Breakfast Updates 
देश

ब्रेकफास्ट अपडेट्सः कोरोनाची लस मुंबईत दाखल तर एलॉन मस्क यांची 'टेस्ला' बेंगळुरुत, वाचा ठळक घडामोडी एका क्लिकवर

सकाळवृत्तसेवा

UN मध्ये भारतानं चीनला सुनावलं; 'दहशतवादी' घोषित करण्याच्या प्रक्रियेत खोडा नको
दहशतवाद आणि दहशतवादी संघटना असल्याचे घोषित करण्यासाठीच्या विनंतीमध्ये गरज नसताना खोडा घालण्याची प्रथा बंद झाली पाहिजे, असं मत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी मंगळवारी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये व्यक्त केले. - सविस्तर वाचा

खुशखबर: Covishield आणि Covaxin नंतर आता आणखी चार लसी मंजूरीच्या वाटेवर
कोरोनाच्या आणखी चार लसी सध्या मंजूरीच्या वाटेवर असून या लसी निर्मिती करणाऱ्या कंपन्या ड्रग्ज कंट्रोलरकडे जाऊ शकतात, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने काल मंगळवारी दिली आहे. - सविस्तर वाचा

कोरोनाचा सर्वाधिक कहर सहन करणाऱ्या मुंबईत कोरोनाची लस दाखल, आता प्रतीक्षा १६ तारखेची
अवघ्या २४ तासात देशातील तब्बल १३ शहरांमध्ये ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीकडून संशोधित आणि सिरम इन्स्टिट्यूट कडून तयार केल्या गेलेल्या कोव्हीशील्ड लस वितरित केली गेलीये. - सविस्तर वाचा

महाराष्ट्र राज्याला लस वितरण करताना केंद्र सरकारने घेतला आखडता हात
कोरोनाचा देशातील सर्वाधिक उद्रेक महाराष्ट्रात होऊनही राज्याला लस वितरण करताना केंद्र सरकारने आखडता हात घेतला आहे. राज्याला १५ लाख ७२ हजार डोस मिळणे अपेक्षित होते. - सविस्तर वाचा

Special Report | आवड जोपासण्यास महिलांना सवड नाही; चूल आणि मूल सांभाळण्यात किमान चार तास खर्ची 
आज जगातील कोणतेही काम स्त्रियांना अशक्‍य नाही, असे म्हटले जाते तरीही महाराष्ट्रातील गृहिणींचे अजूनही रोजचे किमान चार तास स्वयंपाक आणि मुलांच्या संगोपनात जातात. - सविस्तर वाचा

नाशिकमधील साहित्य संमेलनाध्यक्षपदासाठी ही नावे चर्चेत! उत्सुकता पोचली शिगेला
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकला घ्यायचे निश्‍चित झाले असताना मराठी सारस्वतांमध्ये संमेलनाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबद्दलची उत्सुकता शिगेला पोचली आहे. - सविस्तर वाचा

अखेर टेस्लाचे भारतात आगमन; एलॉन मस्क यांची महाराष्ट्राऐवजी दुसऱ्या राज्याला पसंती
अमेरिकेची दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे (Tesla Motors India) अखेर भारतामध्ये आगमन झाले आहे. टेस्लाने बेंगळुरुमध्ये एक शोध विकास कंपनीची स्थापना केली आहे. - सविस्तर वाचा

मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना भेटणार; सर्वपक्षीय नेत्यांचा शिष्टमंडळात समावेश
मराठा आरक्षणाच्या कायदेशीर लढाईला गती देण्यासाठी आता राज्यातील सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहे. - सविस्तर वाचा

चिकन अन् अंड्यांची मागणी घटली, पोल्ट्री उद्योगाला ३० कोटींचा फटका
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पूर्णपणे मोडकळीस आलेल्या कुक्कुटपालन व्यवसायाला चांगले दिवस येऊ लागले असताना 'बर्ड फ्लू'चा उद्रेक झाला. - सविस्तर वाचा

रेशनकार्डधारकांनो हे माहिती आहे का? 31 जानेवारीपर्यंत आधार लिंक न केल्यास मिळणार नाही धान्य
शिधापत्रिकाधारकांनी कुटुंबातील सर्व सदस्यांनी आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक लिंक करुन घ्यावा. त्यासाठी 31 जानेवारीपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. - सविस्तर वाचा

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

B.Ed student set herself on fire: खळबळजनक! विभागप्रमुखाच्या लैंगिक छळाने त्रस्त बी.एडच्या विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल; भर कॉलेजमध्येच स्वतःला घेतलं पेटवून

IND vs ENG 3rd Test: रिषभला जसं बाद केलं तसंच करायला गेले, पण सहावेळा तोंडावर आपटले; इंग्लंडची चूक भारताच्या पथ्यावर Video

Pune News: माेठी बातमी! 'संजय जगताप यांचा पुणे जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा'; पुरंदर-हवेली मतदारसंघात खळबळ

Solapur: राष्ट्रवादीच्या दोन जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सोमवारी सुटणार?; बळिराम साठे ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटणार

Latest Marathi News Updates : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT