Afternoon News
Afternoon News

दुपारच्या बातम्या : राज्यात बर्ड फ्लूचा कहर ते इंदुरीकर ढसाढसा रडले; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

ईडीच्या कार्यालयासमोरच जोड्याने मारेन, संतापलेल्या संजय राऊतांनी ठणकावलं
भाजप नेत्यांकडून सातत्याने होणाऱ्या आरोपांवरुन शिवसेना नेते संजय राऊत संतापले आहेत. त्यांनी जोरटार पलटवार करत, जर आरोप सिद्ध झाले नाहीत तर  ईडीच्या कार्यालयासमोर आरोप करणाऱ्यांना जोड्याने मारणार असल्याचं जाहीर केलं आहे. - सविस्तर वाचा

H5N1 Bird Flu पासून स्वतःला दूर ठेवण्याचे गोल्डन रुल्स जाणून घ्या
महाराष्ट्रात परभणीत तब्बल ८०० कोंबड्यांचा बर्ड फ्लू मुळे मृत्यू झालाय. देशभरात एकीकडे कोरोनाचं संकट तर आहेच. सोबतच आता बर्ड फ्लू डोकं वर काढतोय. - सविस्तर वाचा

Breaking News : शिवेंद्रसिंहराजेंसह समर्थकांना न्यायालयात मिळाला दिलासा
आनेवाडी टोलनाक्‍यावरील टोलबंद आंदोलन प्रकरणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendra Raje Bhosale) व त्यांच्या समर्थकांची न्यायालयाने आज (साेमवार) निर्दाेष मुक्तता केली. - सविस्तर वाचा

कृषी कायद्यांना स्थगिती द्या, समिती नेमा; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला फटकारलं
शेतकरी आंदोलनाशी निगडीत सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु झाली. सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की, आम्हाला हे माहित नाहीये की, सरकार या कायद्यांबाबत कशाप्रकारे हे प्रकरण हाताळत आहे. - सविस्तर वाचा

मला कधीच लग्न करायचं नाहीये, 'दंगल' गर्लनं ' सांगितलं कारण...
कलावंत म्हटला की तो थोडासा लहरी आलाच. त्याचे वेगवेगळे मुडस्विंग पाहून अनेकदा त्याचे चाहतेही बुचकाळ्यात पडतात. प्रत्येक कलाकार त्य़ाची विचारधारा वेगळी असल्याचे दिसून आले आहे. - सविस्तर वाचा

WhatsApp वरुन Signal वर ट्रान्सफर होताय? ग्रुप आहे तसा हलवण्याची ही वाचा सोपी पद्धत
WhatsApp हे जगभरात सर्वाधिक वापरले जाणारे पहिलेच मेसेंजिग ऍप आहे. 2014 साली त्यावर फेसबुक कंपनीचा मालकी हक्क आला. मात्र, आता WhatsApp ने आपल्या प्रायव्हसी पॉलिसीमध्ये काही बदल केले आहेत. - सविस्तर वाचा

चीनमुळं काही अडणार नाही; भारतातच सापडला मौल्यवान खनिज साठा
भारत लिथियमबाबत (Lithium) चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचमुळे भारताने अर्जेंटिनाच्या कंपनीसोबत करार (India Argentina agreement for lithium) केला आहे. आतापर्यंत चीनकडून मोठ्या प्रमाणात लिथियमची आयात करण्यात आली आहे. - सविस्तर वाचा

Stock Market: सेन्सेक्स आणि निफ्टी ऐतिहासिक उंचीवर; गुंतवणुकदारांची झाली चांदी
ग्लोबल मार्केटमधून मिळालेल्या संकेतामुळे सोमवारी शेअर बाजाराने इतिहास रचला. व्यवहाराच्या सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टी नव्या उंचीवर पोहोचले. - सविस्तर वाचा

शिकागोत सिरियल किलिंगचा थरार; सनकी व्यक्तीकडून तिघांचा खात्मा तर चौघे जखमी
शिकागो शहरात एक धक्कादायक अशी सिरीयल किलींगची घटना घडली आहे. एका सनकी व्यक्तीने शहरात चांगलाच हाहाकार माजवला आहे. या इसमाने अंधाधुंद असा गोळीबार करत शिकागो शहरातील निष्पाप तीन लोकांचा बळी घेतला आहे. - सविस्तर वाचा

इंदुरीकर महाराज ढसाढसा रडले! निःशब्द होत फुटला अश्रूंचा बांध; VIDEO राज्यभर व्हायरल
माणूस भावनाशील असतो, त्यातच जिव्हाळ्याचा आणि आपुलकी निर्माण झालेला सहकारीच अचानक आपल्यातून निघून गेला, तर आपण नक्कीच निशब्द होतो. याचा प्रत्यय येवला तालुक्यातील ठाणगाव येथे आला. - सविस्तर वाचा

पुणे- मुंबई एक्सप्रेस-वे वर पहाटेपासून 5 अपघात; कंटेनरने पोलिसांच्या गाडीला उडविले

पुणे-मुंबई महामार्गावर आज सोमवारी (ता.11) पहाटेपासून पाच वेगवेगळे अपघात झाले आहेत.  नर्हे येथे भूमकर पुलाजवळ वेगवेगळे 2, वाकड पुलावर 1, नवीन कात्रज बोगदा दरी पुलाजवळ आणखी 2 अपघात झाले आहेत. दरम्यान पहाटे पासून झालेल्या 3 मृत्यू तर 19 जखमी झाले आहेत. सविस्तर बातमी-

Sakal Exclusive : 'सिरम'मधून कधी होणार लस वितरण?

कोरोना प्रतिबंधक लसिच्या वितरणासाठी केंद्र सरकारच्या अंतिम आदेशाची आता प्रतीक्षा आहे. लस वितरणाची सर्व जय्यत तयारी झाली असून, आज रात्री उशिरापर्यंत किंवा मंगळवारी सकाळपर्यंत या बाबतचे अंतिम आदेश केंद्राकडून येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्या प्रमाणे लस वितरण देशात सुरू होईल. सविस्तर बातमी-

ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्यावर गुन्हा दाखल

ज्येष्ठ  साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्याविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेमाडे यांच्या 'हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ ' या पुस्तकात लमाण समाजातील स्त्रियांबद्दल दिलेली माहिती ही भावना दुखावणारी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी रमेश राठोड यांनी भोसरी पोलिस ठाण्यात नेमाडे यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. सविस्तर बातमी-

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com