Good-Evening
Good-Evening 
महाराष्ट्र

गुड इव्हनिंग! दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

सकाळ डिजिटल टीम

घरकुल गैरव्यवहार : सुरेश जैन यांना 7 तर देवकरांना 5 वर्षांचा कारावास... काश्मीरप्रश्नी इतर देशांनी भारतावर दबाव टाकावा : परराष्ट्रमंत्री... काँग्रेसचा 'चाणक्य' आता ईडीच्या कचाट्यात... आता राज्यातील सर्व दूध संघांचा दर समान... यांसारख्या महत्त्वाच्या बातम्या आहेत एका क्लिकवर उपलब्ध... 'सकाळ' इव्हनिंग बुलेटिनच्या माध्यमातून...

- काश्मीरप्रश्नी इतर देशांनी भारतावर दबाव टाकावा : परराष्ट्रमंत्री

काश्मीर प्रश्नी भारतावर दबाव टाकण्यासाठी इतर देशाने हस्तक्षेप करावा, यासाठी पाकिस्तान प्रयत्न करत आहे.

- घरकुल गैरव्यवहार : सुरेश जैन यांना 7 तर देवकरांना 5 वर्षांचा कारावास

राज्यभरात गाजलेल्या तत्कालीन पालिकेच्या घरकुल घोटाळ्यात माजीमंत्री सुरेशदादा जैन, गुलाबराव देवकरांना जिल्हा विशेष न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे.

- काँग्रेसचा 'चाणक्य' आता ईडीच्या कचाट्यात

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला घाम फोडून काँग्रेसची लाज राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.के. शिवकुमार यांच्याकडे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मोर्चा वळवला आहे.

- भविष्यात वंचित आघाडीकडे विरोधीपक्षनेतेपद : मुख्यमंत्री

भविष्यात मला वाटतेय, की विरोधी पक्षनेता हा बहुजन वंचित आघाडीचा असेल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

- अखेर ठरलं! आदित्य ठाकरे 'या' मतदारसंघातून लढणार

युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा आमदार अनिल परब यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात केली. 

- आता राज्यातील सर्व दूध संघांचा दर समान

राज्यातील शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यात येणाऱ्या गाईच्या दुधाचा प्रतिलिटर दर सर्व दूध संचांनी समान ठेवण्याचा निर्णय राज्य सहकारी व खासगी दुध व्यवसायिक व प्रक्रिया कल्याणकारी संघाच्या शनिवारी झालेल्या (ता. ३१) बैठकीत घेण्यात आला.

- ..म्हणून भारताचा ट्वेंटी20 संघ लवकर जाहीर केला गेला

पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात होणाऱ्या ट्वेंटी20 मालिकेसाठी भारतीय संघ गुरुवारी (ता.29) जाहीर  करण्यात आला.

- ऑस्ट्रेलियन खेळाडूंच्या स्लेजिंगवर हसू येते; आर्चरने पुन्हा डिवचले

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने मात्र याबाबत वेगळे मत व्यक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडू स्लेजिंग करायला लागले की मला हुसू येतं असे म्हणत त्याने पुन्हा ऑसींना डिवचले आहे.

- Happy BirthDay : अभिनेता राजकुमार राव झाला 35 वर्षांचा!

ब़ॉलिवूडचा अभिनेता राजकुमार राव याचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडमध्ये 10 वर्षे पूर्ण केलेला राजकुमार आज 35 वर्षांचा झाला आहे.

महाराष्ट्र व देशातील महत्त्वाच्या बातम्या, घडामोडी, लेख, व्हिडिओ, तसेच क्रीडा, मनोरंजन, राजकारण विश्वातील सगळ्या ठळक बातम्या मिळवा एकाच ठिकाणी eSakal वर!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT