फूड डिलिव्हरी; लोकांनी गोळा केली तीन तासात लाखोंची मदत

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळाची झळ सर्वत्र दिसत आहे अशातच उन्हात राबराब काम करणाऱ्या मजुरांचे बेहाल होत आहे. सध्या सोशल मीडियावर अशाच एका फूड डिलिव्हरी बॉयची गोष्ट व्हायरल होत आहे. हे प्रकरण राजस्थानच्या भिलवाडा येथील आहे. राजस्थानची तापमान जगजाहिर आहे.तेथील या डिलिव्हरी बॉयने कडक उन्हात सायकलवरुन कोल्ड्रिंक वेळेत पोहोचवले. तो थेट ऑर्डर देण्यास पोहोचला तर त्याला पाहून ऑर्डर देणाऱ्या आदित्य शर्माचे मन हेलावून गेले. यासंदर्भात त्याने ट्वीट करत माहिती दिली. (zomato delivery boy is a teacher who delivered food on cycle in rajasthan in 42 degree celsius)

आदित्य शर्माने ट्विटरवर या डिलिव्हरी बॉयची खरी कहाणी शेअर केली आहे. आदित्य शर्मा ट्विटमध्ये लिहितात, “आज माझी ऑर्डर वेळेवर पोहोचली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा डिलिव्हरी बॉय सायकलवर आला. शहरातील तापमान 42 अंश आहे, तरीही मला वेळेवर ऑर्डर मिळाली.”

पुढच्या ट्विटमध्ये आदित्य शर्मानी सांगितले की, या व्यक्तीचे नाव दुर्गा मीणा आहे, तो 31 वर्षांचा आहे. गेल्या 4 महिन्यांपासून तो जेवण पोहोचवण्याचे काम करतोय. यातून तो 10 हजार रुपयांपर्यंत कमावतो.

तुम्हाला आश्चर्य वाटेल हा डिलिव्हरी बॉय व्यवसायाने शिक्षक असून गेल्या 12 वर्षांपासून तो शिक्षकी पेशात आहे मात्र कोरोना काळात त्याची नोकरी गेली. दुर्गा हा आदित्य याच्याशी इंग्रजीत बोलत असल्याचेही आदित्यने सांगितले.

दुर्गाने बीकॉमचे शिक्षण घेतले आहे आणि त्याला पुढे मास्टर्स पूर्ण करायचे आहे पण आर्थिक परिस्थितीमुळे तो हे करू शकत नव्हता आणि म्हणूनच तो सध्या Zomato मध्ये काम करतोय. त्याला इंटरनेटचे ज्ञान आहे. त्याने लॅपटॉप देखील घेतला आहे आणि लॅपटॉपद्वारे तो मुलांना ऑनलाइन शिकवत असतो.

आदित्य पुढे सांगतो की दुर्गा दर महिन्याला काही पैसेही वाचवतो जेणेकरून त्याला बाईक खरेदी करता येईल. दुर्गा एका दिवसात 10-12 ऑर्डरची डिलिव्हरी करतो. जर बाईक उपलब्ध असेल तर डिलिव्हरी करणे आणखी सोपे होईल. हे लक्षात घेऊन आदित्यने क्राउडफंडिंग सुरू केले. त्याने दुर्गा शंकर मीनाचा UPI आयडी शेअर केला, जेणेकरून पैसे थेट दुर्गा मीनाच्या खात्यात ट्रान्सफर होतील आणि त्याद्वारे त्याला मदत मिळणार."

आदित्यने ७५,००० रुपये उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. पण लोकांनी घाईघाईने देणगी देण्यास सुरुवात केली. तीन तासांत सुमारे दीड लाख रुपये दुर्गा मीनाच्या खात्यात जमा झाले. विशेष म्हणजे परदेशातूनही लोकांनी मदत केली आहे. आता आदित्य आणि तो लवकरच बाईक घेण्यासाठी जाणार आहे. बाइक खरेदी करतानाचा व्हिडिओ रेकॉर्ड करणार आणि शेअर करणार असल्याचे आदित्यने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: बिश्नोईने दूर केला तुफानी खेळ करणाऱ्या सुनील नारायणचा अडथळा, कोलकाताने गमावली दुसरी विकेट

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

Ajit Pawar : रोहित पवार झाले भावनिक, अजित पवारांनी केली नक्कल! म्हणाले, असली नौटंकी...

IPL 2024 Point Table : ऋतुराजची चेन्नई टॉप फोरमध्ये दाखल! CSK च्या विजयानं पंजाबलाच नाही तर तब्बल सहा संघांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT