sadabhau khot
sadabhau khot 
पश्चिम महाराष्ट्र

शेट्टी लक्षात ठेवा तुमच्या भानगडीचा मी साक्षीदार: सदाभाऊ खोत

सकाळवृत्तसेवा

माझ्या मंत्रीपदामुळेच त्यांना पोटशुळ; ...ती आत्मक्‍लेष यात्रा नव्हे सदाभाऊ द्वेष यात्रा

सांगली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्यानंतर कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी प्रथमच खासदार राजू शेट्टी तोफ डागताना त्यांना तुमच्या साऱ्या भानगडींचा मी साक्षीदार आहे असा सूचक इशारा दिला आहे.

माझ्या मंत्रीपदामुळे पोटशूळ उठलेल्या शेट्टींची आत्मक्‍लेष यात्र कर्जमाफीसाठी नव्हे तर सदाभाऊ द्वेषासाठी होती. त्यांना सदाभाऊ क्‍लेष झाला असून आता त्यांनी माझ्या पाठीमागे लागण्यापेक्षा शेतकरी प्रश्‍नांकडे लक्ष द्यावे असा सल्लाही दिला. हिंमत असेल हातकणंगले मतदारसंघ सोडून निवडणूक लढवून दाखवावी. मग त्यांना शेतकरी संघटनेची ताकद कळेल असे जाहीर आव्हानही त्यांनी दिले.

स्वाभीमानीतून हाकलपट्टी होईपर्यंत गेल्या काही महिन्यात मंत्री खोत संघटनेच्या टिकेच्या रडारवर सातत्याने आहेत. प्रत्युत्तरादाखल आजवर मोघमात आणि जपून टिका करणाऱ्या खोत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत मात्र शेट्टीवर टिकेचे आसूड ओढले. ते म्हणाले, मला गद्दार म्हणता; मग शरद जोशींच्या संघटनेतून बाहेर पडलात तेव्हा तुम्ही काय साधू संत होता का? माझी आमदारकी-मंत्रीपद भाजपाच्या कोट्यातून आहे. त्यामुळे माझ्या राजीनाम्याची मुख्यमंत्र्याकडे तक्रार करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकारच नाही. भाजपच योग्य तो निर्णय घेईल. आम्ही तुमचे गुलाम नाही. सरकारमध्ये राहता आणि पुन्हा सरकारवरच दबाव आणता. सरकारमधून बाहेर पडण्याचे रोज इशारे देताय तर मग आता कोणत्या मुहुर्ताची वाट बघताय?''

ते म्हणाले,"" चळवळीसाठी साखर सम्राटांच्या काठ्या खाल्या. तेव्हा सदाभाऊ चांगला. आता मात्र तो गद्दार. कोणी मोठा झालेला यांना बघवतच नाही. आमदार उल्हास पाटील मोठा झाला की तो नको, सदाभाऊ मोठा झाला की तोही नको. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हेतूपुर्वक विरोध, शरद जोशींना विरोध करताना मीच एकटा हुश्‍शार. असा गर्व शेतकऱ्यांच्या नेत्याला शोभत नाही. संघटनेतून बाहेर पडण्याची माझी इच्छा नव्हती. परंतू त्यांची संघटनेतील हुकूमशाही अतीच झाली. केवळ वैयक्तिक द्वेषापोटी त्यांनी माझी हकालपट्टी केली. त्याची पुर्वतयारी म्हणूनच त्यांनी आत्मक्‍लेश यात्रा काढली. त्याचा कर्जमाफीशी संबंध नव्हता. केवळ माझ्याविरोधातील ती "सदाभाऊ द्वेष यात्रा' होती.

सदाभाऊच्या तोफा
0हिंमत असेल तर माढामधून लढा मग लायकी कळेल
0त्यांना किंवा संघटनेला लाख मते पडली तर राजकारण सोडू
0 राजकारणासाठी प्रत्येकवेळी संघटनेचे वापरा आणि फेका धोरण
0माझ्या 32 वर्षाच्या कामाला शेट्टींच्या प्रमाणपत्राची गरज नाही.
0 माझ्या मंत्रीपदामुळे त्यांना पोटशूळ उठलाय.
0आजपर्यंत त्यांच्या पोटातले आता ओठावर येतेय.
0स्वामीनाथन आयोगावर 2007 पासून त्यांची चुप्पी?

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT