राज्यात शेतकऱ्यांचा मोर्चा तर रशियात नवाल्नी समर्थक भडकले; देश विदेशातील बातम्या वाचा एका क्लिकवर

टीम ई सकाळ
Sunday, 24 January 2021

राज्यातील ठळक घडामोडी, देश-विदेशसह, मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा आणि कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी राज्यातही शेतकरी राजभवनाच्या दिशने निघाले आहेत. नाशिक ते मुंबई असा मोर्चा सुरु झाला आहे. तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या फाइलमधील शेरा बदलल्याचा धक्कादायक असा प्रकारही घडला आहे. दरम्यान, दिल्लीत प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरु असून त्याआधी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्याचं समोर आलं आहे. रशियामध्ये पुतीन यांचे कट्टर विरोधक अॅलेक्सी नवाल्नी यांना अटक केल्यानं त्यांचे समर्थक आक्रमक झाले आहेत. कडाक्याची थंडी असूनही आंदोलन भडकले आहे. पोलिसांनीही आंदोलकांवर जोरदार लाठीचार्ज केला आहे.

लढणार आणि जिंकणारही...! हजारो शेतकऱ्यांची वाहन मोर्चाद्वारे मुंबईकडे कूच
केंद्र सरकारने शेतकरी हितविरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी ५८ दिवसांपासून दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शनिवारी (ता. २३) संयुक्त किसान कामगार मोर्चाच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी वाहन मोर्चा काढला. वाचा सविस्तर

नेताजींच्या जयंतीनिमित्त मोदींचा लूक चर्चेत; फोटोने मोडला विक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही कार्यक्रमात, दौऱ्यांमध्ये अनेकदा त्यांच्या पेहरावामुळे चर्चेत असतात. लॉकडाऊनच्या काळातही त्यांच्या लूकची चर्चा सातत्याने होत आहे. वाचा सविस्तर

Video: मोदी-ममता एका स्टेजवर, बोलणं तर दूरच एकमेकांकडे पाहणेही टाळलं 
थोर स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 जयंतीनिमित्त शनिवारी प. बंगालमध्ये राजकीय मानापमान नाट्य रंगल्याचे चित्र पाहायला मिळाले. वाचा सविस्तर

फाईलवर मुख्यमंत्र्यांनी केली सही, त्यानंतर शेराच बदलला; मंत्रालयात घडला धक्कादायक प्रकार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या मंत्रालयातील एका महत्त्वाच्या फाईलमधील मजकूर परस्पर बदलण्यात आला आहे. वाचा सविस्तर

रशियात पुतिन यांच्याविरोधात हजारो लोक रस्त्यावर; 3,100 हून अधिक जणांना घेतलं अटकेत 
कडाक्याच्या थंडीत आंदोलनाचा भडका; आक्रमक झालेल्या आंदोलकांना पोलिसांकडून लाठीचार्जसह लाथाबुक्क्यांनी मारहाण.वाचा सविस्तर'

सात मिनिटांत बदलून गेलं तिचं आयुष्य'; 'बेबी'ची सहा वर्षे 
तापसी सध्याच्या घडीला प्रसिध्द अभिनेत्री आहे. तिचे जे चित्रपट आले ते यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. बेबी चित्रपटात तिला भूमिका मिळाली होती. वाचा सविस्तर

प्रजासत्ताक दिनापूर्वी दिल्लीत 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा!
प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवसाआधी राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये 'पाकिस्तान जिंदाबाद'ची घोषणा दिली गेल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. वाचा सविस्तर

एक फेब्रुवारीपासून पॅसेंजर, लोकलसह सर्व ट्रेन रुळावर? जाणून घ्या खरं काय
कोरोनामुळे जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन केलं होतं. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर हळू हळू सर्व व्यवहार पुन्हा सुरु करण्यात आले. वाचा सविस्तर

VIDEO - बछड्याच्या मृत्यूनंतर सिंहिणीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
इतरवेळी सिंह जशी डरकाळी फोडतो त्यापेक्षा आक्रोश करत असताना फोडलेली डरकाळी वेगळी ऐकू येते. व्हिडिओ पाहताच भावनिक होऊन डोळ्यातून पाणी येतं.वाचा सविस्तर

धक्कादायक! बाबा आमटेंच्या प्रकल्पातील चौकीदाराची हत्या; बंधाऱ्यांत आढळला मृतदेह
सोमनाथ प्रकल्प हा कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी ओळखला जातो. या ठिकाणी सावली तालुक्‍यातील गेवरा गावचे रहिवासी नारायण निकोडे हे राहत होते. 2008 मध्ये कुष्ठरोगी म्हणून ते येथे दाखल झाले होते. सविस्तर वाचा

देव तारी त्याला कोण मारी! तब्बल तीन महिने मृत्यूशी झुंजत 'जय'चा मृत्यूवर विजय
रक्तबंबाळ जयला एक तास कोणीच मदत केली नाही. सकाळी साडेसहाला तेथील नागरिकांनी नवसारी येथील हॉस्पिटलमध्ये दूरध्वनी करून रुग्णवाहिका बोलावली.
सविस्तर वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latest news pm modi brazill russia navalny farmers rajbhavan bird flu