today
today 
देश

पुण्यात लॉकडाऊन नाहीच ते GST मुळे मोदी सरकार मालामाल; ठळक बातम्या क्लिकवर

सकाळन्यूजनेटवर्क

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 43,183 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे, तर 32,641 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलंय. गेल्या चोवीस तासांत 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मृतांचा आकडा वाढला असल्याचं दिसत आहे.लागोपाठ सहाव्या महिन्यात जीएसटीचा (वस्तू आणि सेवा कर) महसूल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. गुरुवारी अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात एक लाख २३ हजार ९०२ कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील रस्ते बांधणीसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. गडकरींनी महाराष्ट्रातील रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरणासाठी तब्बल २७८० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. कोरोना महामारी थैमान घालत असताना जपानमध्ये जूलै महिन्यात ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित आहे. त्यातच जपानमध्ये कोरोनाची चौथी लाट आली असून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे जापनिज लोक या ऑलिम्पिक स्पर्धांना विरोध करताना दिसत आहे.

Corona Update:  महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 43,183 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे, तर 32,641 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलंय. गेल्या चोवीस तासांत 249 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मृतांचा आकडा वाढला असल्याचं दिसत आहे. वाचा सविस्तर-

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादार यांच्यासोबत बैठकीनंतर चाकण येथील एअर लिक्विड ऑक्सिजन कंपनीत जाऊन आढावा घेतला. वाचा सविस्तर-

शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत प्रशासनाकडून लॉकडाउनचा प्रस्ताव दिला जाणार नाही. मात्र, आणखी कडक निर्बंध लावण्याची आवश्यकता आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. वाचा सविस्तर-

सुपरस्टार रजनीकांत यांना दादा साहेब फाळके पुरस्कार दिला जात असल्याची घोषणा केंद्रीय सूचना आणि प्रचारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली होती. यादरम्यान विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर ते भडकल्याचं पाहायला मिळालं. वाचा सविस्तर-

 मुंबईत कोरोना रुग्णांसह मृत्यूचा आकडा वाढल्याने चिंता वाढली आहे. नव्या रुग्णांचा आज विस्फोट झाला असून एकूण 8646 नवीन कोरोना रुग्णांची भर पडली. तर आज 18 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत असल्याचे दिसत आहे. वाचा सविस्तर-

लागोपाठ सहाव्या महिन्यात जीएसटीचा (वस्तू आणि सेवा कर) महसूल एक लाख कोटी रुपयांच्या पुढे गेला आहे. गुरुवारी अर्थ मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात एक लाख २३ हजार ९०२ कोटी रुपयांचा जीएसटी जमा झाला आहे. वाचा सविस्तर-

म्यानमारमध्ये लष्करी बंडानंतर नागरिकांची सुरक्षा अत्यंत धोक्यात आली असून त्यामुळे अनेक नागरिक थायलंड आणि भारताच्या सीमा ओलांडत बेकायदा स्थलांतर करत असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या म्यानमारबाबतच्या विशेष दूत ख्रिस्टीन बर्गनर यांनी निदर्शनास आणून दिले असून, स्थलांतराची ही केवळ सुरुवात असू शकते असा इशाराही दिला आहे. वाचा सविस्तर-

बॉलीवूडचे दिवंगत प्रसिध्द अभिनेते कादर खान यांच्या मोठ्या मुलाचे अब्दुल कुद्दुसचं निधन झालं आहे. त्याच्या बातमीचे वृत्त ऐकताच बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. वाचा सविस्तर-

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील रस्ते बांधणीसाठी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. गडकरींनी महाराष्ट्रातील रस्त्यांची पुन:बांधणी आणि विस्तारीकरणासाठी तब्बल २७८० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. वाचा सविस्तर-

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा झाली. पुरस्काराची घोषणा होताच रजनीकांत यांना आनंद झाला असेल की आश्चर्य वाटले असेल हे देवच सांगू शकेल. वाचा सविस्तर-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही रजनीकांत यांना पुरस्कार जाहीर झाल्यावर त्यांचे विशेष शब्दात अभिनंदन केलं. वाचा सविस्तर-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : जीएसटी फक्त अदानींच्या फायद्याचा- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT