Whatsapp बॅकफूटवर ते देशभरात कोरोनाचे लसीकरण, महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळ ऑनलाइन टीम
Saturday, 16 January 2021

प्रचंड टीका आणि विरोधाचा सामना केल्यानंतर इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन व्हॉट्सअपने आपली नवी डेटा-शेअरिंग पॉलिसी सध्या स्थगित केली आहे.

Whatsapp बॅकफूटवर; प्राइव्हसी अपडेट पॉलिसी स्थगित, 8 फेब्रुवारीनंतरही युजर्सचं अकाऊंट सुरु राहणार
प्रचंड टीका आणि विरोधाचा सामना केल्यानंतर इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप्लिकेशन व्हॉट्सअपने आपली नवी डेटा-शेअरिंग पॉलिसी सध्या स्थगित केली आहे. नव्या पॉलिसीत फेसबुक आणि इन्स्टाग्रामचे इंटिग्रेशन जास्त होते. त्यामुळे युजर्सला व्हॉट्सअप डेटा फेसबुकवरुनही शेअर करता येतो. व्हॉट्सअपची मालकी फेसबुककडे आहे. -सविस्तर वाचा

राज्यासह देशभर आजपासून लसीकरण; पंतप्रधान मोदींच्या हस्ते आजपासून प्रारंभ 
अवघा देश ज्याची मोठ्या आतुरतेने वाट पाहत होता ती घटिका समीप आली आहे. कोरोना महामारीवरील देशव्यापी लसीकरणास आजपासून (ता.१६) देशातील १६ राज्यांत प्रारंभ होईल. जगातील ही सर्वांत मोठी लसीकरण मोहीम असेल. - सविस्तर वाचा

धोकादायक 50 पासवर्ड ज्यामुळे होऊ शकते फसवणूक; चेक करा तुम्हीही ठेवलाय का?
जर तुम्हाला तुमचा सोशल मीडियावरील डाटा, ऑनलाईन व्यवहाराची माहिती, पासवर्ड आणि इतर महत्त्वाची माहिती सुरक्षित ठेवायची असेल तर तुम्हाला तुमचा पासवर्ड स्ट्राँग ठेवावा लागेल. त्यामुळे तुमचे पासवर्ड कोणी क्रॅक करु शकणार नाही आणि सायबर हल्ल्यापासून तुमचे संरक्षण होईल. - वाचा सविस्तर

पित्यानं ठेवलं मुलाचं नाव 'राष्ट्रपती'; " बेटा बडा नाम करेगा ... पित्याची अपेक्षा!
अलीकडच्या काळात स्त्री जन्माच्या स्वागताची प्रथा रूढ झाली आहे. वंशाचा दिवा म्हणून मुलाच्या जन्माचेही मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते. आधुनिक युगात नव्याने जन्मलेल्या बाळांचे नामकरण आगळ्या - वेगळ्या स्वरुपाचे असते. उस्मानाबाद तालुक्यातील चिंचोली (भूयार) येथील तरुण दत्ता चौधरी यांनी मुलाचे नाव चक्क "राष्ट्रपती" ठेवल्याने चर्चेचा विषय ठरला आहे. - वाचा सविस्तर 

राज्यात आज लसीकरणाचा श्रीगणेशा; 28 हजार 500 जणांना देणार डोस
कोरोना प्रतिबंधक लस राज्यातील 28 हजार 500 आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शनिवारी (ता. 16) घेता येईल, अशी व्यवस्था सार्वजनिक आरोग्य विभागाने केली आहे. राज्यात 285 लसीकरण केंद्र पहिल्या दिवशी कार्यान्वित होणार असून, प्रत्येक केंद्रावर दिवसभरात 100 कोरोना योद्‌ध्यांना लस दिली जाणार आहे. - वाचा सविस्तर

‘सेंट्रल व्हिस्टा’चे बांधकाम सुरू; संसदेची नवीन इमारत २०२२ पर्यंत पूर्ण होणार
केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या ‘सेंट्रल व्हिस्टा’चे बांधकाम शुक्रवारी सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ महिनाभरापूर्वी पार  पडला होता. - वाचा सविस्तर

'त्या' रात्री १० नाही ११ जीव गेलेत; भंडारा आग प्रकरणात मोठा ट्विस्ट; खळबळजनक आरोप
काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेनं महाराष्ट्रासह संपूर्ण देश हादरला. ती घटना म्हणजे भंडारामधील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास लागलेली आग. या आगीत तब्बल १० नवजात शिशुंचे प्राण गेले. मात्र आता या प्रकरणात ट्विस्ट आला आहे. दिनेश रोहनकर नावाच्या व्यक्तीनं एक खळबळजनक आरोप केला आहे. - वाचा सविस्तर

पेट्रोल भडकतेय ! सोलापूर शहरात पेट्रोल 91 रुपये लिटर; सर्वसामान्यांच्या खिशावर वाढला भार
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. त्याप्रमाणे गेल्या आठवडाभरापासून पेट्रोल व डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. सोलापूर शहरात शुक्रवारी पेट्रोल प्रतिलिटर 91.24 पैसे तर डिझेलचे दर प्रतिलिटर 79.76 पैसे झाले आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना महामारीमुळे लॉकडाउन असल्याने उद्योग- व्यवसाय बंद होते, त्यामुळे सर्वजण घरी होते. - वाचा सविस्तर

"ड्रायव्हरलेस मेट्रो' लवकरच मुंबईच्या सेवेत; संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते कोचचे अनावरण
मेट्रो- 2 अ आणि मेट्रो- 7 या दोन्ही मेट्रो प्रकल्पाची ट्रायल रन लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी या मार्गासाठी लागणाऱ्या मेट्रो कोचचे अनावरण शुक्रवारी (ता. 15) केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते बंगळूरु येथे करण्यात आले. आता लवकरच या दोन्ही मार्गासाठी लागणारे मेट्रो कोच मुंबईत दाखल होणार आहेत. अनावरण झालेल्या मेट्रो या ड्रायव्हरलेस तंत्रावर आधारित आहेत. - वाचा सविस्तर

शिवसेनेचे नगरसेवक आज मुख्यमंत्र्यांच्या दरबारी; 'या' विषयांवर होणार चर्चा
पुढील वर्षाच्या सुरवातीला महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार असून, या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीची रणनीती आखण्याबरोबरच चार वर्षांत नगरसेवकांनी केलेली कामे, भविष्यातील प्रस्तावित कामे व कुठल्या मुद्यावर निवडणूक लढवायची, याविषयांवर शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांची बैठक शनिवारी दुपारी चारला होणार आहे. - सविस्तर वाचा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morning news latest update whatsapp privacy policy coronavaccination pm narendra modi central vista bhandara fire shivsena

टॉपिकस