RRR Movie
RRR Movie सकाळ डिजिटल टीम
मनोरंजन

रिलीजपुर्वीच 'RRR' ची 750 कोटींची कमाई

सकाळ डिजिटल टीम

एसएस राजामौली यांचे सिनेमे बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतात. त्यांचा 'बाहुबली द बिगिनिंग' त्यानंतर 'बाहुबली 2' ने सर्व रेकॉर्ड तोडले. आता एसएस राजामौली यांच्या आगामी 'RRR'ने असाच आणखी एक रेकॉर्ड केलाय. रिलीजपूर्वीच 750 कोटींची कमाई करत या चित्रपटाने 'बाहुबली 2'लाही मागे टाकले आहे. या चित्रपटात आलिया भट्ट (Alia Bhatt), अजय देवगण (Ajay Devgan), राम चरण (Ram Charan) आणि ज्युनियर एनटीआर (Jn NTR) हे प्रमुख भूमिकेत आहे. (RRR earned 750 crores before its release)

RRR' चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. प्रेक्षकांना चित्रपटाच्या तिकिटांची चिंता करावी लागू नये, यासाठी निर्मात्यांनी या चित्रपटाची प्री-बुकिंग 22 मार्चपासून सुरू केली होती. तर आता 'RRR' ने प्री-बुकिंग आणि राइट्सच्या माध्यमातून जवळपास 750 कोटींची कमाई केल्याची माहिती समोर आली आहे. चित्रपट रिलीज होण्यापुर्वीच 750 कोटींची कमाई हे चित्रपटासाठी मोठं यश म्हणता येईल.

उत्तर भारतातील सर्व भाषांमध्ये या चित्रपटाचे वितरण, डिजिटल आणि सॅटेलाइट हक्क विकत घेतले असल्याने उत्तर भारतातील थिएटरमधून 150 कोटी आणि इतर सर्व भाषांच्या थिएटर मधून 250 कोटी कमावण्यात आले. सोबतच RRR'चा व्यवसाय सर्व भाषांमधून 520 कोटी रुपयांचा झालाअसल्याने एकूण कमाई जवळपास 800 कोटींवर गेली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT