imran khan
imran khan  
ग्लोबल

शरीफ यांनी "मोदींप्रमाणे' पाक सैन्याचा अपमान केला: इम्रान खान

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - पाकिस्तानचे पदच्यूत पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानी सैन्याचा अपमान केल्याची टीका पाकमधील तेहरिक-इ-इन्साफ या राजकीय पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांनी केली आहे. किंबहुना, "भारताचे पंतप्रधान नरेंद्रन मोदी यांनी केला असता; तसाच अपमान शरीफ यांनी पाक सैन्याचा केला असल्याची,' भावना इम्रान यांनी व्यक्त केली आहे.

"डॉन' या प्रसिद्ध पाकिस्तानी वर्तमानपत्रामध्येगेल्या वर्षी (2016) प्रसिद्ध झालेल्या एका लेखामध्ये पाकिस्तानमधील दहशतवादी संघटनांवर सैन्य कारवाई करत नसल्याने शरीफ सरकार सैन्यावर नाराज असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. या पार्श्‍वभूमीवर इम्रान यांनी हे मत व्यक्त केले आहे. शरीफ यांची झालेली हकालपट्टी इम्रान यांच्यासाठी मोठे राजकीय यश मानले जात आहे.

"भ्रष्टाचारामधून मिळविलेल्या संपत्तीच्या रक्षणासाठी शरीफ हे पाकिस्तानच्या हिताशी तडजोड करत देशाच्या शत्रुशीही हातमिळवणी करतील,' अशी कडवट टीका इम्रान यांनी केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाच्या पार्श्‍वभूमीवर इम्रान यांनी पाकिस्तानमध्ये "थॅंक्‍सगिव्हिंग रॅली' काढली होती. शरीफ यांनी 2013 मधील निवडणुकीमध्ये गैरप्रकार केल्याचा आरोप करत इम्रानसमर्थकांनी 2014 मध्ये संसद व इतर सरकारी इमारतींना घेराओ आंदोलन केले होते. तसेच 2016 मध्ये पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादला वेढा घालण्याचा प्रयत्नही इम्रान यांच्याकडून करण्यात आला. हा प्रयत्न तांत्रिकदृष्टया अयशस्वी झाला; तरी यामुळे न्यायालयास शरीफ यांच्याविरोधातील पनामा पेपर्स प्रकरण सुनावणीसाठी घ्यावे लागले होते. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा:

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT