रखमाबाई
रखमाबाई 
महाराष्ट्र

पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाईंना गुगलचं अभिवादन!

वृत्तसंस्था

मुंबई : ब्रिटीशकालीन भारतातील पहिल्या महिला डॉक्टर रखमाबाई राऊत यांच्या जन्मदिनानिमित्त गुगलने आज एक खास डुडल तयार करून त्यांना अभिवादन केले आहे. ज्यावेळी महिलांना कोणत्याही प्रकारचे हक्क, अधिकार, महत्त्व नव्हते, अशा काळात रखमाबाईंनी रूग्णांची वैद्यकीय सेवा केली.

मराठमोळ्या स्त्रीच्या पोशाखात गळ्यात स्टेथोस्कोप घातलेल्या रखमाबाई रुग्णांना तपासत आहेत असे चित्र गुगलने खास डूडलद्वारे प्रसिद्ध करून अभिवादन केले आहे. २२ नोव्हेंबर १८६४ रोजी मुंबईत जन्मलेल्या रखमाबाई राऊत यांचा आज १५३ वा जन्मदिन आहे. त्यांना रखमाबाई या नावाने ओळखले जाते. त्या ब्रिटीश काळातील पहिल्या महिला भारतीय डॉक्टर होत्या. रुग्णसेवा करतानाच भारतीय महिलांच्या अधिकारासाठीही संघर्ष केला होता. बालविवाहाची प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी दिलेलं योगदान उल्लेखनीय आहे.

वयाच्या अकराव्या वर्षीच रखमाबाई यांचे 19 वर्षीय दादाजी भिकाजी यांच्याशी लग्न झाले. मात्र, आईच्या घरी राहूनच त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. नंतर त्यांनी पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १८८४ मध्ये दादाजींनी वैवाहिक अधिकार मिळविण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयानेही रखमाबाईंना वैवाहिक अधिकाराचं पालन करा अथवा तुरुंगात जा अशी तंबी दिली. मात्र रखमाबाईंनी अजाणत्या वयात सहमती शिवाय झालेला विवाह आपण मानत नाही असे सांगून पतीकडे नांदायला जाण्यास स्पष्ट नकार दिला. हे प्रकरण तत्कालीन समाजसुधारक रमाबाई रानडे, बेहरामजी मलबारी यांच्यापर्यंतही गेले. अखेर रखमाबाई यांच्या पतीने काही रक्कम घेऊन घटस्फोट घेतला.

हा खटला त्यावेळी वृत्तपत्रांतून खूप गाजला. रखमाबाई यांच्या आईचे 14 व्या वर्षी लग्न झाले होते. पंधराव्या वर्षी त्यांनी रखमाबाई यांना जन्म दिला, आणि 17 व्या वर्षी त्या विधवा झाल्या होत्या.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मानवतेला धक्का देणारी घटना! पतीसोबत भांडण झाल्यावर आईने 6 वर्षाच्या मुलाला केलं मगरीच्या हवाली

Latest Marathi News Update : पक्षाच्या वरिष्ठांनी माझ्या पत्राचा विचार केल्याने राजीनामा मागे घेत आहे- नसीम खान

Google Ads Policy: डीपफेक पॉर्न बनवणाऱ्या अ‍ॅप्सवर गुगल करणार सर्जिकल स्ट्राईक, कडक केले जाहिरातीचे नियम

Kidney Transplant : आईने किडनी देऊन मुलाला दिले जीवनदान ; नांदेड येथे यशस्वी किडनी प्रत्यारोपण

Car Care Tips : ‘या’ चुकांमुळे कमी होऊ शकते इलेक्ट्रिक कारची रेंज, अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT