विठ्ठलराव विखे पाटील  sakal
महाराष्ट्र बातम्या

नेहरू विखेंना म्हणाले," असा ऊस मी उभ्या आयुष्यात पाहिला नाही."

आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारणाऱ्या विठ्ठलराव विखे पाटील यांचा आज ४२वा स्मृतिदिन आहे.

सकाळ डिजिटल टीम

आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारणाऱ्या विठ्ठलराव विखे पाटील (Vitthalrao Vikhe Patil) यांचा आज ४२वा स्मृतिदिन आहे. देशातल्या सहकार चळवळीचा पाया त्यांनी त्यांनी मजबूत केला.

विठ्ठलराव विखे पाटील हे महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीतलं एक असं उमदं नाव आहे की जेव्हा जेव्हा सहकारी साखर कारखान्याचा उल्लेख होईल तेव्हा तेव्हा त्यांचं योगदानाला मानवंदना दिली जाईल.

विठ्ठलराव विखे पाटील यांच बालपण

विठ्ठलराव विखे पाटील यांचा जन्म १ जुलै १८९७ ला अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरमधल्या लोणी बुद्रुक इथं झाला. विखे पाटील यांचे वडील लोणी बुद्रुकचे शेतकरी. त्यांच्याकडे अगदी शेती अगदी मोजकीच होती. त्यांचं कुटुंब खूप मोठं होतं. आई वडील सह पाच सख्ख्या बहिणी सोबत ते रहायचे. शाळेत त्यांचं मन रमायचं नाही त्यामुळे त्यांनी चौथीतच शाळा सोडून निसर्गाला आपली शाळा मानली.

१९ व्या शतकाचं पहिलं दशकात शेतकऱ्यांच्या पिकानं भरलेल्या शिवारांवर मोठ्या प्रमाणात टोळधाडी पडत. लहानपणापासून विठ्ठलराव हे सर्व पाहत होते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या समस्या त्यांच्या बालमनावर परिणाम करुन गेल्या.

महाराष्ट्रात सहकार चळवळीची सुरवात

१९१८ ला नगरमधे फार मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी सावकारानं अडाणी आणि परिस्थितीत फसलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडपल्या. यात शेतकऱ्यांची झालेली घुसमळ पाहता विठ्ठलराव विखे पाटील यांना आत्मा पेटून उठला. तेव्हा आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी केले पाहीजे, असे त्यांना जाणवले.

मुंबईत या दरम्यान सेंट्रल कोऑपरेटिव इन्स्टिट्यूटची स्थापना झाली होती. १९१८ मधे एक पायाभूत घटना घडली. ब्रिटिश सरकारने आपल्या सरकारला उपयोगी पडेल असं एक सहकारी क्षेत्र तयार करण्याचं धोरण समोर ठेवलं. बॉंबे प्रॉविन्शिअल कोऑपरेटिव इन्स्टिट्यूटची म्हणजेच आजच्या महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची स्थापना झाली.

ऐन तरुणपणात विठ्ठलराव विखे पाटील छोट्याशा लोणी गावात पाटील म्हणून असंख्य समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत होते. गावची परिस्थिती पाहता २३ जानेवारी १९२३ मधे 'लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी' ही संस्था त्यांनी उभारली. अख्ख्या आशिया खंडातली ही पहिलीच सहकारी संस्था होती.

अशातच १९२८ मधे विठ्ठलराव डी.एल.बीच्या निवडणूकीत निवडून आले. १० डिसेंबर १९२९ ला विठ्ठलरावांनी राजूरी या छोट्या गावात सहकारी सोसायटी स्थापन केली. भारतातली अशा प्रकारची ही पहिलीच सोसायटी होती.

पहिला साखर कारखाना

आशिया खंडातला पहिला साखर कारखाना महाराष्ट्राच्या मातीत सुरु झाला. १५ मे १९६१ मधे लोणी बुद्रुक इथं तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ह्या कारखान्याचं उद्घाटन झालं. खरं तर हा कारखाना १९५० लाच तयार झाला होता. मात्र विठ्ठलरावांनी त्याचं उद्घाटन तब्बल १० वर्ष थांबवलं. त्यांना पंडित नेहरुंच्या हस्तेच कारखान्याचं उद्घाटन करायचं होतं.

उद्घाटनावेळी पंडित नेहरू आपल्या भाषणात म्हणाले, ”विद्वान आणि श्रीमंत अशी मोठी माणसं मोठी कार्य करतात परंतु कमी शिकलेली, लहान माणसेही मोठं कार्य करू शकता, हे मला आज समजले. विखे पाटलांसारखा सामन्य शेतकरी केवढे मोठे कार्य करू शकतो, हे मी आज पाहिलं. आजपर्यंत बारा फुट उंचीचा उस मी पाहिला नव्हता. आज पाहण्याचा योग आला.”

विठ्ठलराव विखे पाटील हे महाराष्ट्रातील इतिहासातील असं नाव आहे जे कायम त्यांच्या कार्यासाठी आठवण केल्या जाईल. आशियातील सर्वात पहिला सहकारी साखर कारखाना पहिल्यांदा महाराष्ट्राच्या मातीत रोवणाऱ्या विठ्ठलराव विखे पाटील यांचे योगदान फार मोठे आहे.

अपार परिश्रमाने भारतीय शेतकऱ्यांच्या आर्थिक आघाडीसाठी जिद्दीने लढत देणाऱ्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी २७ एप्रिल १९८० रोजी अखेरचा श्वास घेत आपली जीवनयात्रा संपवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT