Director General of Police Satish Chandra Mathur
Director General of Police Satish Chandra Mathur 
महाराष्ट्र

'मारहाण न करता तपास करण्याच्या सूचना'

सूर्यकांत नेटके

पोलिस महासंचालक सतीशचंद्र माथूर; सांगलीची घटना वाईट

नगर: सांगली येथे झालेला प्रकार म्हणजे पोलिसांनी कार्यक्षेत्राबाहेर जाऊन केलेले कृत्य आहे. त्याबाबत पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेऊन त्यांना खात्यातून काढून टाकले आहे. राज्यात असे प्रकार  पुन्हा घडू नयेत यासाठी 26 नोव्हेबरला वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत. मारहाण न करता तपास करण्याबाबत लेखी सूचना दिल्या आहेत, असे राज्याचे पोलिस महासंचालक सतीशचंद्र माथूर यांनी सांगितले. नगर जिल्हामध्ये पोलिस बळ वाढण्यासाठी प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

राज्याचे पोलिस महासंचालक सतीशचंद्र माथूर यांनी आज (बुधवार) नगरला भेट देऊन कामाचा आढावा घेतला. त्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'सांगलीतील घटना वाईट आहे. पोलिसांनी अधिकाराचा वापर करुन वाईट काम केले आहे. त्यांना त्याची शिक्षा मिळेल, मात्र असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घेतली जाईल. कोणत्याही आरोपीला मारहाण न करता गुन्ह्याचा तपास व्हावा याबाबत सूचना दिलेल्या आहेत. असे प्रकार झाले तर त्या पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याला जबाबदार धरले जाईल. पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. गुन्हेगारी कमी झाली आहे, मात्र जबरी चोरी, दरोडे वाढले आहेत. त्यामुळे त्याबाबत योग्य त्या उपाययोजना केल्या जात आहेत. शिर्डीसह जिल्ह्यामध्ये मनुष्यबळाची गरज भासते. त्यामुळे सुरवातीला होमगार्ड आणि नंतर गरजेनुसार पोलिस दिले जातील.'

महिला, मुलांवर अत्याचार होऊ नयेत यासाठी खास युनिट तयार केले आहेत. असे गुन्हे करणाऱ्या लोकांची ठरावीक वेळी तपासणी घेतली जायची. आता मात्र कधीही तपासणी करण्यात येणार आहे. अचानक नाकाबंदी, प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत. सायबरचा वापर वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर लोकांत सोशल मिडीयासह अन्य वापराबाबत जनजागृती केली जाणार आहे, असे माथूर म्हणाले. नाशिक परिक्षेत्रात पोलिस महानिरिक्षक विनय चौबे, जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधिक्षक घनशाम पाटील, सहायक पोलिस अधिक्षक अक्षय शिंदे यांच्यासह पोलिस सर्व पोलिस अधिक्षक उपस्थित होते.

कोपर्डी बलात्कार व खून खटल्यासंबंधीची बित्तमबातमी वाचा...

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT