ग्रामपंचायत निकाल ते रशियात नवाल्नी यांना अटक; वाचा महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

Aaj Divasbharat
Aaj Divasbharat

राज्यातील ग्रामपंचातय निवडणुकांची मतमोजणी आज झाली. यात काही प्रस्थापितांना धक्का बसला तर काही दिग्गज गड राखण्यात यशस्वी ठरले. दुसरीकडे मनोरंजन क्षेत्रात तांडव वेबसिरीजविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर दिग्दर्शकाने माफीनामा सादर केला आहे. तर देशाच्या सीमेवर अरुणाचल प्रदेशमध्ये चीनने अख्खं गाव वसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

धक्कादायक! चीनने भारतात वसवलंय गाव; सॅटेलाइट फोटो आले समोर
भारत आणि चीन यांच्यात लडाख सीमेवर वाद सुरु आहे. दरम्यान, आता अरुणाचलमध्ये नवीन प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी चीनने एक गावचं वसवल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय. - सविस्तर वाचा

पुतीन यांचे कट्टर विरोधक नवाल्नींना अटक; नाट्यमय पद्धतीने घेतलं ताब्यात
रशियाचे सर्वेसर्वा व्लादिमीर पुतीन यांचे विरोधक अॅलेक्सी नवाल्नी यांना नाट्यमय घडामोडी होऊन रविवारी सायंकाळी मॉस्कोत अटक करण्यात आली. - सविस्तर वाचा

Video: बायकोला किस करायची पण पंचाईत झालीय; बड्या नेत्याचं भर सभेत वक्तव्य
कोरोना व्हायरस महामारीमुळे देशभरातीलच नव्हे तर जगभरातील करोडो लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागला. आर्थिक, सामाजिक समस्यांव्यतिरिक्त अनेकांना वैयक्तिक गोष्टींना देखील मुकावे लागले. - सविस्तर वाचा

Big Breaking: ममतादीदींनी गड बदलला; भाजपच्या बालेकिल्ल्यातून निवडणूक लढणार!
पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ करताना तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आगामी निवडणूक नंदीग्राममधून लढण्याचे जाहीर केले आहे. - सविस्तर वाचा

दिल्लीमधील शेतकरी आंदोलनाबाबत शरद पवारांनी केले मोठे भाष्य
देशपातळीवर आणि विशेषतः दिल्लीमध्ये आज शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. गहू आणि तांदळाचे प्रचंड उत्पादन झाल्याने त्याच्या मार्केटींगचे प्रश्न निर्माण झाले आहेत. - सविस्तर वाचा

Pune Election Result 2021: गावात काय घडलं? काय बिघडलं? वाचा एका क्लिकवर
माणूस शहरात आला, शहराचा झाला तरी, त्याची नाळ कायमच त्याच्या गावाशी जोडलेली असते. त्यामुळं गावात काय घडलंय? गावात काय घडतंय? याकडं प्रत्येकाचं लक्ष असतं. - सविस्तर वाचा

किंमत एका मताची : नातवाला विजयी करून, आज्जीने घेतला जगाचा निरोप
वाळेण(ता. मुळशी) येथील वार्ड १ मध्ये विजय मुगुट साठे यांचा एक मताने विजय झाला. त्यांना १२७ तर विरोधी उमेदवार संजय चिंधु साठे यांना १२६ तर यशवंत किसन ढमाले १३ मते पडली. - सविस्तर वाचा

गावाच्या ग्रामपंचायतीत भाजपचा धुव्वा; चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून अनेक ठिकाणी दिग्गजांच्या पॅनेलला धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याच गावात भाजपचा पराभव झाला आहे. - सविस्तर वाचा

विरोधाचं 'तांडव' शांत होणार; दिग्दर्शकाचा माफीनामा; वाचा काय म्हटलंय?
तांडव वेबसिरीजवरून सुरु झालेल्या वादावर आता दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी माफी मागितली आहे. गेल्या आठवड्यात अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर ही सिरीज प्रसारीत झाली. - सविस्तर वाचा

जय श्रीराम! मंदिरासाठी खारीचा वाटा उचला; अक्षय कुमारने केलं आवाहन
अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आहे. गेल्यावर्षी 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले. - सविस्तर वाचा

प्रिया बापटच्या गोड बातमीनं सगळे चक्रावले...
अल्पावधीतच आपल्या अभिनयानं मराठी प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणा-या प्रियानं केवळ मराठीतच नव्हे तर हिंदीतही पदार्पण केले आहे. अनेक मालिकांमध्ये ती दिसून आली आहे. - सविस्तर वाचा

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com