esakal | महाराष्ट्रात कोरोनाचा कहर ते फ्रान्समध्ये नवीन स्ट्रेन; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

latest news top 10 maharashtra india covid 19 france new strain finland

राज्यासह देश, विदेशसह मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर ते फ्रान्समध्ये नवीन स्ट्रेन; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असून महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. महाराष्ट्रात सलग दुसऱ्या दिवशी 25 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने खासगी कार्यालये आणि सिनेमागृहांबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशात योगी सरकारला चार वर्षे पूर्ण झाली असून योगींनी रिपोर्ट कार्ड सादर केलं. उत्तराखंडच्या मुख्यंमंत्र्यांनी महिल्यांनी फाटक्या जीन्स घालण्यावरून केलेल्या वक्तव्याबाबत आता नमतं घेतलं आहे. जगात सर्वात आनंदी देश म्हणून फिनलँडनं पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तर आशियात भारतापेक्षा इतर देश आनंदी असल्याचं या यादीत दिसून येतं.

राज्यात पुन्हा एकदा कोरोना विषाणूचा प्रसार वेगाने होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने खाजगी कार्यालये आणि सिनेमागृहांबद्दल एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर

राज्यात पुणे, मुंबई, नागपूर, नाशिकमध्ये सर्वाधिक सक्रीय रुग्ण आहेत. यामध्ये मुंबईच्या तुलनेत पुण्यातील रुग्णांची संख्या ही जवळपास दुप्पट आहे. वाचा सविस्तर

तीरथ सिंह रावत यांनी एका कार्यक्रमात बोलताना महिलांच्या फाटक्या जीन्सवरुन वक्तव्य केलं. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. वाचा सविस्तर

कोरोनाच्या या संकटकाळात शरिरात अँटीबॉडी असलेल्या पहिल्या बाळाचा जन्म अमेरिकेत झाला आहे. एका महिलेने जन्म दिलेल्या मुलीमध्ये अँटीबॉडीज असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. वाचा सविस्तर

फिनलँड सलग चौथ्या वर्षी जगातील सर्वात आनंदी आणि सुखी देश ठरला आहे. संयुक्त राष्ट्राकडून शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार फिनलँडला जगातील सर्वांत सुखी देशाचा मान मिळाला आहे.  पाकिस्तानने भारताला टाकले मागे वाचा सविस्तर

उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ सरकारने आज रिपोर्ट कार्ड सादर केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने आपल्या चार वर्षाच्या सरकारच्या कामगिरीचा आढावा घेतला.  वाचा सविस्तर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेसाठी उमेदवारांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आयोगाने मानक कार्यप्रणाली (एसओपी) शुक्रवारी जाहीर केली आहे. वाचा सविस्तर 

ब्रिटन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेत नवीन स्ट्रेन सापडल्यानं कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. दरम्यान, फ्रान्समध्ये नवीन स्ट्रेन सापडल्यानं खळबळ उडाली आहे. नाकातून स्वॅब घेतल्यानंतरही हा स्ट्रेन ओळखणं कठीण असल्याचं सांगण्यात येत आहे. वाचा सविस्तर

बी टाऊन चे प्रसिध्द दिग्दर्शक अशोक पंडित यांनी भारतीय शेतकरी युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकेत यांच्या मागणीवर जहरी टीका केली आहे. वाचा सविस्तर

थर्ड अंपायरने मैदानातील पंचांनी दिलेला सॉफ्ट सिग्नल कायम राखत सूर्याला बाद घोषीत केले. या निर्णयावरुन अनेक प्रतिक्रिया उमटल्या. यावर खुद्द सुर्यकुमार यादवनेही प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर

loading image