Viral Satya : साळींदरवर हल्ला करणं बिबट्याला पडलं भारी (Video)

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 25 September 2019

बळापेक्षा डोक्याचा वापर योग्यवेळी केला तर काहीच अशक्य नाही हे या घटनेवरून सिद्ध झाले आहे.

साळींदरवर हल्ला करणं बिबट्याला चांगलंच महागात पडलं. एकटंच साळींदर दिसलंय म्हटल्यावर बिबट्या जाम खूश झाला. साळींदरवर हल्ला करण्याच्या बेतात बिबट्या होता. पण, हल्ला करतानाच साळींदरनं बिबट्याला चांगलाच इंगा दाखवला. बिबट्या आपल्याला आता काय सोडणार नाही हे साळींदरला कळलं होतं. त्यामुळं साळींदरनं आपली सगळी ताकद पणाला लावून अंगावरील काट्यांचा उपयोग केला.

बिबट्या साळींदरवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत राहिला. पण, या चलाख साळींदरनं आपल्या अंगावरील काट्यांनी आपला बचाव केला. बिबट्यानं पकडण्याचा प्रयत्न केला की साळींदर काटा मारत होते. दोन ते तीनवेळा बिबट्यानं साळींदरला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, साळींदरनं बिबट्याला काटा मारल्यानं बिबट्या चांगलाच नरमला. डोळ्याच्या बाजूला मारलेला काटा बिबट्यानं काढला आणि गपगुमानं निघून गेला. पुन्हा जर साळींदरच्या वाटेला गेलो तर आपलं काही खरं नाही हे बिबट्याला कळलं असावं. त्यामुळंच साळींदरशी पुन्हा पंगा न घेताच बिबट्या पळून गेला.

हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. पण, बळापेक्षा डोक्याचा वापर योग्यवेळी केला तर काहीच अशक्य नाही हे या घटनेवरून सिद्ध झाले आहे.

***************************************************************

आणखी वाचा  : 

Viral Satya : सावधान! ‘गुगल पे’वरून व्यवहार करताय? (Video)

Viral Satya : चक्क विमानातून भात पेरणी! (Video) 

Viral Satya : सावधान! कलर टॅटू ठरतोय शरीरासाठी घातक? (Video)

Viral Satya : व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनची ग्रुप मेंबरला पार्टी (Video)

Viral Satya : बंद बॅगेतून 5 महिन्यांच्या बाळाचा 1180 किमी प्रवास (Video)

Viral Satya : नागिन डान्स केला आणि जीव गेला! (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : पाकिस्तानात एक्सरे मशीनमधून निघाली माणसं ! (Video)

Viral Satya : गाडी चालवताना झोप लागल्यास उठवणारं यंत्र? (Video)

Viral Satya : आता मिळणार तिखट टोमॅटो? (Video)

Viral Satya : मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी? (Video)

Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video)

Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video)

***************************************************************


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Satya Video Leopard attack on Porcupine