esakal | मुंडे प्रकरणाला नवं वळण ते प्रजासत्ताक दिन परदेशी पाहुण्यांशिवाय; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

top news

भारतात कृषी कायद्याला स्थगिती दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीतून एका सदस्याने काढता पाय घेतला आहे. यासह देश विदेश आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या वाचा.

मुंडे प्रकरणाला नवं वळण ते प्रजासत्ताक दिन परदेशी पाहुण्यांशिवाय; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
टीम ईसकाळ

राज्यात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपानंतर आता इतर दोन नेत्यांनी आरोप करणाऱ्या महिलेविरोधातच तक्रार केल्यानं या प्रकरणाला नवीन वळण लागलं आहे. एकाबाजुला धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असताना भाजप नेत्याने आपल्यालासुद्धा यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्याबाबत राष्ट्रवादी काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून राहिलं आहे. देशात संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा करण्यात आली आहे. तर यंदाचा प्रजासत्ताक दिन परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीशिवाय साजरा होणार आहे. भारतात कृषी कायद्याला स्थगिती दिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या समितीतून एका सदस्याने काढता पाय घेतला आहे. यासह देश विदेश आणि मनोरंजन क्षेत्रातील बातम्या वाचा.

1. यंदाचा प्रजासत्ताक दिन परदेशी पाहुण्यांशिवाय; केंद्र सरकारकडून शिक्कामोर्तब

2. धनंजय मुंडेंवर आरोप करणाऱ्या महिलेविरुद्ध भाजप नेत्याचीही तक्रार; खळबळजनक खुलासा

3. धनंजय मुंडे प्रकरणात भाजपची गोची; आरोपांची धार कमी होणार?

4. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची घोषणा; दोन टप्प्यात पार पडणार

5. SC च्या समितीतून एकाचा काढता पाय; शेतकऱ्यांच्या हितासाठी आधीच माघार

6. Army Day: भारतीय मेजरनं बनवलं जगातील पहिलं यूनिवर्सल बुलेटप्रूफ 'शक्ती' जॅकेट 

7. PM मोदींच्या जवळच्या अधिकाऱ्याने राजीनामा देऊन केला भाजप प्रवेश 

8. भारताच्या चुकीच्या नकाशाबाबत WHOवर नाराजी; त्वरित दुरुस्तीसाठी सरकारचं पत्र 

9. Gold rate today: मकर संक्रांतीला सोन्याचे दर घसरले, तर चांदीचे वधारले; जाणून घ्या रेट 

10. प्रिया वारियरच्या ‘लडी लडी’चा धिंगाणा; संक्रांतीच्या दिवशी नवं गाणं

loading image