...आणि असे झाले तुरुंगात हळदीकुंकू

Makar sankranti celebreat in Harsul jail
Makar sankranti celebreat in Harsul jail

औरंगाबाद : एका चूकीने कारागृहात नेले अन..तिथल्याच चार भिंतीआतच आयूष्य व्यतीत करण्याची वेळ आली. घरी सण वार, उत्सव साजरे करताना आधी खूप आनंद व्हायचा.

पण कारागृहात मात्र निरुत्साह आणि वेदना. पण या वेदनांवर फुंकर घालण्यासाठी र्हसूल मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने एका प्रयत्नातून या महिलांच्या आयूष्यात थोडे क्षण का होईना पण आनंदाचा गोडवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

निमित्त होते मकर संक्रांती सणाचे. कैदी महिलांसाठी बुधवारी (ता. 15) गुरु गौतम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, महिला बालविकास बहुउद्देशीय संस्था हडको व विमला सदन औरंगाबाद या संस्थेमार्फत कारागृहातील महिला बंदी करिता हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवण्यात आला.

या कार्यक्रमात कैदी महिलांसाठी गायनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. संक्रातीच्या दिवशी हळदी कुंक व संगीत कार्यक्रमाने कैदी महिलाही हरखुन गेल्या.

कार्यक्रमाला महिला व बालविकास बहुउद्देशीय संस्था हडको येथील अध्यक्षा मंगलाताई रघुनाथ टोणपे, ऍड. माधुरी अदवंत, गुरु गौतम बहुद्देशिय सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा मनीषा भनसाळे, सिस्टर लियोनी यांची तसेच कारागृहाचे अधिक्षक हिरालाल राठोड यांच्यासह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थिती होते. 

आमदारांचीही कारागृहात उपस्थिती 
मकर संक्रांतीनिमित्त कारागृहात कैद्यांसाठी "तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल यांची उपस्थिती होती. श्री. जैस्वाल यांनी कैद्यांना समुपदेशन व मार्गदर्शन केले. 

चायनीज, नायलॉन 
मांजा विक्रेत्यांवर छापे 

औरंगाबाद : मकरसंक्रांतीच्या सणानिमित्त जागोजाग मांजा, पतंग विक्री होत आहे. परंतु मनाई असूनही चायनीज व नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यावर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली.

सोमवारी तीनजणांवर कारवाई झाल्यानंतर मंगळवारी (ता. 15) आणखी तिघांवर कारवाई करण्यात आली. छावणी भागात राधेश्‍याम रमेशसिंग सूर्यवंशी (वय 25) या विक्रेत्यावर छापा घालून पोलिसांनी नऊशे रुपयांचा मांजा जप्त केला. यात विक्रेत्यावर छावणी ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली.

विजयनगर येथे विजय जीवन बडवणे या विक्रेत्याच्या दुकानावर छापा घालून पोलिसांनी मांजा जप्त केला. याच भागात ऋषिकेश रमेश पालोदकर यांच्या परी पतंग मार्ट या दुकानावर छापा घालून पोलिसांनी मांजा जप्त केला. दोघांविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली. 

हेही वाचा -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com