रहस्य, थरार, आणि कल्पनेपलीकडील...चुकवू नये असे टॉप 10 भारतीय चित्रपट!

Top 10 Indian movies beyond imagination and Drama Mystery thriller on Youtube netflix, Prime
Top 10 Indian movies beyond imagination and Drama Mystery thriller on Youtube netflix, Prime

भारतात कित्येक असे चित्रपट आहेत की ज्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळतो, बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई देखील करतात. इतके चांगले चित्रपट भारतात तयार होत असूनही त्यांना ऑस्कर ऑवर्ड का नाही मिळत हा प्रश्न प्रेक्षकांना नेहमी सतावत असतो. त्याचे मुख्य कारण म्हणजे भारतीय चित्रपटांबाबत असलेला गैरसमज. भारतीय चित्रपटांबाबत असा समज आहे की, आपण इंटरनॅशनल चित्रपटांसारखे इमॅजिनेशन(काल्पनिकता), रिस्क (धाडस) , इनोव्हेशन (नाविन्य) असलेले चित्रपट बनवू शकत नाही. इकडून तिकडून उचलून, कॉपी करून चित्रपट बनवले जातात. पण हे सत्य नसून, खरे कारण म्हणजे, भारतीय सिनेमांना योग्य वेळी योग्य प्रतिसादच मिळाला नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण आहे, गल्ली बॉय चित्रपट.

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेल्या गल्ली बॉयची (ऑस्कर) 92 व्या अकॅडमी अवॉर्ड्समध्ये आंतरराष्ट्रीय फिचर फिल्म प्रकारात भारताच्या अधिकृत प्रवेश म्हणून निवड झाली होती. पण, तुम्बांड सारखा, उत्तम अभिनय, उत्तम छायांकन, उत्तम कथा, उत्तम दिग्दर्शन असलेला चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा कोणीही तो चित्रपट पाहिला नाही. त्या चित्रपटाबाबत ना कोणी रिव्हीव्यू (समीक्षा) केला, ना कोणी कसली चर्चा केली. तुम्बांड सारखे मास्टरपिस सिनमेटोग्राफी(छायांकन),  कल्पनेपलीकडील आणि नाविन्य असलेले टॉप १० भारतीय चित्रपटांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

हे ही वाचा: अभिनेत्री तापसी पन्नूला हेल्मेट न घालता बाईक चालवणं पडलं महागात

१. तुम्बाड (२०१८) :  


जो चित्रपट पाहून तुम्हाला धक्का बसतो अशा चित्रपटांना आपण कल्पनेपलीकडील चित्रपट समजतो. भारतीय चित्रपटांबाबत आजही गर्व बाळगता येईल असा २०१८ मध्ये प्रदर्शित हॉरर थ्रिलर(भयपट) चित्रपट 'तुम्बाड'.  तब्बल  ६ वर्ष मेहनत घेतल्यानंतर इंटरनॅशल चित्रपटांच्या तोडीचा असा 'तुम्बाड' सारखा मास्टर पीस चित्रपट म्हणून मिळतो. या चित्रपटात उत्तम सिनेमॉटॉग्राफी तर पाहायला मिळेल.  'तुम्बाड' हा एक पौराणिक भयपट आहे ज्यामध्ये पुर्ती देवी आणि पहिला मुलगा हस्तर यांचा उल्लेख केला आहे. याच कल्पने भोवती माणसाचा लालचीपणा आणि घमंड याबाबत शिकवण देणारी कथा गुंफली आहे. 'तुम्बाड' नावाच्या गावात एक जुन्ना किल्ला आहे. या किल्ल्याच्या खाली खजिना आहे. या दंतकथेमुळे हा किल्ला प्रसिध्द आहे. हा खजिना मिळविण्याचा खूप जणांनी प्रयत्न करतात पण कोणीच पोहचू शकत नाही.'तुम्बाड' सारखा दुसरा चित्रपट तुम्हाला पाहायला मिळणार नाही.  

