Good-Evening
Good-Evening 
महाराष्ट्र

गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

सकाळ डिजिटल टीम

राज ठाकरे यांची चौकशी करणाऱ्या 'ईडी'ला मनसेकडून 'नोटीस'... विरोधकांनी 'मेगा भरती'पेक्षा 'मेगा गळती'वर विचार करावा : मुख्यमंत्री... चिदंबरम यांच्या अटकेवर पाकिस्तानचे खासदार म्हणाले... पंतप्रधान झाल्यावर बाहुबली प्रभासला करायचंय 'हे' महत्त्वाचं काम (व्हिडिओ)... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- राज ठाकरे यांची चौकशी करणाऱ्या 'ईडी'ला मनसेकडून 'नोटीस'

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये अनेकांना चौकशीच्या नोटीसा पाठविणारे सक्‍तवसुली संचालनालय अर्थात 'ईडी' ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगळीवेगळी नोटीस पाठविल्यामुळे हा एक चर्चेचा विषय ठरला आहे.

- विरोधकांनी 'मेगा भरती'पेक्षा 'मेगा गळती'वर विचार करावा : मुख्यमंत्री

विरोधकांनी भाजपच्या मेगा भरतीऐवजी त्यांच्यातील मेगा गळतीचा विचार करावा. प्रवेशाबाबत भाजपने 'फिल्टर पॉलिसी' अवलंबली आहे.

- चिदंबरम यांच्या अटकेवर पाकिस्तानचे खासदार म्हणाले...

आयएनएक्स मीडिया गैरव्यवहारप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना अटक करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानचे खासदार रहमान मलिक यांनी चिदंबरम यांच्या अटकेचा निषेध केला.

- यूपीत खातेवाटप; मुख्यमंत्री योगींच्या हाती तब्बल 37 खाती!

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंत्रिमंडळात नव्याने समावेश केलेल्या मंत्र्यांना शुक्रवारी खातेवाटप केले. यात गृह आणि महसूलसह तब्बल 37 खाती योगींनी स्वतःकडेच ठेवली आहेत.

- पीकविमा योजना हा घोटाळाच : उद्धव ठाकरे

पीकविम्यात शेतकऱ्यांनी भरलेले पैसे परत का, पीकविमा योजना हा एक घोटाळा आहे. त्याचा फायदा शेतकऱअयांना होत नाही. पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना परत मिळालेच पाहिजेत असे म्हणत शिवसेनेचा कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली.

- Video : धोनी दिसला पुढाऱ्याच्या वेशात; करणार राजकारणात प्रवेश?

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी लष्कराचे प्रशिक्षण परतल्यावर पुढाऱ्याच्या पोशाखात दिसला आहे. त्यामुळे त्याच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल आता चर्चा सुरु झाल्या आहेत.

- INDvsWI : मी स्वार्थी नाहीये, शतकं हुकलं की वाईट वाटायला...

रहाणे पहिल्या डावात 81 धावांवर बाद झाला. पहिल्या दिवसाच्या खेळानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने शतक हुकल्याचे अजिबात दु:ख नाही असे स्पष्ट केले.

- रेल्वे स्टेशनवर व्हायरल झालेला 'तो' आवाज आता चित्रपटात!

काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील रानाघाट रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या एका महिलेच्या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

- उरीनंतर आता बालाकोटवर सिनेमा; 'हा' अभिनेता मूख्य भूमिकेत

उरी - द सर्जिकल स्ट्राईक या चित्रपटाच्या यशानंतर आता बालाकोटमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईकवर सिनेमा येणार आहे.

- पंतप्रधान झाल्यावर बाहुबली प्रभासला करायचंय 'हे' महत्त्वाचं काम (व्हिडिओ)

कपिलनं प्रभासला शोमध्ये अनेक गंमतीशीर प्रश्न विचारले. यातील एक प्रश्न असा होता की, एका दिवसासाठी तुला पंतप्रधान केलं गेलं तर तु सर्वात आधी काय करशील? हा प्रश्न ऐकल्यावर एक मिनिटही न थांबता प्रभास म्हणाला...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT