Viral Satya : 8 कात्र्या अन् लायटर, मेणबत्तीने हेअरस्टाईल करणारा अवलिया (Video) 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 27 September 2019

एका कात्रीनं केस कापणं म्हणजे तुम्हा आम्हाला सहज जमेल...पण, 8 कात्र्या हातात पकडून केस कापणं तसं सोप्पं काम नाही...मात्र, या व्यक्तीच्या हातात1, 2, 3, 4, 5, 6, 7 8 कात्र्या यांच्या हातात आहेत...चक्क एका हातात आठ आठ कात्र्या पकडून ही व्यक्ती हेअर स्टाईल करतेय.

​एका कात्रीनं केस कापणं म्हणजे तुम्हा आम्हाला सहज जमेल...पण, 8 कात्र्या हातात पकडून केस कापणं तसं सोप्पं काम नाही...मात्र, या व्यक्तीच्या हातात1, 2, 3, 4, 5, 6, 7 8 कात्र्या यांच्या हातात आहेत...चक्क एका हातात आठ आठ कात्र्या पकडून ही व्यक्ती हेअर स्टाईल करतेय. हटके हेअर कटिंग करणाऱ्या या अवलियाचं नाव आहे प्रशांत खरे. प्रशांत लायटर आणि मेणबत्तीच्या आगीनं हेअर सेटिंगही करतात. प्रशांतच्या या मेथड्स ग्राहकांच्या पसंतीला उतरल्या आणि बघता-बघता पिंपरी चिंचवडमध्ये ते फेमस झाले आहेत.

हेअर स्टाईल आणि हेअर स्टाईल करण्यासाठी वापरल्या जाणारी पद्धत यामुळंच प्रशांत खरे प्रसिद्ध झाले आहेत. आधी सलूनमध्ये सहज जरी आलं तरी तासभरात केस कापून व्हायचे. पण, त्यांच्या हटके स्टाईलमुळं आता सलूनमध्ये केस कापण्यासाठी यायचं झाल्यास 2 ते 3 दिवस आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागते.

प्रशांत खरेंनी हेअर स्टाईल ऍण्ड कटिंगमध्ये डिप्लोमा केला. पण आठ कात्रीने केस कापणे, लायटर-मेणबत्तीच्या आगीने हेअर सेट करणे या पद्धती ते स्वत: अनुभवातून शिकले आहेत. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करत असल्यानं प्रशांतच्या सलूनमध्ये मोठ्या संख्येनं ग्राहक येत असतात.

हटके स्टाईलने केस कापणे, ग्राहकांना वेगळं काहीतरी करून दाखवणं अशी कला सर्व सलूनमध्ये पोहचवण्याचा मानस प्रशांतचा आहे. त्यामुळं भविष्यात तुम्ही जात असलेल्या सलूनमध्ये केस कापण्याची अशी स्टाईल पाहिली तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

 

***************************************************************

आणखी वाचा  : 

Viral Satya : साळींदरवर हल्ला करणं बिबट्याला पडलं भारी (Video)

Viral Satya : सावधान! ‘गुगल पे’वरून व्यवहार करताय? (Video)

Viral Satya : चक्क विमानातून भात पेरणी! (Video) 

Viral Satya : सावधान! कलर टॅटू ठरतोय शरीरासाठी घातक? (Video)

Viral Satya : व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिनची ग्रुप मेंबरला पार्टी (Video)

Viral Satya : बंद बॅगेतून 5 महिन्यांच्या बाळाचा 1180 किमी प्रवास (Video)

Viral Satya : नागिन डान्स केला आणि जीव गेला! (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : रेड्याला शर्यतीला जुंपले अन् काय झाले पाहा (Video)

Viral Satya : पाकिस्तानात एक्सरे मशीनमधून निघाली माणसं ! (Video)

Viral Satya : गाडी चालवताना झोप लागल्यास उठवणारं यंत्र? (Video)

Viral Satya : आता मिळणार तिखट टोमॅटो? (Video)

Viral Satya : मशरूम खाल्ल्याने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी? (Video)

Viral Satya : सापांना जीवदान देणारा स्नेकमॅन! (Video)

Viral Satya : मोबाईलमुळे तरूणाईला जडतोय 'नोमोफोबिया' आजार? (Video)

***************************************************************


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Satya video Hairstylist with eight scissors and lighters, with a candle