esakal | राज्यात आजपासून कडक निर्बंध ते रेशनवर मोफत धान्य, ठळक बातम्या क्लिकवर

बोलून बातमी शोधा

देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर
राज्यात आजपासून कडक निर्बंध ते रेशनवर मोफत धान्य
sakal_logo
By
टीम ई सकाळ

अमेरिकेच्या न्यायालयाने मिनियापोलिसातील माजी पोलिस अधिकारी डेरेक शॉविनला जॉर्ज फ्लॉइड हत्या प्रकरणी दोषी ठरवलं आहे. न्यायाधिशांनी डेरेकला निर्घृण हत्या प्रकरणात दोषी ठरवले असून त्याला लवकरच शिक्षा सुनावली जाऊ शकते. तर राज्यात सध्या १ मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आता संचारबंदीचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. दुसरीकडे अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांमधून एप्रिल किंवा मे यापैकी एका महिन्याचे मोफत धान्य वितरणास सुरवात झाली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील सुमारे ३७ लाख नागरिकांना लाभ मिळणार आहे. देश-विदेशासह राज्यातील ठळक घडामोडी तसेच मनोरंजन विश्वातील महत्त्वाच्या बातम्या वाचा एका क्लिकवर

भगनानगोला/मुर्शिदाबाद (पश्‍चिम बंगाल) - कोरोनाव्हायरस प्रतिबंधक लशींची खुल्या बाजारात विक्री करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परवानगी दिली. मात्र त्याआधीच त्यांनी विदेशात लशी पाठविल्‍या असल्याने भारतात साठाच संपलेला आहे,’’ अशी टीका पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केली. वाचा सविस्तर

हेही वाचा: ''कोणत्याही पक्षाला रेमडेसिवीर विकण्याचा अधिकार नाही''- राजेंद्र शिंगणे

मुंबई - राज्यात सध्या १ मे पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात केवळ अत्यावश्यक वस्तू आणि सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आता संचारबंदीचे नियम अधिक कडक करण्यात आले असून नागरिकांना जास्त वेळ घराबाहेर राहू नये म्हणून अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकानं सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंतच खुली ठेवण्यात येणार आहेत. आज (२० एप्रिल) रात्री ८ वाजल्यापासून १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत ती कायम राहणार आहे. राज्य शासनानं या नियमावलींचं अधिकृत पत्रक जाहीर केलं आहे. यानुसार, कुठली दुकानं मर्यादीत काळात सुरु राहतील आणि कुठल्या सेवा दिवसभर सुरु राहतील याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. वाचा सविस्तर

वॉशिंग्टन - अमेरिकेच्या न्यायालयाने मिनियापोलिसातील माजी पोलिस अधिकारी डेरेक शॉविनला जॉर्ज फ्लॉइड हत्या प्रकरणी दोषी ठरवलं आहे. न्यायाधिशांनी डेरेकला निर्घृण हत्या प्रकरणात दोषी ठरवले असून त्याला लवकरच शिक्षा सुनावली जाऊ शकते. शॉविन विरोधात सेकंड डिग्री मर्डर, थर्ड-डिग्री मर्डर आणि मॅनस्लॉटर असे तीन आरोप होते. यात त्याला सेकंड डिग्री मर्डरसाठी 40 वर्षांची कैद, थर्ड डिग्री मर्डर प्रकरणात 25 वर्षांची कैद तर मॅनस्लॉटर प्रकरणी 10 वर्षांची कैद किंवा 20 हजार डॉलर्सच्या दंडाची तरतूद आहे. वाचा सविस्तर

मुंबई - 'राम जन्मला गं सखी राम जन्मला', गीत रामायणातल्या या ओळी ऐकल्या की एक वेगळीच स्फुर्ती येते. भगवान श्रीरामांचं वर्णन करणाऱ्या या गीतामध्ये अनेक गोष्टी दडल्या आहेत. आज रामनवमी म्हणजे प्रभू रामचंद्रांचा जन्म दिवस. आजच्याच दिवशी दुसऱ्या प्रहराला श्रीरामचंद्रांचा जन्म झाला आणि संपूर्ण भारतवर्षामध्ये आनंदोत्सव साजरा केला गेला. विशेष म्हणजे अजूनही देशातील अनेक राज्यांमध्ये रामनवमी मोठ्या दणक्यात साजरी केली जाते. परंतु, रामनवमी साजरी करण्यामागचं नेमकं महत्त्व काय ते अनेकांना ठावूक नाही. म्हणूनच राम नवमी का साजरी केली जाते ते पाहुयात. वाचा सविस्तर

