Viral Satya : चक्क विमानातून भात पेरणी! (Video)

सकाळ वृत्तसेवा
Monday, 23 September 2019

भाताची पेरणी, लावणी कशी करतात हे आपण पाहिल आहे. पण, आता शेतकरी विमानातून भात पेरणी करत आहेत. ही भात पेरणी बघा भलतीच वेगळी आहे.

भाताची पेरणी, लावणी कशी करतात हे आपण पाहिल आहे. पण, आता शेतकरी विमानातून भात पेरणी करत आहेत. ही भात पेरणी बघा भलतीच वेगळी आहे. या छोट्याश्या विमानात भात ठेवण्यासाठी स्वतंत्र कप्पा तयार करण्यात आलाय. मग हे विमान आकाशात झेपावलं की आपल्याला ज्या ठिकाणी भात पेरणी करायचीय तिथे विमानातून भात पेरला जातो.

या विमानात दोन ते तीन व्यक्ती आहेत. या शेतकऱ्याकडे शंभर ते दीडशे एकर जमीन आहे. इतक्या मोठ्या शेतात भात पेरणी करणं म्हणजे एक दोन दिवसाचं काम नव्हे. मजूर आणि एक महिन्याचा कालावधी या शेतीसाठी लागू शकतो. त्यामुळंच शेतकऱ्यानं विमानासारखा पर्याय निवडला आणि विमानातून भाताची पेरणी केली. पेरणीसाठीचा भात भरण्यासाठी विमानात एक स्वतंत्र कप्पा तयार केला. या कप्प्यात भात भरल्यानंतर शेतकरी विमानासह आकाशात झेपावतो. विमानात लावलेल्या विशेष सेन्सरच्या सहाय्याने ही पेरणी केली जाते. या सेन्सरच्या हिरव्या लाईट पेटल्यानंतर तो बियाणे खाली सोडतो. लाल दिवे पेटल्यावर बियाणे खाली सोडण्याचे बटण बंद करतो. त्याची ही हवाई पेरणी कमी वेळेत जास्त काम करणारी ठरते.

हा सगळा प्रकार अमेरिकेतील कॅलिफोर्नियात पाहायला मिळाला. अमेरिकेतील भात शेतीचे क्षेत्र मोठ मोठे आहेत. त्यामुळं मशीनच्या सहाय्यानं भातशेती केली जाते. भात कापणीही तिथले शेतकरी मशीनच्या सहाय्यानं करतात. पण, विमानानं भात पेरणी करत असल्यानं हा विषय चर्चेचा बनला आहे.

***************************************************************

आणखी वाचा  : 

Viral Satya : सावधान! कलर टॅटू ठरतोय शरीरासाठी घातक? (Video)

Viral Satya : व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनची ग्रुप मेंबरला पार्टी (Video)

Viral Satya : बंद बॅगेतून 5 महिन्यांच्या बाळाचा 1180 किमी प्रवास (Video)

Viral Satya : नागिन डान्स केला आणि जीव गेला! (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : पाकिस्तानात एक्सरे मशीनमधून निघाली माणसं ! (Video)

Viral Satya : गाडी चालवताना झोप लागल्यास उठवणारं यंत्र? (Video)

Viral Satya : आता मिळणार तिखट टोमॅटो? (Video)

Viral Satya : मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी? (Video)

Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video)

Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video)

***************************************************************


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Satya Video Sowing rice from the plane