esakal | नाना पटोलेंचा राजीनामा ते ग्रेटाच्या ट्विटवरून दिल्ली पोलिसांचे FIR; वाचा एका क्लिकवर
sakal

बोलून बातमी शोधा

top news

देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. दुसरीकडे देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे वॉर रंगले आहे.

नाना पटोलेंचा राजीनामा ते ग्रेटाच्या ट्विटवरून दिल्ली पोलिसांचे FIR; वाचा एका क्लिकवर

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

काँग्रेस नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. आता त्यांच्याकडे काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सोपवलं जाणार अशी चर्चा रंगली आहे. देशाचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतीत वाढ झाली आहे. दुसरीकडे देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावरून सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे वॉर रंगले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरवर नेटकऱ्यांनी निशाणा साधला आहे. तर ग्रेटा थनबर्ग हिने शेअर केलेल्या टूलकिटवरून दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे.

मुंबई : काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा अखेर राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.  वाचा सविस्तर

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी सर्वसामान्य जनतेला झटका दिला आहे. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीसोबत एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी आणि विरोधावरून सोशल मीडियावर वादही सुरु झाला आहे. दरम्यान आता सरकारविरोधात दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचाच व्हिडिओ शेअर केला जात आहे. वाचा सविस्तर

स्टॅाकहोम : पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. कृषी कायद्याविरोधात ग्रेटाने केलेल्या ट्विटवरून एफआयआर दाखल करण्यात आली.यावर तिने प्रतिक्रियासुद्धा दिली आहे. वाचा सविस्तर

प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना बॅटच्या माध्यमातूनच उत्तर देण्याची आदर्श तपस्या एका ट्विटने भंग झाली. सचिन थेट शेतकऱ्यांच्या विरोधात बोलला नसला तरी, त्याच्या साजूक बोलण्यामुळं कुणाची बोट तुपात पडली हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सचिन तू अंबानींसाठी बॅटिंग करतोयस की, संघासाठी? वाचा सविस्तर

पुणे : झपाटलेला या चित्रपटातून बाबा चमत्कार ही भूमिका साकारणारे जेष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. वाचा सविस्तर

पुणे :  शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण करणार असं म्हटलं होतं. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांनी माघार घेतली होती. त्यानंतर अण्णांनी भाजप प्रवेश केला असल्याचा दावा करणारे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वाचा सविस्तर

नवी दिल्ली : सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली. चांदीचे दरही गेल्या चार दिवसात कमी झाल्याचं दिसत आहे. वाचा सविस्तर

क्रिकेटपटू रोहित शर्मा यानेही शेतकरी आंदोलनासंदर्भात ट्विट केलं होतं. रोहितच्या ट्विटला उत्तर देताना अभिनेत्री कंगना रणौत हिनं आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्यानं तिच्यावर ट्विटरने कारवाई केली आहे.  वाचा सविस्तर

मुंबई : एकीकडे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणारे आणि दुसरीकडे एकी राखा असं भारतीयांना आवाहन करणारे असे दोन गट ट्विटरवर एकमेकांविरुद्ध उभे राहिले आहेत. विदेशी सेलिब्रेटी बोलले तर देश हलला, लाखो शेतक-यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष.. वाचा सविस्तर

रितेश आणि जेनेलियाने नुकताच त्यांच्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला. यानिमित्त पार्टीवेळी 'झिंगाट' नाचण्याच्या नादात जेनेलियाचा गेला तोल..पाहा व्हायरल व्हिडिओ

loading image