सुदर्शन विठ्ठल भांबेरे
सुदर्शन विठ्ठल भांबेरे 
विदर्भ

खारपान पट्ट्याचा शाप; किडनी आजाराने घेतला शेतकऱ्याचा बळी

विठ्ठल निंबोळकर

टुनकी (बुलडाणा): बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात खारपानपट्टा नागरिकांसाठी शाप ठरत आहे. या भागात किडनीच्या आजाराने शेकडो बळी घेतले आहेत. दरम्यान, मंगळवारी (ता. 21) आणखी एक शेतकरी या आजाराने दगावला. या आठवड्यात ही दुसरी घटना असली तरी प्रशासन निद्रेत आहे.

क्षारयुक्त व दूषित पाणी प्यावे लागत असल्याने संग्रामपूर तालुक्यातील अनेक नागरिक किडनी आजाराने ग्रासलेले असून, महागडा उपचार झेपत नसल्याने मरणाच्या दारात आहेत. मंगळवारी सायंकाळी टुनकी येथील शेतकरी सुदर्शन विठ्ठल भांबेरे (वय 49) यांचा मुत्यु झाला. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यावर मुबई व शिर्डी येथे उपचार सुरू होते. अखेर त्यांना मृत्यूने गाठले. त्यांच्या मागे दोन मुली, एक मुलगा, पत्नी, आई, वडील असा मोठा परीवार आहे.

तीन दिवसात किडनी आजराने बळी गेल्याची ही दुसरी घटना आहे. खारपानपट्टा भागात शुद्ध पाणी मिळावे याकरिता जलशुद्धीकरण केंद्र सुरू करण्यात आले होते. मात्र, देखभाली अभावी हे केंद्र बंद आहेत. 140 गाव पाणी पुरवठा योजनाही अद्याप पूर्ण झाली नसल्याने पाणी समस्या कायम आहे.

भय इथले संपत नाही
संग्रामपूर तालुक्यातील बहुतांश गावे खारपान पट्ट्यात येतात. या गावातील नागरिकांना क्षारयुक्त पाणी प्यावे लागते. त्यामुळे किडनीचा आजार जडतो. आजवर या आजाराने शेकडो बळी घेतले आहेत. अजूनही मृत्यूचे थैमान सुरू आहे. जीवन असलेलं पाणी या भागातील नागरिकांसाठी विष बनत आहे. नागरिक धास्तीत जगत असून 'भय इथले संपत नाही' असे चित्र या भागात आहे,

कोपर्डी बलात्कार व खून खटल्यासंबंधीची बित्तमबातमी वाचा...

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT