esakal
विज्ञान-तंत्र

I-phone Launch: 15 वर्षे झाली,पहिल्या ओरिजिनल आयफोनचे 'हे' होते खास फिचर!

आज प्रत्येकाच्या हातात हा फोन दिसतो पण त्याच्याविषयी सगळ्यांनाच सगळं माहीत आहे असं अजिबात नाही. जे तुम्हाला माहिती नाही ते आज वाचा.

सकाळ डिजिटल टीम

I-phone हा एक स्मार्टफोन आहे. सन 2007 मध्ये ॲपलचे स्टीव्ह जॉब्स यांनी स्मार्टफोन जगतात एक मोठं पाऊल टाकलं. 2007 मध्ये ॲपलने आपला पहिला आयफोन मार्केटमध्ये आणला आणि स्मार्टफोनच्या दुनियेत क्रांती आणण्यासाठी गेम चेंजर सुद्धा ठरला.

मूळ आयफोन भारतात मिळत नव्हता

आज आयफोन असो वा दुसरा कोणताही फोन, या फोन कंपन्यांसाठी भारतीय बाजारपेठ महत्वाची आहे. कारण इथं मोठी उलाढाल होते. आयफोनही याला अपवाद नाही. पण तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की जेव्हा आयफोन पहिल्यांदा लाँच करण्यात आला तेव्हा भारतीय बाजारपेठेला स्थान नव्हतं. आयफोन लाँच झाल्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर आयफोन 3G भारतात लाँच करण्यात आला.

पहिला आयफोन 2G होता, 3G, 4G नव्हता

सध्या 3G नव्हे तर 4G आणि 5G स्मार्टफोन बाजारात येऊ लागले आहेत. पण ॲपलचा पहिला आयफोन 2G स्मार्टफोन होता. त्या काळात नोकिया आणि ब्लॅकबेरीसारख्या कंपन्यांचे फोन 3G सपोर्टसह उपलब्ध होते.

पूर्वी आयफोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग नव्हते

पहिल्या आयफोनमध्ये 2 मेगा पिक्सेल कॅमेरा होता. यामुळे फक्त फोटोच काढता यायचे. व्हिडिओ रेकॉर्डिंगचा ऑप्शनच नव्हता. एवढंच काय तर सेल्फी काढण्यासाठी फ्रंट कॅमेरा पण आयफोन 4 मध्ये देण्यात आला. त्याच्या मागच्या सीरिजमध्ये फ्रंट-फेसिंग कॅमेरेच नव्हते.

बॅटरी काढता यायची नाही

आज जवळपास सगळ्याच स्मार्टफोनची बॅटरी नॉन रीमुव्हेबल असते. पण मागच्या दहा वर्षांपूर्वी मोबाईल फोन मधून बॅटरी काढता येणं शक्य होतं. पण ॲपलच्या आयफोनच्या बाबतीत हे उलट होतं. हा फोन लाँच झाल्यापासूनचं त्यात नॉन रीमुव्हेबल बॅटरी आहे.

आपल्यापैकी बरेच जण आज ब्लूटूथ इयरफोन वापरतात. पण ॲपलने 2007 सालीच ब्लूटूथ हेडसेट देखील लॉन्च केला होता. पुढे ॲपलने जगातला पहिला वहिला AirPod लाँच केला.

पूर्वीच्या आयफोनमध्ये मेमरी कार्डचे स्लॉट नव्हते

पूर्वी फोनमध्ये मेमरी स्टोरेज कमी असायची त्यामुळे एक्स्टर्नल मेमरी कार्ड फोनमध्ये इन्सर्ट करण्यासाठी एक स्लॉट दिला जायचा. पण आयफोनमध्ये हा स्लॉट नव्हताच. आयफोनला पहिल्यापासूनच इंटर्नल स्टोरेज असायचं. आज सगळ्याच फोनला अशी सुविधा आहे. पहिल्या आयफोनमध्ये 4GB स्टोरेज देण्यात आले होते.

ॲप स्टोअरही नव्हतं

पहिला आयफोनमध्ये ॲप स्टोअर नव्हतं. हा पहिलाच असा स्मार्टफोन होता जो ॲप स्टोअरशिवाय लाँच झाला होता. त्यामुळे लोकांना आयफोन इन्स्टॉल असलेलेचं ऍप्लिकेशन वापरता येत होते.

आयफोनच्या आधी ॲपल ही कम्प्युटर कंपनी होती

मूळ आयफोन लाँच करण्यापूर्वी ॲपलचे Macs आणि iPods फेमस होते. किंबहुना कंपनीची ओळखचं कम्प्युटर कंपनी अशी होती. पण आयफोन लाँच झाल्यानंतर अॅपलचे इतर प्रॉडक्ट् मागे पडले आणि फक्त आयफोनचीच विक्री होऊ लागली. आणि हा ट्रेंड आजही कायम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणांना आजपासून मिळणार १५०० रुपये; फेब्रुवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात!

Jaykumar Rawal Photo Viral : व्हॉट्सॲपवर फोटो फॉरवर्ड करताना शंभर वेळा विचार करा! पणनमंत्र्यांचा मॉर्फ फोटो व्हायरल, धुळ्यात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

SIP Investment: 1 एप्रिलपासून गुंतवणूक सुरू करायची? SIP ठरू शकते तुमची सर्वात मोठी गेमचेंजर! कशी ते समजून घ्या सोप्या शब्दांत

'तिचे केस किती आकर्षक...' प्रियकराकडून मैत्रिणीच्या केसांची स्तुती; प्रेयसी संतापली, संतापजनक घटनेनं मुंबई हादरली

Ashok Kharat Files: ''रुपाली चाकणकरच पीडितांना खरातकडे पाठवायच्या'', महिला नेत्याचे गंभीर आरोप, केली अटकेची मागणी

SCROLL FOR NEXT