कल्याण डोंबिवलीतील रस्ते चकाचक दिसतील: आयुक्त पी. वेलरासु

रविंद्र खरात
रविवार, 23 जुलै 2017

कचरा प्रश्न गंभीर
कचरा प्रश्न हा गंभीर आहेच मात्र मी पदभार घेतल्यापासून कचरा प्रश्नी दोन वेळा आढावा बैठक घेतली आहे. नियोजन आखून दिले असून काही ठिकाणी काम सुरु आता यापुढे अशा तक्रारी आल्यास अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची गय केली जाणार नसल्याचे पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी स्पष्ट केले आहे.

 कल्याण : मागील वर्षी पेक्षा यावर्षी रेकॉर्ड पाऊस पड़त असून त्यामुळे शहरातील रस्ते खराब झाले आहेत. ते खड्डे खड़ी टाकून बुजविले जात आहेत. मात्र पावसात ते टिकत नाही, त्याला पर्याय ही नाही, मात्र गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्ते चकाचक दिसतील अशी माहिती कल्याण डोंबिवली महानगर पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी सकाळला दिली.

कल्याण पूर्वमधील पूनालिंक रोड, हाजी मलंगरोड, कल्याण पूर्वमधील अंतर्गत रस्ते खड्डेमय झालेच त्यासोबत धर्मवीर आनंद दिघे उड़ान पुलावरही ही खड्डे पडले असून कल्याण पश्चिम, कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीमधील प्रमुख रस्ते खड्डेमय झाले आहेत. याबाबत पालिका आयुक्त पी. वेलरासु यांचे लक्ष्य वेधले असता ते म्हणाले, की मागील वर्षीपेक्षा मुसळधार पाऊस यावर्षी सुरु आहे. पाऊस सुरु असताना खड्डे बुजविणे म्हणजे खर्च वाया घालविने आहे. म्हणून, जे महत्त्वाचे रस्ते आहेत ते ही दुरुस्त करण्याचे प्रयत्न केले. मात्र पावसाने आणखी खड्डे झाले. यामुळे आता खड़ी टाकण्यात येत असून गणेशोत्सव पूर्वी रस्ते चकाचक करा असे आदेश दिल्याचे यावेळी स्पष्ट केले.

कल्याण स्कायवॉक फेरीवाला मुक्त
कल्याण रेल्वे स्थानक परिसर आणि स्कायवॉक फेरीवाला मुक्त व्हावा, यासाठी कारवाई सुरु आहे. मात्र पुन्हा पुन्हा ते फेरीवाले बसत असल्याने आता कठोर निर्णय घेवून ते बसणार यासाठी आराखडा लवकरच बनवू असे पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी सांगितले.

कचरा प्रश्न गंभीर
कचरा प्रश्न हा गंभीर आहेच मात्र मी पदभार घेतल्यापासून कचरा प्रश्नी दोन वेळा आढावा बैठक घेतली आहे. नियोजन आखून दिले असून काही ठिकाणी काम सुरु आता यापुढे अशा तक्रारी आल्यास अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची गय केली जाणार नसल्याचे पालिका आयुक्त पी. वेलरासु यांनी स्पष्ट केले आहे.

कारणे दाखवा नोटिस
पालिकेच्या प्रभारी मुख्य आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. स्मिता रोडे यांच्याकडून पालिका रुग्णालयामधील डॉक्टर वर्गाचा अपमान केला जातो. काम करत असताना काम करत नसल्याचा आरोप करत निलंबित करेल असे धमकावले, पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्या पूर्व परवानगी न घेता बदली करणे. मानसिक छळ करणे अश्या तक्रारी प्राप्त झाल्या असून याबाबत डॉ रोडे यांना कारणे दाखवा नोटिस बजावली असून 3 दिवसात लेखी उत्तर मागितले असून तदनन्तर कारवाई करू अशी माहिती पालिका आयुक्त वेलरासु यांनी सकाळला दिली.

रेकॉर्ड ब्रेक पाऊस सुरु
मागील वर्षी 1 जून ते 31 ऑक्टोबर 2016 या कालावधीत कल्याण, डोंबिवली शहरी आणि ग्रामीण भागात एकूण 2454 मिमी पाऊस पडला होता. तो 1 जून ते 23 जुलै 2016 पर्यंत 1433. 85 मिमी पाऊस पडला होता. तर मागच्या वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यात मागील वर्षाचा रेकॉर्ड तोड़त पाऊस सुरु आहे. या वर्षी 1 जून ते 23 जुलै 2017 या कालावधीत 1853 मिमी पाऊस पडला असून केवळ जुलै महिन्याच्या 23 दिवसात 1023.40 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मागील आठ ते दहा दिवस पाऊस सुरु असून सर्व सरकारी आपत्कालीन यंत्रणा सज्ज असून नदी, नाले आणि सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या :

Web Title: Mumbai news Kalyan Dombivali municipal corporation road work