अनुराग कश्यप दिग्दर्शित  २००७ मध्ये प्रसिद्ध झालेला 'ब्लॅक फ्रायडे' हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत  आहे. हा चित्रपट भारतीय नागरिकांनी बनविला असून भारतात चित्रीत झाला आहे आणि भारतीयांनीच बॅन देखील केला आहे. तुम्ही गँगस् ऑफ वासेपूर पाहिली असेल तर तुम्हाला माहीत असेल की, अनुराग कश्यप यांचे चित्रपटाचे दिग्दर्शन बेधडक आणि बिनधास्त असते. १९९३ मध्ये मुंबईत झालेल्या बॉम्ब ब्लास्ट नंतर कशा प्रकारे मुंबई पोलिस मास्टर माईंडला पकडण्यासाठी प्रयत्न करते हे दाखविणारा हा चित्रपट आहे. 

क्राईम थ्रिलर प्रकारात उत्तम चित्रपट म्हणून इतिहासात नोंद होईल असा २०१८ मध्ये प्रदर्शित चित्रपट 'रतसासन'. या चित्रपटाची कथा सुरु होते, फिल्म मेकर बनण्याचे स्वप्न सोडून पोलिस ऑफिसर बनलेल्या अर्जुन समोर एका सायको किलरची केस येते, आणि त्याच लाईफ अचानक बदलून जाते. २ तास ५० मिनिटांचा या एकाच चित्रपटात तुम्हाला ३-४ ड्रामा थ्रिलर चित्रपट पाहिल्याचा फिल येतो. याची कथा आणि स्क्रिन प्ले या चित्रपटाला चौकटी बाहेर नेऊन ठेवते.यातील 'व्हिलन'चे पात्र या चित्रपटाला खास बनवतो.

४. कहानी (२०१२) :

मास्टरपिस चित्रपट म्हणून नावजलेला हा २०१२ मध्ये प्रदर्शित चित्रपट 'कहाणी'. विद्या बालनने मुख्य भूमिका साकारलेला चित्रपट हा तिच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. सुजॉय घोष यांच्या दिग्दर्शनामुळे या चित्रपटाचा प्रत्येक सीन(दृश्य) लक्षात राहतो. विद्या नावाची एक प्रेग्नेंट महिला तिच्या गायब असलेल्या नवऱ्याला शोधण्यासाठी लंडनवरुन भारतात येते. चित्रपटातील आवाक करणारे सिन, रहस्य उलघडणारी कथा आणि विद्या बालनचा अभिनय यामुळे हा चित्रपट क्लासिक हिट ठरलेला आहे. 

उत्तम अभिनय आणि सादरीकरणबाबत चर्चा करताना विजय सेतूपती याचे नाव तर आलेच पाहिजे.  २०१६ मध्ये प्रदर्शित चित्रपट ड्रामा थ्रिलर चित्रपट 'सुपर डिलक्स'. लाईफ, मॉरेलिटी, सेक्स, जेंडर डिस्किमिनेशन, मॅरेज, पॉलिटिक्स आणि रिअॅलिटी या सर्वाचा मेळ या चित्रपट साधला आहे. या चित्रपटा दहा वेगवेगळ्या छोट्या कथा दाखविल्या आहेत ज्यांचा प्रत्यक्षात काही संबध नाही. यातील प्रत्येक कथा आणि प्रत्येक पात्र स्वत:ची छाप सोडून जाते.  प्रत्येत पात्र वेगळे भाव आणि वेगळा विचार मांडताना दिसत आहे. त्यामुळेच हा साऊथचा मास्टरपिस चित्रपट आहे. 

६. सरबजीत(२०१६) :

बॉलीवूडमध्ये चित्रपटातील भूमिकेसाठी बॉडी ट्रॉन्फॉरमेशन करणारा अभिनेता म्हणून आमिर खान ओळखला जातो. परंतू या यादीत अभिनेता रणदीप हुडा याचे नाव देखील घ्यावे लागेल.  2016 मध्ये उमंग कुमार दिग्दर्शित चित्रपट सरबजीत. या चित्रपटातील भाव इतके स्टॉंग आहेत पाषाण हद्यी माणसालाही रडू येईल. दारुच्या नशेमध्ये सरबजीत चुकून भारत पाकिस्तान  बॉर्डर क्रॉस करतो आणि त्याला पाकिस्तान आर्मी अटक करते. सरबजीतला निर्दोष सिध्द करुन पुन्हा भारतात आणण्याचा प्रवास मांडणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून रणदीपचा अभिनय आणि बॉडी ट्रान्फॉरमेशनवर लक्ष दिले तर, तुम्ही चित्रपट पाहात असे तुम्हाला वाटणारच नाही.

