Afternoon
Afternoon 
देश

दुपारच्या बातम्या: भाजप नेत्यांची सुरक्षा काढली ते कंगनाचा थयथयाट; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

सकाळन्यूजनेटवर्क

राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राज्यातील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. दुसरीकडे देशाच्या पंतप्रधानांचा अवमान केल्याप्रकरणी एका पायलटला नोकरी गमवावी लागली आहे. वाचाळ कंगना बडबड हा आजही चर्चेचा विषय ठरतोय. जाणून घेऊयात खास बुलेटनमध्ये दुपारपर्यंत राज्यात आणि देश-विदेशात कोण-कोणत्या घडामोडी घडल्या.  

दुपारपर्यंतच्या ठळक घडामोडी

1.देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत कपात; भाजपचा सरकारवर हल्लाबोल
देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, प्रसाद लाड यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. ठाकरे सरकारच्या या निर्णयानंतर भाजपकडून या सरकारवर टीका केली जात आहे. सविस्तर बातमी-

2.पंतप्रधानांना मूर्ख म्हणणाऱ्या पायलटला 'गोएअर'ने कामावरुन काढलं

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणं गोएअरच्या पायलटला महागात पडलं आहे. गोएअर या हवाई वाहतूक करणाऱ्या कंपनीनं आपल्या पायलटला कामावरून काढून टाकलं आहे. वाचा सविस्तर-


3.निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आणखी एका राज्याने केली मोफत लशीची घोषणा

काही दिवसांपूर्वी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीतील लोकांना औषधी आणि उपचार मोफतमध्ये दिले जात असल्याची आणि कोरोना लस सर्वांना मोफतमध्ये देण्याचे जाहीर केले होते. सविस्तर बातमी-

4.नव्या अपडेटप्रकरणी WhatsApp म्हणतं घाबरण्याचं कारण नाही!

 इन्स्टंट मेसेजिंग ऍप व्हॉट्सअॅपने (WhatsApp) शनिवारी स्पष्ट केलंय की नव्या अपडेटमुळे फेसबुकसोबत (Facebook) डाटा शेअर करण्याच्या नितीमध्ये कोणताही बदल होणार आहे. सविस्तर बातमी-

5.कंगनाचा कळस ; थेट टि्वटरवरच टीका म्हणाली, 'तुम्ही चीनचे गुलाम '
कंगणाचा एक दिवस शांत जात नाही. दरदिवशी ती काही ना काही सोशल मीडियावर अपडेट करत असते. दोन दिवसांपूर्वी तिला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर तिनं त्यांच्यावर आगपाखड केली. राष्ट्रवादी असणा-यांना नेहमीच धारेवर धरले जाते. त्यांना एकटं पाडलं जातं. असे ती म्हणाली होती. आता कंगणानं थेट व्टिटरवरच टीका केली आहे. सविस्तर बातमी-


6.दुर्घटनाग्रस्त इंडोनेशियन विमानाचे सापडले अवशेष; प्रवाशांचा शोध सुरु

 इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण केल्यानंतर एक विमान बेपत्ता झाले होते. आणि आता या विमानाचे काही अवशेष सापडले आहेत.  माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, श्रीविजया एअर कंपनीच्या SJ 182 या विमानात 12 कर्मचाऱ्यांसह 62 प्रवासी होते. सविस्तर बातमी-

7.AUS vs IND: सिडनीत मोहम्मद सिराजवर वर्णभेदी टीका, उपद्रवी प्रेक्षकांची स्टेडियममधून हकालपट्टी

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर ऑस्ट्रेलियाच्या प्रेक्षकांनी वर्णभेदी टीका केल्यामुळे स्टेडिअममधील सहा प्रेक्षकांना मैदानाबाहेर काढण्यात आले. या घटनेत पोलिसांनी हस्तक्षेप करुन या प्रेक्षकांना बाहेरचा रस्ता दाखवला. सविस्तर बातमी-

8.अशोक चव्हाण मराठा आरक्षणाबाबत अपयशी ठरले, विनायक मेटेंचा घणाघाती आरोप 

मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी अशोक चव्हाण व त्यांचा कंपू दिशाभूल करीत आहेत. त्यांच्यामुळेच आरक्षणाच्याबाबतीत अपयश आले आहे. चव्हाणांमुळेच मराठा समाजावर वाईट वेळ आली आहे. त्यांनी केवळ राजकारण केले असल्याचा आरोप शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी शनिवारी (ता.नऊ) पत्रकार परिषदेत केला. सविस्तर बातमी-

9.ITR भरण्याची आज शेवटची तारीख; जाणून घ्या ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया

आर्थिक वर्ष 2020-21 चा आयटीआर भरण्याचा आज शेवटचा दिवस (10 जानेवारी) आहे. आज आयटीआर न भरल्यास तुम्हाला दुप्पट दंड भरावा लागू शकतो. आयकर विभागाने ट्विट करुन याची माहिती दिली आहे. सविस्तर बातमी-

10. बेदी यू गो ! राज्यपाल किरण बेदींविरोधात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे आंदोलन

किरण बेदी या सरकारला काम करु देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शुक्रवारपासून राज भवनासमोर सुरु असलेले आंदोलन आज रविवारीही सुरुच आहे. सविस्तर बातमी-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Latest Marathi News Live Update : संभाजीनगरमध्ये सिलिंडर स्फोट, बालिका ठार, पाच जखमी

SCROLL FOR NEXT