Tomb of Aurangzeb सकाळ
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर कोणी उभारली ?

औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला? असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आलाय पण तुम्हाला माहितीआहे का? महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर कोणी उभारली?

सकाळ डिजिटल टीम

एमआयएमचे नेते अकबरुद्दी ओवैसी (Akbaruddin Owaisi)यांनी औरंगाबाद येथे औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले आणि राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली.त्यांच्या दर्शनावरून अनेकांनी आक्षेप नोंदवला तर काहींनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले या प्रकरणावरून एकच चर्चा रंगली, ती म्हणजे औरंगजेबाच्या कबरीची..एवढंच काय तर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात हवीच कशाला? असा प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आला पण तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर कोणी उभारली? आज आपण या विषयी जाणून घेणार आहोत.

कोण होता औरंगजेब?

मोगल बादशाहांमध्ये औरंगजेब असा एकमेव शासक होऊन गेलाय ज्याने भारतावर १६५८ ते इसविसन १७०७ अश्या जवळपास अर्ध्या शतकापर्यंत राज्य केलं. शहाजहा आणि मुमताज चा मुलगा औरंगजेब याने आपल्या चातुर्यपूर्ण रणनीतीनी मोगल साम्राज्याचा विस्तार केला होता. महाराष्ट्राच्या इतिहासातला तो खुप मोठा शत्रू आहे. शिवाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाने अनेक कारस्थानी केली होती पण शिवाजी महाराजांनी त्याला वेळोवेळी चांगलाच चाप दिला. एवढंच काय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या साहसाला आणि शक्तीला पाहून औरंगजेबाच्या मनात देखील महाराजांविषयी दहशत पसरली होती

स्वत:च्या भावांची हत्या तर वडीलांना बनवले होते कैदी

औरंगजेब हा अत्यंत क्रुर होता. मोगल सिंहासनावर विराजमान होण्यासाठी तो अत्यंत अधीर झाला होता, याकरता तो इतक्या खालच्या पातळीवर उतरला कि त्याने आपला सख्खा भाऊ दाराशिकोहला फाशीवर लटकवले व बंगाल चा गवर्नर असलेला दुसरा भाऊ शाहशुजा ला पराजित करून त्याची देखील हत्या केली. एवढंच काय तर आपल्या वृद्ध आणि आजारी पित्याला जवळजवळ ७ वर्ष कैदी बनवून आग्रा येथील लाल किल्ल्यात ठेवले.

असा झाला औरंगजेबाचा मृत्यू

औरंगजेबाच्या मृत्यूवरुन अनेक मते मांडली जातात. काही इतिहासकारांच्या मते औरंगजेबाच्या मृत्यू हा सामान्य होता. इसविसन १७०७ मध्ये औरंगजेबाने आपला शेवटचा श्वास घेतला तर काही इतिहासकारांचे असे म्हणणे आहे की वीर छत्रसाल यांनी आपले गुरु प्राणनाथ यांनी दिलेल्या खंजिराने औरंगजेबावर हल्ला केला. त्या खंजिराला काही विषारी द्रव लावण्यात आल्याने औरंगजेबाच्या जखमा पुढे कधी भरल्याच नाहीत आणि त्यांचा मृत्यू झाला.

औरंगजेबाची कबर कोणी उभारली ?

औरंगझेबचा मृत्यू ३मार्च, १७०७ साली नगर येथे झाला. मुलगा आझम शाह याने खुलदाबाद येथए औरंगजेबाची कबर उभारली. खुलदाबाद हे समाधींचे गाव म्हणून ओळखले जाते. आपला दफन विधी खुलदाबाद मधील शेख झैन-उद्-दिन (औरंगजेबचा अध्यात्मिक गुरू) यांच्या दर्गा जवळ करावा, अशी औरंगझेबची मृत्यूपूर्व इच्छा होती. औरंगजेबाची मृत्यूपूर्व इच्छा अशी होती की त्याचे अंतिम संस्कार गाजावाजा न होता करावे. समाधी सुद्धा एकदम सध्या पद्धतीने बांधावी जी त्याच्या स्वकमाई च्या पैशातून असेल. त्याच्या इच्छेचा मान ठेवून त्याच्या आझम शाह नावाच्या मुलाने समाधी अवघ्या १४ रुपये १२ आणे इतक्या पैशात उभारली. हे पैसे औरंगजेबाने स्वतः टोप्या विणून व विकून मिळवले होते, असं इतिहासात नमूद आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: हाच तो क्षण! हरमनप्रीतने टीम इंडियासह उंचावली ट्रॉफी; सेलिब्रेशन अन् स्वप्नपूर्तीचे क्षण, पाहा Video अन् Photo

World Cup 2025: शाब्बास मुलींनो! विराट कोहली, सचिन तेंडुलकरपासून नीरज चोप्रापर्यंत विश्वविजेत्या भारतीय संघावर शुभेच्छांचा वर्षाव

ICC Announced Prize for India : वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी अन् कोट्यवधीचं बक्षीस! भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी आयसीसीची मोठी घोषणा...

Amol Muzumdar: भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली नाही, पण आता World Cup विजेता कोच; महिला संघाच्या यशामागचा हिरो

India won Women’s World Cup: दीप्ती शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड! भारतीय महिलांनी इतिहास रचला, रोहित शर्मा रडला; Video Viral

SCROLL FOR NEXT