Viral Satya : तुमची बँक कायमची बंद होणार? (Video)

bank-close
bank-close

9 बँका बंद होणार असा मेसेज प्रत्येकाच्या मोबाईलवर फिरू लागलाय. या मेसेजनं सगळ्यांचीच झोप उडालीय. आपल्या पैशांचं काय होणार? बँका फसवणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाल्यानं याची सत्यता जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

रिझर्व्ह बँक 9 बँका कायमच्या बंद करणार आहे. त्यामुळं तुमचे पैसे सुरक्षित बँकेत ठेवा. सुप्रीम कोर्टानं ऑर्डर काढली असून, बंद होणाऱ्या बँका कोणत्या आहेत पाहा.

कॉर्पोरेशन बँक, युको बँक, आयडीबीआय बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, आंध्र बँक, इंडियन ओव्हरसीस बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, देना बँक आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया

या सगळ्या बँका बंद होणार असल्याचा मेसेज व्हायरल होत असल्यानं ग्राहकांच्या मनात भीती निर्माण झाली. बँका बंद होणार असतील तर बँकेत ठेवलेल्या पैशांचं काय होणार? खरंच रिझर्व्ह बँक 9 बँका बंद करणार आहे का? याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी थेट रिझर्व्ह बँकेत पोहोचले.

PMC बँकेवर आय़बीआयनं निर्बंध लावल्याने ग्राहकांचे पैसे अडकलेयत. पण, ज्या 9 बँका बंद होणार आहेत हा मेसेज व्हायरल झाल्यानं आम्ही आरबीआय बँकेकडून अधिक माहिती मिळवली. त्यावेळी त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण पाहा. सोशल मीडियावर फिरत असलेला बँका बंद होणार याबद्दलची बातमी खोटी आहे.त्यावर विश्वास ठेवू नका. हा व्हायरल होत असलेला मेसेज धादांत खोटा आहे. लोकांची दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल केला जातोय. त्यामुळं तुम्ही या मेसेजकडे लक्ष देऊ नका. कोणतीही बँक बंद होणार नसल्याचं स्पष्टीकरण आरबीआयनं दिले आहे. त्यामुळं आमच्या पडताळणीत 9 बँका बंद होणार असल्याचा दावा असत्य ठरला.

***************************************************************

आणखी वाचा  : 

***************************************************************

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com