breakfast updates
breakfast updates 
देश

व्याजदर कपातीवरून मोदी सरकारचा यू टर्न ते फ्रान्समध्ये पुन्हा लॉकडाऊन; वाचा एका क्लिकवर

सकाळ डिजिटल टीम

अल्पबचत व्याजदर कमी करण्याचा निर्णय मोदी सरकारने 24 तासांच्या आत मागे घेतला आहे. निर्णयानंतर मोठ्या प्रमाणावर याविरोधात टीका केली जात होती. आता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या ट्विटवरून अनेक नेत्यांनी सरकारला टोला लगावला आहे. दरम्यान, कृषी कायद्याबाबत न्यायालयाच्या त्रिसदस्यीय समितीने अहवाल सादर केला असून तो शेतकरी हिताचाच असल्याची माहिती अनिल घनवट यांनी दिली आहे. देशातील गॅस सिलिंडर दरांमध्ये कपात झाली असून दहा रुपयांनी स्वस्त झाला आहे. खासदार आणि अभिनेत्री किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाल्याचं निदान झालं आहे. 

मोदी सरकारने अल्पबचत योजनांवरील व्याजदरात मोठी कपात केली होती. मात्र, आता मोदी सरकारने हा निर्णय मागे घेतला आहे. वाचा सविस्तर 

व्याजदर कपातीचा निर्णय नजरचुकीने निघाला असल्याचं म्हणत निर्णय मागे घेतल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. मोदी सरकारच्या या युटर्नवर सुब्रमण्यम स्वामींनी टोला लगावला आहे. वाचा सविस्तर 

सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांच्या अंमलबजावणीला यापूर्वीच स्थगिती दिली आहे. कृषी सुधारणा कायद्यांबाबत न्यायालयाच्या तीन सदस्यीय समितीने सीलबंद लिफाफ्यात नुकताच अहवाल सादर केला. समितीचा अहवाल शेतकऱ्यांच्या हिताचाच; अनिल घनवट यांची माहिती वाचा सविस्तर 

घरीच विलग असलेल्या कोरोना रुग्णांनो, बाहेर पाय ठेवू नका. गल्लीबोळात उगाचच फेरफटका मारण्याचा विचारही करू नका. घराबाहेर पडल्यास गुन्हा; हातावर मारणार शिक्के वाचा सविस्तर 

फ्रान्समध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने सरकारला पुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यास भाग पाडलं आहे. राष्ट्रपती इमॅन्यूअल मॅक्रॉन यांनी बुधवारी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्याचा आदेश दिला.  वाचा सविस्तर 

घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये कपात झाली आहे. इंडियन ऑयल कॉर्पोरेशननं घरगुती गॅस सिलिंडरमध्ये दहा रुपयांनी कपात केल्याचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर 

सावधान! Fake सिस्टिम अपडेटचं जाळं; अँड्रॉइड युजर्सचा डेटा होतोय चोरी. स्मार्टफोन युजर्सना सतत काही ना काही अपडेट येत असतात. आता अशाच अपडेटचा वापर करून हॅकर्सकडून युजर्सना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. वाचा सविस्तर 

भारतीय जनचा पार्टीच्या चंदीगडच्या खासदार आणि अभिनेत्री किरण खेर यांना ब्लड कॅन्सर झाला आहे. मुंबईतच त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती भाजपाच्या सहकाऱ्याने दिली. वाचा सविस्तर 

पगलैट - गोष्ट वेडेपणातील शहाणपणाची; आजच्या जमान्यातील, अत्यंत पुरोगामी विचारांची मुलगी विधवा झाल्यास काय परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा विचार उमेश बिश्त या लेखक दिग्दर्शकानं ‘पगलैट’ या चित्रपटात केला आहे. वाचा सविस्तर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT