काँग्रेसचे गाजर वाटप आंदोलन
काँग्रेसचे गाजर वाटप आंदोलन 
पश्चिम महाराष्ट्र

गाजर वाटप : सरकारच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन

पांडुरंग उगले

माजलगाव (जि. बीड)  :  तीन वर्षे सत्ता भोगूनही युती सरकारने केवळ खोटी आश्वासने देत जनतेला गाजर दाखवून त्यांची फसवणूक केल्याचा निषेध म्हणून काँग्रेसने आज (बुधवारी) शहरात 'गाजर वाटप आंदोलन' केले. शिवाजी चौकात झालेल्या आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी नागरिकांना गाजर वाटून सरकारचा निषेध व्यक्त केला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गाजावाजा करून केलेली कर्जमाफीची घोषणा, शेतकरी, मध्यम व्यापारी, कामगार, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे फोटो छापून केलेल्या “मी लाभार्थी”च्या खोट्या व फसव्या जाहिराती करून जनतेला गाजर दाखविले आहे, असे म्हणत भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी शहरात गाजर वाटप आंदोलन केले.

आंदोलनादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना गाजराचे वाटप करून सरकारचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नारायण होके, शहराध्यक्ष शेख अहमद, अ‍ॅड. इनामदार, विजय अलझेंडे, विजय साळवे आदी सहभागी झाले होते. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT