महेश मांजरेकरांची 'कानशिलात' ते राम कदमांची 'तांडव' प्रतिक्रिया; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळ न्यूज नेटवर्क
Sunday, 17 January 2021

महत्त्वाच्या बातम्या येथे वाचा

हिंदी चित्रपटातील जेष्ठ कलाकार, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नुकतीच प्रदर्शित झालेली सीरिज तांडव वादामध्ये अडकली आहे. सपा खासदार मोहम्मद आजम खान यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे.  चीनमध्ये आईस्क्रीममध्येही कोरोनाचा विषाणू सापडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आईस्क्रीम खाणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात आहे.

मांजरेकरांची भररस्त्यात दादागिरी? गाडीला धक्का लागल्याने मारहाण केल्याचा आरोप
मराठी- हिंदी चित्रपटातील जेष्ठ कलाकार, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपणास शिवीगाळ व मारहाण केली. अशी तक्रार कैलास भिकाजी सातपुते (रा. टेंभुर्णी जि. सोलापूर) यांनी यवत पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. सविस्तर बातमी-

‘कायम हिंदू देव-देवतांचा अपमान का?’; तांडव पाहू नका

आपल्याकडे प्रदर्शित होणा-या अनेक मालिका किंवा चित्रपट या वादाच्या भोव-यात सापडताना दिसतात. यापैकी काही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी वाद तयार करतात. सोशल मीडियावर त्याबद्दल पोस्ट शेयर करुन जनसामान्यांच्या भावना दुखावण्याचे काम करतात. सविस्तर बातमी-

'लिबर्टी'पेक्षा 'युनिटी'चा पुतळा पहायला येतात सर्वाधिक लोक; 8 नव्या रेल्वेच्या उद्घाटनप्रसंगी म्हणाले PM मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रविवारी गुजरातच्या केवाडियामध्ये 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'शी जोडणाऱ्या आठ नव्या रेल्वेंचा सकाळी 11 वाजता हिरवा झेंडा दाखवून शुभांरभ केला. सविस्तर बातमी-

आझम खान यांना मोठा झटका; योगी सरकारला द्यावी लागणार 70 हेक्टर जमीन
सपा खासदार मोहम्मद आजम खान यांना आणखी एक मोठा झटका बसला आहे. रामपूर एडीएम जगदंबा प्रसाद गुप्ताच्या कोर्टने जौहर यूनिव्हर्सिटीची 70 हेक्टर जमीन उत्तर प्रदेश सरकारच्या नावाने करण्याचा आदेश दिला आहे. सविस्तर बातमी-

चीनमध्ये आईस्क्रीमलाही झाला कोरोना; बॉक्स बाजारात पोहोचल्याने खळबळ
कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण सापडलेल्या चीनमधून आणखीने एक खळबळ उडवणारी बातमी कळत आहे. चीनमध्ये आईस्क्रीममध्येही कोरोनाचा विषाणू सापडला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आईस्क्रीम खाणाऱ्या लोकांचा शोध घेतला जात आहे. सविस्तर बातमी-

राम मंदिराच्या नावाखाली देणगीची अवैध वसुली; राष्ट्रीय बजरंग दलाविरोधात FIR 
अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभारण्यासाठी देणगी दिली जावी यासाठी हिंदू संघटना जागरुकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, एक धक्कादायक माहिती जनपद मुरादाबादमधून समोर आली आहे. सविस्तर बातमी-

शेतकरी समर्थकांना NIA कडून समन्स; बादल म्हणाले, हेतूपुर्वक त्रास देतंय सरकार 
 राष्ट्रीय तपास संस्थे (NIA) ने शेतकरी नेता बलदेव सिंह सिरसा आणि पंजाबी ऍक्टर दीप सिद्धू यांच्यासहित 40 जणांना समन्स पाठवून आज रविवारी चौकशीसाठी बोलावलं गेलं आहे. अकाली दलचे नेता सुखबीर सिंह बादल यांनी केंद्र सरकारच्या एजन्सीद्वारे केल्या गेलेल्या या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे. सविस्तर बातमी-

VIDEO : धावत्या गाडीत प्रवाशासहित ड्रायव्हरही झोपलेला; भारतात येणाऱ्या टेस्ला कारचा व्हायरल व्हिडीओ
टेस्ला कंपनीच्या गाड्या ऑटोपायलट फीचरचा दावा करतात. याचा अर्थ असा की या गाड्या रस्त्यावर ड्रायव्हरशिवाय आपोआप धावू शकतात. सविस्तर बातमी-

Corona Update : गेल्या 24 तासांत नवे 15,144 रुग्ण; 181 रुग्णांचा मृत्यू

काल देशभरात लसीकरणास सुरवात झाली. देशात ठिकठिकाणच्या लसीकरण केंद्रामध्ये ही प्रक्रिया सुरु करण्यात आली. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी देशभरातील एक लाख 65 हजार करोना योद्ध्यांना लशीची पहिली मात्रा टोचण्यात आली. सविस्तर बातमी-

कंपाऊंडर डोक्यावर पडलेत का?, संदीप देशपांडेंची संजय राऊतांवर खोचक टीका
सामनामध्ये कोरोना लसीकरणाच्या बातमीला लसकर-ए-कोरोना असं शिर्षक देण्यात आलं आहे. लसकर- ए- कोरोना सामनामध्ये हेडिंग दिल्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांनी टीका केली आहे. सविस्तर बातमी-

तुला परत मानलं रे ठाकूर! मराठमोठ्या शार्दुलसाठी विराटचं पुन्हा मराठीत ट्विट

शार्दुल ठाकूरने  115 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 67 धावांची खेळी केली. त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे पहिले अर्धशतक ठरले. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियातील पहिल्या डावात 3 विकेटही मिळवल्या होत्या. सविस्तर बातमी- 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: top 10 news latest news marathi news maharashtra india mahesh majrikar tandav farmer law