भारतीय चित्रपट चौकटीपलीकडील चित्रपट बनवत नाही समजणाऱ्यांनी २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट 'गेम ओव्हर' नक्की बघितला पाहिजे. सपना एक गेम डिझाईनर असते. तिला पोस्ट ड्रॅमॅटिक डिसऑर्डर नावाचा आजार असतो. तिला अंधाराची भीती वाटत असल्यामुळे बऱ्याचदा झटके येत असतात. अशा मुलीच्या घरात जेव्हा एखादा सिरीयल किलर घुसतो तेव्हा तिची लाईफ एकदम उलट सुलट होऊन जाते. चित्रपटाचा पहिला भाग स्लो वाटत असला तरी मध्यांतरानंतर हा चित्रपट रंगतदार होत जातो. ताप्सी पन्नू हिने या चित्रपटात मुख्य भूमिका साकरली असून उत्तम अभिनय देखील केला आहे. मुळ साऊथमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपटाचे हिंदीमध्ये डबिंग करण्यात आले आहे.



२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला 'आपला माणूस' हा मराठी चित्रपट नक्की बघा. आबा गोखले नावाचा एक म्हातारा माणूस गॅलरीतून खाली पडून मरतो आणि या घटनेमागील सत्य जाणून घेण्यासाठी एन्ट्री होती इन्सपेक्टरची. इतकी सहज आणि सोपी या चित्रपटाची कथा आहे असे ज्यांना वाटत असेल त्यांनी चित्रपट नक्की बघितला पाहिजे. क्राईम, किलर चित्रपटाबाबत महत्वाची गोष्ट असते ती क्षणोक्षणी प्रेक्षकाला जाणवणाऱ्या गोष्टी खोट्या सिद्द करणे. हा चित्रपट आणि नाना पाटेकर यांचा अभिनय प्रेक्षकांना ते समाधान मिळवून देतो.

अभिनेता राज कुमार राव याची मुख्य भूमिका असलेला २०१९ मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट ट्रॅपड. राज कुमार राव याचा अभिनय आणि विक्रम मोटवानी यांचे दिग्दर्शन तुम्हाला हिप्नोटाईज करून टाकते.  एका अपार्टमेंटमध्ये एका कलाकारांना घेऊन प्रेक्षकांना २ तास खिळवून ठेवणारा हा चित्रपट सर्व्हायव्हल चित्रपट बनिवण्यासाठी नक्कीच धाडस लागते. लॉकडाऊन आणि  क्वारांटाईन सारख्या स्थिती पाहण्यासाठी हा एकदम योग्य चित्रपट आहे. 

१०. परी (२०१८) :

बॉलीवूड चित्रपटांकडून हॉरर चित्रपटांची अपेक्षा पुर्णपणे सोडली आहे. पण, तुम्हाला काही तरी नवीन पाहायचे असेल आणि तुमच्याकडे थोडासे पेशंन्स असतील  २०१८ मध्ये रिलीज झालेला 'परी' चित्रपट नक्की बघा. अभिनेत्री अनुष्का शर्मा या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत असून कथा नक्कीच तुमच्या कल्पनेच्या पलीकडे आहे. अनुष्काने या चित्रपटात केलेले काम अभिनेत्री म्हणून करिअरमधील उत्तम अभिनय केलेला चित्रपट म्हणून ओळखला जातो. 

हे ही वाचा: नीतू कपूर यांनी ७ वर्षांनंतर सेटवर केलं कमबॅक, 'या' सिनेमाच्या शूटींगला केली सुरुवात  

हे चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कल्पनेच्या पलीकडील, नाविन्य आणि चौकटी बाहेरील चित्रपट करण्याची क्षमता भारतीय चित्रपटामध्ये आहे. कमी आहे ती प्रेक्षकांनी जजमेंटलपणाचा चष्मा काढून टाकण्याची. जो पर्यंत आपण कोणताही किंतू-परंतू मनात न बाळगता आपण असे चित्रपट बाळगणार नाही तोपर्यंत उत्तम चित्रपट पाहण्याचा आनंद घेऊ शकणार नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com