दिल्लीतलं शेतकरी आंदोलन आणि महाराष्ट्रातला मोर्चा,रशियातही सरकार विरोधात लोक रस्त्य्यावर

दिल्लीतलं शेतकरी आंदोलन आणि महाराष्ट्रातला मोर्चा,रशियातही सरकार विरोधात लोक रस्त्य्यावर

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांची निवड झालीय. रशियात अध्यक्ष पुतीन यांच्या विरोधात आंदोलनाचा भडका उडालाय. तर, दिल्ली आणि परिसरात ट्रॅक्टर रॅली (किसान गणतंत्र परेड) करण्यास पोलिसांची परवानगी मिळालीय. तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आझाद मैदानावर धडकलाय. मटण महागल्याची कारणं काय आहेत?, याची पुणेकरांना उत्सुकता आहे. तर, मुंबईतून कोकणात जाण्यासाठी स्पेशल ट्रेन सोडण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नाशिक :  येथे २६ ते २८ मार्चदरम्‍यान होणाऱ्या ९४ व्‍या अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या अध्यक्षपदी पद्मभूषण, पद्मविभूषण, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त मराठी विज्ञान कथालेखक डॉ. जयंत नारळीकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आज 60 वा दिवस आहे. शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या 10 फेऱ्या पार पडून देखील अद्याप कोणताही तोडगा निघाला नाहीये. सविस्तर वाचा

मुंबई  : कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे यांच्यावतीने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी मुंबई-मडगाव विशेष ट्रेनची भेट दिली आहे. 1 एप्रिल ते 9 जूनपर्यंत दररोज मुंबई-मडगाव सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध असणार आहे.  सविस्तर वाचा

मुंबई : मोदी सरकारने आणलेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधात दिल्ली पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्यातही वातावरण तापलं आहे. केंद्र सरकारचा निषेध करीत महाराष्ट्रातल्या नाशिक येथून शेतकरी मुंबई- आझाद मैदानाकडे कूच करण्यापूर्वी नाशिकमधील गोल्फ क्लब मैदानावर शेतकरी जमले होते. सविस्तर वाचा

सातारा  :
 भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (रविवार) बारामती येथे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची मतदारसंघातील कामा संदर्भात भेट घेतली. सविस्तर वाचा

पुणे :  बर्ड फ्लूमुळे ग्राहकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. चिकनच्या मागणीत साधारणतः ३० टक्क्यांनी घट झाली आहे. तर मटण, मासळीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणत्याही कार्यक्रमात, दौऱ्यांमध्ये अनेकदा त्यांच्या पेहरावामुळे चर्चेत असतात. लॉकडाऊनच्या काळातही त्यांच्या लूकची चर्चा सातत्याने होत आहे. सविस्तर वाचा

मॉस्को : रशियात काळ्या समुद्राजवळ एक अभेद्य किल्ला आहे. यात सर्व अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली आहे. परवानगीशिवाय याठिकाणी पक्षीही प्रवेश करु शकत नाही. सर्व सुखसोयींनी युक्त असलेल्या या किल्ल्याची किंबहुना शहराची आपण फक्त कल्पनाच करु शकतो. सविस्तर वाचा

मॉस्को : रशियात पुतिन सरकारच्या विरोधात -50 डिग्री तापमान असताना देखील लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. राजधानी मॉस्कोमध्ये पोलिस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये हिंसक झटापट देखील घडली. सविस्तर वाचा

टीम इंडियाने दुखापतीचं ग्रहण लागूनही बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील विजयी रुबाब कायम राखण्यात यश मिळवले. यापूर्वी 2018 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने कांगारुंना घरच्या मैदानावर ठेचले होते. सविस्तर वाचा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com