किरकटवाडी - नांदेड सिटी परिसरात उभारण्यात आलेले सुभेदार सरदार पिलाजीराव जाधवराव समूह शिल्प. 
पुणे

नांदेड : कुठे भकास, तर कुठे झकास...

नीलेश बोरुडे

एकूण ४८२ हेक्टर क्षेत्रफळ असलेल्या नांदेड गावामध्ये तब्बल २८० हेक्टरमध्ये नांदेड सिटी गृह प्रकल्पाच्या माध्यमातून नियोजित विकास होत आहे, तर त्या तुलनेत दुसऱ्या बाजूला २०२ हेक्टरमध्ये वसलेले मुळ गाव व इतर परिसरात मात्र अनियोजित बांधकामे निर्माण झाल्याने मूलभूत समस्याही निर्माण झाल्या आहेत.

सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्यापासून नांदेड गावात जाणारा रस्ता अत्यंत अरुंद आहे. याच रस्त्याला लागून मोठी औद्योगिक वसाहत असल्याने अवजड वाहनांची सतत ये-जा सुरू असते, परिणामी वाहतूक कोंडी ही नेहमीची समस्या आहे. गावच्या अर्ध्यापेक्षा जास्त क्षेत्रावर वसलेल्या नांदेड सिटी प्रकल्पामध्ये सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, कचरा विलिगीकरण व प्रक्रीया प्रकल्प, महावितरणचे उपकेंद्र आणि प्रीपेड वीज जोडणी, प्रीपेड पाणीपुरवठा अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. नांदेड सिटीतील अंतर्गत रस्तेही प्रशस्त असून सुशोभित केले आहेत.

नांदेड गावठाण व इतर भागांमध्ये पाणी पुरवठा हा थेट जलवाहिनीद्वारे केला जातो. पाणी साठवण्यासाठी टाकी उपलब्ध नाही. गावात असलेल्या सरकारी शाळेत दरवर्षी विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, मात्र शाळेची इमारत जुनाट असून अपुरी आहे. गावात १२० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले असून ३० कॅमेरे प्रस्तावित आहेत. 

दृष्टिक्षेपात गाव...

  • ११५०० - २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या
  • ४८२ हेक्‍टर क्षेत्रफळ
  • भारती लगड - सरपंच
  • १७ - सदस्यसंख्या
  • १४ कि.मी. स्टेशनपासून अंतर 
  • वेगळेपण : शिवकालीन ग्रामदैवत वडजाई माता मंदिर, सुभेदार सरदार पिलाजीराव जाधवराव समुहशिल्प

ग्रामस्थ म्हणतात...
प्रणव देडगे (महाविद्यालयीन विद्यार्थी) -
विद्यार्थी व नागरिकांना ये-जा करण्यासाठी पीएमपीच्या बसफेऱ्या वाढविण्यात याव्यात. पुढील भविष्याचा विचार करुन विकासकामांचे नियोजन करण्यात यावे. महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या अनेक योजनांचा लाभ घेता येईल.

ॲड. नरसिंह लगड - ग्रामपंचायत व गावातील देवस्थानांच्या माध्यमातून निर्माल्यापासून खत निर्मितीचा स्तुत्य उपक्रम राबविला जात आहे. गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर नागरिक आणि प्रशासन यांच्यामधील दुवा म्हणून काम करण्यासाठी लगेच लोकप्रतिनिधी नसणार आहेत. त्यामुळे प्रशासनाने कार्यालयीन कामकाजात नागरिकांना सहकार्य करणे अपेक्षित असणार आहे. लोकसंख्या व भविष्यातील बदल विचारात घेऊन विकास आराखडा तयार करण्यात यावा.

रूपेश घुले (ग्रामपंचायत सदस्य) - गाव महापालिका हद्दीत समाविष्ट झाल्यानंतर नागरिकांवर लगेच करांचा भार न टाकता त्यासाठी विशेष नियमावली तयार करण्यात यावी. मूलभूत सुविधांचा प्राधान्याने विचार व्हावा. शिवणे-नांदेड या नदीपात्रातील पुलाचे काम लवकर मार्गी लागावे.

महापालिकेच्या माध्यमातून जलशुद्धीकरण प्रकल्प, कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात यावेत. वाढत्या लोकसंख्येमुळे स्मशानभूमीत विद्युत दाहीनीची व्यवस्था करण्यात यावी. 
- भारती अंकुश लगड, सरपंच

(उद्याच्या अंकात वाचा खडकवासला गावाचा लेखाजोखा)

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेची शिवसेना कोल्हापुरात स्वबळावर लढणार का? कार्यकर्त्या बैठकीत काय झाला निर्णय

Women's World Cup : हर्लीन देओलचा प्रश्न अन् लाजले पंतप्रधान नरेंद्र मोदी; वर्ल्ड कप विजेत्या पोरींना आवरेना हसू Video Viral

Suraj Wife: ही आहे सुरज चव्हाणची होणारी बायको! अंकिताने खास पद्धतीने दोघांचं केलं केळवण, सुरजचा उखाणा एकदा ऐका! Viral Video

Vayuputhra : हे आहे 'वायुपुत्र'! भारताचं पहिलं इलेक्ट्रिक रॉकेट; कितीहीवेळा करा चार्जिंग, लवकरच स्पेसमध्ये जाणारा हा चमत्कार एकदा बघाच

Pune Car Accident : पुण्यात आणखी एक भीषण अपघात ! पौड रस्त्यावर मेट्रो पिलरला कार धडकली अन्...

SCROLL FOR NEXT