Marathi News murderd of a woman in Karhad
Marathi News murderd of a woman in Karhad 
पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड येथील दरोड्यात महिलेचा खून

सचिन शिंदे

उंब्रज (ता. कऱ्हाड, जि. सातारा) - येथील बाजारपेठत एका बंगल्यात पडलेल्या दरोड्यात महिलेचा खून झाला आहे. चोरी करताना संबधित महिला जागी झाल्याने दरोडेखोरांनी तिच्या तोंडावर उशी दाबून खून केला. जैनुबी करीम मुल्ला (वय 86) असे संबधित महिलेचे नाव आहे. या दरोड्यात सुमारे पन्नास तोळे सोने चोरट्यांनी लंपास केले आहे. 

मुल्ला यांच्या बंगल्याशिवाय आणखी चार ठिकाणी चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मध्यरात्री दिडच्या सुमारास ही घटना घडली. या दरोड्यामुळे खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिक्षक संदीप पाटील, पोलिस उपअधिक्षक नवनाथ ढवळे घटनास्थळी दाखल झाले. या चोरीसाठी दरोडेखोरांनी मोठा टेम्पो वापरला होता. परिसरातील एका घरात हात सफाई करून ते दिड ते दोन गुंठ्यापेक्षा जास्त जागेत असलेल्या दुसऱ्या बंगल्यात दरोडेखोर मागील बाजूने शिरले. तेथे चोरी करत असताना संबधित महिला जागी झाली. त्यांनी तिच्या तोंडावर उशी दाबून तिचा खून केला. तेथे चोरी करून चोरटे तिसऱ्या बंगल्यात गेले. 

मात्र तेथे त्या घरात जागी झालेल्या मुलीने दंगा केल्याने चोरटे तेथून पसार झाले. तेथून पुढे पांडूरंग व कुंभार यांच्याही घरातील ऐवज चोरट्याने लंपास केला. ते परगावी असल्याने तेथील चोरी झालेली रक्कम अद्याप समजू शकलेली नाही. अन्य दोन ठिकाणीही त्याच टोळीने चोरीचा प्रयत्न केला. मात्र ते यशस्वी झाले नाहीत. रात्री घटनास्थळी पोलिस त्वरीत दाखल झाले होते. सकाळी ठसे तज्ञ व श्वान पथकास बोलवण्यात आले. त्यांच्याकडून तपास सुरू होता.

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT