दुपारच्या बातम्या: ट्रम्पना धक्का ते मोदींनी व्यक्त केली चिंता; महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर

Afternoon.
Afternoon.

1.मोदी म्हणतात, वॉशिंग्टनमधील दंगल पाहून अस्वस्थ; लोकशाहीत शांतपणे सत्तेचे हस्तांतरण आवश्यक

डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी व्हाईट हाऊस आणि कॅपिटल बिल्डींगच्या बाहेर जमून आत घुसून मोठा गोंधळ घातला आहे. अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा अशी 
घटना घडली आहे. या धुमश्चक्रीत एका आंदोलक महिलेचा मृत्यू देखील झाला आहे. या घटनेनंतर वॉशिंग्टन डिसीमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन शांततेचे आवाहन केले आहे. सविस्तर बातमी-

2.काय सांगता! लग्नात पाहुणा म्हणून आला आणि नवरदेव झाला

कर्नाटकच्या चिकमगळूर जिल्ह्यात लग्न तुटल्याने एक दुर्मिळ घटना पाहायला मिळाली आहे. लग्नाच्या दिवशीच नवरा मुलगा आपल्या गर्लफ्रेंडसोबत पळून गेला. सविस्तर बातमी-

3.Corona Update : देशात बरे झालेल्या रुग्णांची संख्या कोटींच्या पार; गेल्या 24 तासांत 222 रुग्णांचा मृत्यू 

गेल्या 24 तासांत भारतात 20,346 रुग्ण सापडले आहेत. या नव्या रुग्णांसह देशातील एकूण आजवरच्या रुग्णांची संख्या ही 1,03,95,278 वर जाऊन पोहोचली आहे.  सविस्तर बातमी-

4.न्यायालयातील १६ कर्मचारी बडतर्फ;पाटणा उच्च न्यायालयाचा निर्णय

विशेष न्यायालयात कर्मचारी व इतरांमध्ये लाचेची देवाणघेवाण सुरू होती. त्यावेळी, वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने हे सर्व प्रकरण आपल्या कॅमेरात टिपले होते. हे प्रक्षेपण पाहिल्यानंतर  या कर्मचाऱ्यांना पाटणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायधिश राजेंद्र मेनन यांनी निलंबित केले होते. सविस्तर बातमी-

5. ' अखेर The Family Man 2 च्या प्रदर्शनाची तारीख ठरली'

बहुचर्चित अशा द फॅमिली मॅनच्या दुस-या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना मागील वर्षभरापासून होती. मात्र त्या अंतिम तारखेला काही मुहूर्त लागत नव्हता. कमालीची लोकप्रियता वाट्याला आलेल्या या मालिकेनं प्रेक्षकांना वाट पाहायला लावली होती. आता ती केव्हा प्रदर्शित होणार याची तारीख निर्मात्यांनी नक्की केलं आहे. सविस्तर बातमी-

6. Aus vs Ind 3rd Test Day 1: पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया 2 बाद 166 धावा

कसोटीत पदार्पणात अर्धशतकी खेळी करणाऱ्या विल पुकोवस्की आणि मार्कस लाबुशनच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने पहिल्यादिवसाअखेर 2 बाद 166 धावा केल्या आहेत. सविस्तर बातमी-

7. 'राणा दाम्पत्य म्हणजे नाटक कंपनी'

डनेरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि शिवसेना नेते व अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यातील वाद पुन्हा शिगेला पोहोचला आहे. सविस्तर बातमी-

8. Aurangabad: विद्यापीठ सुरू करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठ चालू करण्याचे निर्देश दिले असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणताच निर्णय घेत नाही. यामुळे विद्यापीठातील सर्व विद्यार्थी संघटनांनी एकत्रित येत बुधवारी विद्यापीठात दिवसभर ठिय्या आंदोलन केले. पोलिसांनी रात्री नऊ वाजता आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. सविस्तर बातमी-

9. सोनू सूद अडचणीत, सहा माजली निवासी इमारतीला हॉटेलमध्ये रूपांतरित करण्याचा BMC चा आरोप; पोलिसात तक्रार दाखल

लॉकडाऊन दरम्यान गरिबांना मदत करणारा सोनू सूद आता विवादात अडकताना पाहायला मिळतोय. मुंबई महानगर पालिकेने सहा माजली निवासी इमारतीला हॉटेलमध्ये रूपांतरित केल्याच्या आरोपात सोनू सूद विरोधात जुहू पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सविस्तर बातमी-

10. शहरांची नावं बदलून लोकांच्या आयुष्यात काय बदल झाले? - बाळासाहेब थोरात

सध्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा राज्यभर चर्चेचा ठरत आहे. कारण या नामांतर मुद्द्यावर सुरुवातीला भाजप-शिवसेना नेते एकमेकांवर टीका करताना दिसले होते. नंतर यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनीही उडी घेतली होती. सविस्तर बातमी-

11. हेमंत नगराळे, महाराष्ट्र पोलिसांचे नवे बॉस! लवकरच स्वीकारणार पदभार

महाराष्ट्राचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या बदलीनंतर राज्यातील महासंचालक पद रिक्त झालं होतं. या रिक्त पदावर आता हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे. सविस्तर बातमी-

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com