पुणे - अन्नसुरक्षा योजनेतील शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानांमधून एप्रिल किंवा मे यापैकी एका महिन्याचे मोफत धान्य वितरणास सुरवात झाली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पुणे, पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील सुमारे ३७ लाख नागरिकांना लाभ मिळणार आहे. अन्नसुरक्षा योजनेतील अंत्योदय आणि प्राधान्यक्रम कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या प्रत्येकी दोन रुपये किलो प्रतिकिलो गहू आणि तीन रुपये किलो दराने तांदूळ दिला जातो. वाचा सविस्तर

मुंबई - मुंबई शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताना दिसतोय. त्यात डॉक्टर, नर्स हे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. अशातच त्यांच्यावर चाकू हल्ला होणं ही लज्जास्पद घटना आहे. अशीच एक लज्जापद घटना शहरात घडली आहे. मलबार हिल येथील खासगी रुग्णालयातील नर्सवर कोरोना रुग्णाने चाकू हल्ला केल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. वाचा सविस्तर

नागपूर - कोरोनाचे संक्रमण वाढतच चालल्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सर्व हिवाळी परीक्षा स्थगित केल्या आहेत. नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांना 25 मार्चपासून सुरुवात झाली होती. कोरोनामुळे विद्यापीठाने आधीच या परीक्षा ऑनलाइन घेण्याचा निर्णय घेतला होता. सध्या विद्यापीठाच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षा सुरु आहेत. मात्र, काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. वाचा सविस्तर

नाशिक - शहरात कोरोना संसर्गाचा वेग अधिकच वाढत असल्याने राज्य शासनाने संचारबंदी लागू केली आहे. तर व्यापारी संघटनांनी देखील जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील जबाबदार घटक म्हणून बांधकाम व्यावसायिकांच्या बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने 21 एप्रिल ते 1 मे 2021 पर्यंत बांधकामे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाचा सविस्तर

नंदुरबार - कोरोनाने दररोज शेकडो नागरिकांचा मृत्यू होत आहे. संसर्गाने हतबल झालेल्या कुटुंबांना वाचविण्यासाठी व मृत्यूचा दाढेतून रूग्णाला बाहेर काढण्यासाठी जनहिताचा भावनेतून रेमडेसिव्‍हिर इंजेक्शन ना नफा ना तोटा या तत्वावर गरजूंना उपलब्ध करून देत खानदेशातील शेकडो नागरिकांचे जीव वाचविले. ते नेक काम गुन्हा ठरवत असेल तर होय, मी गुन्हा केला आहे आणि तो पुन्हा करेल, असे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी सांगितले. वाचा सविस्तर

औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी एकीकडे लसीकरण वाढवण्याच्या सूचना दिल्या जात असताना दुसरीकडे लसींचा साठा संपल्याने मोहीम थांबवण्याची नामुष्की महापालिकेवर मंगळवारी ओढवली. अनेक केंद्रांवर दुपारनंतर लसींचा साठा संपला. त्यामुळे प्रशासनाने मोहीम अर्धवट गुंडाळली. दरम्यान, लस आणण्यासाठी महापालिकेने पाठवलेले वाहन मुंबईहून आज शहरात येईल, असे सांगितले जात असले तरी लस न मिळाल्यास बुधवारी लसीकरण मोहीम बंद पडण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर

मुंबई - संचारबंदी लागू करूनही राज्यातील रुग्णसंख्येत अपेक्षित घट होत नसल्याने संपूर्ण लॉकडाउन लागू करावा, असा सूर मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटला. एकीकडे संपूर्ण लॉकडाउनचा विचार होत असताना दुसरीकडे कलाविश्वात काम करणाऱ्यांसमोर पुन्हा एकदा संकट उभं राहिलं आहे. अभिनेत्री हेमांगी कवीने फेसबुकवर याबाबत पोस्ट लिहित दुसऱ्यांदा तिची मालिका बंद पडल्याने दु:ख व्यक्त केलं आहे. त्याचप्रमाणे 'थोडा अजून तग धरा', असं म्हणज तिने मालिकेच्या निर्मात्यांना कळकळीची विनंती केली आहे. वाचा सविस्तर