मराठवाडा

प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा हप्ता भरण्यास ३१ जुलैपर्यंत मुदत

सकाळवृत्तसेवा

नांदेडः राज्यात खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात भात, खरीप ज्वारी, तीळ, मूग, उडीद, तूर, सोयाबीन व कापूस या पिकांसाठी ही योजना लागू आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा उतरवण्याची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन नांदेडच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

या योजनेंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी दोन टक्के व कापसासाठी पाच टक्के ठेवण्यात आला आहे. जोखीम स्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के निश्चित केला आहे. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्री वादळ, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग आदी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणी पश्चात नुकसान इत्यादी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी बंधनकारक असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना एेच्छिक आहे. जिल्हयात खरीप हंगाम २०१७ मध्ये ही योजना भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड नवीन स्टॉक एक्सेंज बिल्डिंग, २० वा मजला, दलाल स्ट्रीट, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे.

या योजनेंतर्गत विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता पुढीलप्रमाणे ः
पीक विमा - संरक्षित रक्कम रु./हेक्टर - शेतकऱ्यांनी भरावयाचा पीकविमा हप्ता (रु.)
१) भात - ३९ हजार रुपये - ७८० रुपये
२) खरीप ज्वारी - २४ हजार - ४८०
३) तूर - ३० हजार - ६००
४) मूग - १८ हजार - ३६०
५) उडीद - १८ हजार - ३६०
६) सोयाबीन - ४० हजार - ८००
७) तीळ - २२ हजार - ४४०
८) कापूस - ४० हजार - २०००

■ 'ई सकाळ'वरील ताज्या बातम्या
इस्रोकडून एकावेळी तब्बल 31 उपग्रह अवकाशात प्रक्षेपित
एक लाखापर्यंत पूर्ण कर्जमाफी शक्‍य
बीडः पंचायत समितीच्या माजी सभापतीने केला गोळीबार
नीट परिक्षेत पंजाबचा नवदीप पहिला; महाराष्ट्रातून अभिषेक पहिला
रामनाथ कोंविंद यांनी भरला राष्ट्रपती निवडणुकीचा अर्ज
पानशेत, वरसगाव, टेमघर: तेवीस दिवसांत 100 मिलिमीटर पाऊस
औरंगाबाद : आळंद येथे टेम्पोची कारला धडक; 1 गंभीर
विधवांच्या आयुष्यात येतोय आशेचा किरण!
तुकाराम महाराज पालखी मार्गावर वाहतुकीचा बोजवारा
आमदार गजबेंच्या अंगरक्षकाची गोळी झाडून आत्महत्या
दारू व्यावसायिकाकडून लाच घेताना पाेलिसाला अटक
एकतर्फी प्रेमातून शिक्षकाला मारहाण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

MDH Everest Masala: एमडीएच आणि एव्हरेस्ट वादात सरकारचा मोठा निर्णय; आता सर्व राज्यांमध्ये होणार मसाल्यांची चाचणी

Yed Lagla Premacha: भिर्रर्र...'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत बघायला मिळणार बैलगाडा शर्यतीचा थरार, पाहा प्रोमो

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT