भाजपच्या वेबसाइटवर रक्षा खडसेंचा आक्षेपार्ह उल्लेख ते अमित शहांना बडतर्फ करण्याची मागणी, ठळक बातम्या एका क्लिकवर

टीम-ईसकाळ
Thursday, 28 January 2021

भारतात गेल्या 24 तासांत 11,666 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले, तर 123 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह देशविदेशातील ठळक बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

भाजपच्या वेबसाईटवरच रक्षा खडसेंचा अपमान करण्यात आला आहे. रक्षा खडसे यांच्या नावाखाली घृणास्पद आणि संतापजनक उल्लेख करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आक्रमक झालेत. तर प्रजासत्ताकदिनी शेतकरी संघटनांच्या ट्रॅक्टर मोर्चाच्या नावाखाली उपद्रवी घटकांनी केलेल्या हिंसाचारासाठी केंद्र सरकारचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा आक्रमक हल्ला काँग्रेसने चढविला आहे. दुसरीकडे, देशात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख घसरताना दिसत आहे. भारतात गेल्या 24 तासांत 11,666 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले, तर 123 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह देशविदेशातील ठळक बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

नवी दिल्ली : दिल्लीत ट्रॅक्टर परेडवेळी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिस प्रशासनाने मोठी कारवाई करत सुमारे 40 दिवसांपासून सुरु असलेले शेतकरी आंदोलन जबरदस्तीने संपवले. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : दिल्लीतील एका वरिष्ठ डॉक्टरचे कोरोना लस घेतल्यानंतर आपल्या पत्नीसोबतचे संभाषण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर केके अग्रवाल कोरोनाची लस घेतल्यानंतर लाईव्ह स्ट्रिमिंग करत होते. सविस्तर वाचा

कॅलिफोर्निया : जगभरात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लसीकरण मोहिम सुरू झाली आहे. काही देशांमध्ये व्हॅक्सिनला विरोधही केला जात आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : शेतकरी संघटनांनी विश्‍वासघात केल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी आज, ‘कोणाही दोषीला सोडणार नाही’ असा इशारा दिला. प्रजासत्ताकदिनी... सविस्तर वाचा

कॅमरुन : कॅमरुन देशात भीषण रस्ते अपघात झाला आहे. बस आणि तेल वाहून नेणारे टँकरच्या धडकेत 53 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच 21 लोक गंभीर जखमी झाल्याचे कळत आहे. सविस्तर वाचा
 

मुंबई : भाजपच्या वेबसाईटवरच रक्षा खडसेंचा अपमान करण्यात आला आहे. रक्षा खडसे यांच्या नावाखाली घृणास्पद आणि संतापजनक उल्लेख करण्यात आला आहे. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी शेतकरी संघटनांच्या ट्रॅक्टर मोर्चाच्या नावाखाली उपद्रवी घटकांनी केलेल्या हिंसाचारासाठी केंद्र सरकारचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार असल्याचा आक्रमक हल्ला काँग्रेसने चढविला आहे. सविस्तर वाचा

मुंबई : ग्रामीण भागात ज्या थाळीचा उल्लेख "अन्नपुर्णेची थाळी" म्‍हणून केला जातो त्या शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीला वर्ष पुर्ण झाले. सविस्तर वाचा

पुणे  : विद्यार्थ्यांना आॅनलाईन पद्धतीने मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण विभागाने सुसज्ज तीन स्टुडिओ उभे केले आहेत. सविस्तर वाचा

नवी दिल्ली : शेतकरी संघटनांनी विश्‍वासघात केल्याचा आरोप करत दिल्ली पोलिसांनी आज, ‘कोणाही दोषीला सोडणार नाही’ असा इशारा दिला. सविस्तर वाचा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Morning news update farmer protest bjp raksha khadse corona amit shah delhi police tractor rally