swabhimani farmer sugarcane crop rate sugar factory rate dispute agriculture
swabhimani farmer sugarcane crop rate sugar factory rate dispute agriculture Sakal
पश्चिम महाराष्ट्र

Sangli News : गत हंगामातील उसाला जादा दरासाठी संघटना, साखर कारखानदारांत संघर्ष अटळ

विष्णू मोहिते

सांगली : गत हंगामात गाळलेल्या उसाला प्रतिटन ४०० रुपये जादा दरासाठी स्वाभिमानीसह काही संघटनांना आक्रमक भूमिका घेतली आहे. स्वाभिमानीतर्फे सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात जनआक्रोश आंदोलन यात्राही सुरु केली आहे.

संघटना, कारखानदार यांच्यात संघर्ष अटळ असल्याचे चित्र आहे. या पार्श्‍वभूमिवर साखर कारखानदारांनी साखर दरातील तेजी ऑगस्टपासून मिळाली. तत्पुर्वीच केंद्राच्या धोरणाप्रमाणे साखऱ विक्री झाली. सध्या साखर साठाच नसल्याने तेजीचा फायदा झाला नाही. परिणामी मागणीप्रमाणे दर देणे अशक्य असून येत्या हंगामात चांगले दर देता येतील, अशी भूमिका घेतली आहे.

गेल्या गळीत हंगामातील उसाला प्रतिटन किमान ४०० रुपये दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, अंकुश संघटना, जयशिवराय संघटना आपआपल्या ताकदीनूसार आंदोलन करीत आहेत. याला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद आहे.

sugarcane

स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात यासाठी जनआक्रोश आंदोलनही सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमिवर कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांनी कारखानदार व स्वाभिमानीची एक बैठक घेतली.

त्यात तोडगा निघालेला नाही. कारखानदारांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे संघटनेचे मत आहे. स्वाभिमानीने दराच्या मागणीसाठी साखर कारखान्याकडून विक्री करण्यासाठी घेवून जाणारी साखर अडवण्याचे सत्र सुरु केले आहे.

सांगली जिल्ह्यात स्वाभिमानीच्या आंदोलनाच्या आज दुसऱ्या दिवशी आंदोलक आरग येथील मोहनराव शिंदे साखर कारखान्यावर भिडले आहेत.ही यात्रा ७ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. उसापासून तयार होणाऱ्या साखरेसह उपपदार्थांचे दर झपाट्याने वाढताहेत.

साखर कारखान्यांना याचा फायदा होत आहे. मात्र, ऊस उत्पादकांना याचा लाभ न देण्याची भूमिका साखर कारखाने चालकांची दिसते आहे. साखर कारखान्यांनी ऊस उत्पादकांना वाऱ्यावरच सोडल्याची भावना आहे.

गेल्या सन २०२२-२३ च्या गळीत साखर हंगाम सुरु झाला त्यावेळी प्रतिक्विंटल साखरेचा दर २९०० ते ३००० रुपयांपर्यंत होता. आता हाच दर ३८०० ते ३९०० रुपयांपुढे गेला आहे. याचा साखर कारखान्यांना निश्‍चितपणे फायदा होत आहे.

झालेल्या फायद्याचा शेतकऱ्यांना फायदा द्यावा, अशी शेतकरी व संघटनांची मागणी आहे. तिन्ही जिल्ह्यात गांधी जयंतीपासून आंदोलन सुरु आहे. साखर सहसंचालकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. दरासाठी कारखान्यातून बाहेर जाणारी साखर तसेच ऊस तोडी रोखल्या जात आहेत.

राजू शेट्टी यांनी गत हंगामात गाळप झालेल्या उसाला ४०० रुपये दर मिळवण्यासाठी साखर सम्राटांना नमवून दर मिळवू, अशी भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी गेल्या गळीत हंगामातील उसाला एफआरपीनुसार दर दिला आहे.

सध्या साखरेचा दर चांगला असल्याने कारखानदारांनी प्रतिटन चारशे रुपये शेतकऱ्यांना दिले पाहिजेत. दरम्यान, कारखानदारांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू द्यायची नाही. त्यामुळे ते दुसरा हप्ता देत नाहीत.

यावर्षी बाजारात साखरेचे प्रति क्विंटलचे दर ३ हजार ६०० वर गेले आहेत. यंदा साखर कारखानदारांना साखर आणि उपपदार्थांवरही जादा दर मिळाला आहे. सी. रंगराजन समिती आणि आरएसएफ कायद्यानुसार कारखानदारांकडे पैसे शिल्लक राहतात. त्यामुळे तत्काळ दर दिलाच पाहिजे.’

येत्या हंगामात चांगला दर शक्य...

क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शऱद लाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,‘ गेल्या वर्षी हंगाम सुरु झाले तेव्हा दर कमीच होते. ऑगस्ट २०२३ पासून साखर दरात तेजी आलेली आहे.

मात्र केंद्र सरकारच्या धोरणाप्रमाणे कारखान्यातील साखरेची विक्री करण्यात येते. दरात तेजी येण्यापुर्वी साखरेचा साठा विक्री झाली होती. साखर साठा कमी असल्याने दरातील तेजाचा फायदा मिळाला नाही.

येत्या हंगामात साखरेसह उपपदार्थांचेही दर तेजीचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. शिवाय एकरक्कमी एफआरपी दिली जात असल्याने साखर कारखान्यांना व्याजाचा बोजा सहन करावा लागतो. आमच्या सर्वसाधारण सभेत तीन हप्प्यात बिल देण्याचा ठराव झाला. मात्र अन्य कारखान्यांनी एकरक्कमी एफआरपी दिल्यामुळे आम्हालाही स्पर्धेत उतरावे लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT