Shahrukh Khan Birthday special blog Esakal
Blog | ब्लॉग

Blog: “ दुसऱ्यांच्या बायका “ पळवून झालेला सुपरस्टार….!

शाहरुख खानच्या वाढदिवसानिमित्तानं त्याच्या अनेक सिनेमांचा,भूमिकांचा आढावा घेणारा हा ब्लॉग त्याच्या कारकिर्दीतील अनेक इंट्रेस्टिंग गोष्टी सांगूुन जाईल.

सकाळ डिजिटल टीम

Shahrukh Khan: “जब तक बैंठने को ना कहा जाय शराफत से खडे रहो, ये स्टेशन है तुम्हारे बाप का घर नही ”….” जानी जिनके खुदके घर शिशेके हो वो दुसरों के घरपे पत्थर नहीं फेका करते” …." पुष्पा आय हेट टिअर्स"... “बडे बडे शेहेरों में ऐसी छोटी छोटी बाते होती रहेती है सेनोरिटा” …”आईसाहेब बाजीरावने मस्तानी से मोहोब्बत कि है अय्याशी नही ”… असे डायलॉग नुसत ऐकायचा अवकाश अख्खीच्या अख्खी फिल्म डोळ्यासमोर येते. मधुबालाची दिलकश अदा , किशोर कुमार यांचा नटखटपणा, राजेश खन्नाचे स्टारडम, प्राण यांनी प्राण ओतून केलेला अभिनय , मेहेमूदची कॉमेडी आजही या सर्व गोष्टी प्रत्येक सिनेरसिकाच्या मनात जिवंत आहेत. (Shahrukh Khan Birthday special blog)

रणबीर कपूर, रणवीर सिंग, खान मंडळी आणि अक्कीची चलती तर आहेच पण म्हणून आजची पिढी राजेश खन्ना, गुरुदत्त, मधुबाला अशा त्या काळातल्या स्टार्सलाही विसरली नाही. फिल्म्स न पाहणारा माणूस आपल्या भारतात सापडणं जरा अशक्यच. कारण बॉलिवूडची जादूच निराळी आहे. लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वच यात मुग्ध होतात. एकूणच काय बॉलिवूडची 'हवा' सर्वांनाच वेड लावते.

अमिताभने कहा है "पराया धन, पराइ नार पे नजर मत डालो , बुरी आदत है ये आदत अभी बदल डालो" पण आपल्या बॉलीवूड मध्ये असा एक सुपरस्टार आहे जो त्याच्या अशा हरकतीं पासून बाजच नाही येत. वो कहते है ना "खुदका बेटा और दुसरे कि बिवी हमेशा अच्छे लगते है"। पर सिर्फ अच्छा लगने तक ठीक है लेकिन अगर कोई इन्सान हमेशा दुसरे कि बिवी पे या प्यार पे नजर डालता है तो?लाईन मारता हो तो? आप कहेंगे कि ऐसे इन्सान कि तो पिटाई हि होती होगी हर रोज.. पर ऐसा नही है, उलट त्याच्या अशा वागण्यामुळे त्याला आपण भरभरून प्रेम दिलं.. कोण असेल हा सुपरस्टार ओळखा बरं? आठवतोय ? नाही.. चला एक क्लू देतो...

खान मंडळींपैकी एक आहे तो... द्या थोडा डोक्याला ताण.. आठवा आठवा.. नाही आठवतेय... चला अजून एक क्लू देतो, "कभी कभी जितने के लीये कुछ हारना भी पड़ता है और हार कर जितने वाले को बाजीगर कहेते है...आय लव्ह यू क क क किरन"...येस अगदी बरोबर तो म्हणजे आपला ना सलमान ना आमिर, बॉलीवूडचा किंग शाहरुख खान.. हो हो शाहरुख.. बॉलिवूडचा किंग खान आणि रोमान्सचा बादशाह अशी बिरुदं मिरवणाऱ्या शाहरुखच्या मानात आणखीन एक बिरुदाचा समावेश केला तर नवल नका वाटून घेऊ.

ते म्हणजे ऑनस्क्रीन दुसऱ्यांच्या बायका पळवणारा खान, कारण शाहरुखने मोस्ट ऑफ द फिल्म्स मध्ये दुसऱ्याच्या बायकाच पळवल्यात. हो हो अहो खरंच.. विश्वास बसत नाही ना?

त्याचा पहिला चित्रपट आठवा बरं... 'दिवाना' ज्यामध्ये दिव्या भारती ऋषी कपूरची बायको असते. ऋषी कपूर अपघातानंतर थोडा वेळ गायब काय होतो इकडे शाहरुख दिव्या भारतीच्या प्रेमात पडतो. शाहरुखच्या या दिवान्या अंदाजाला देर सवेर हि सही 'ऐसी दिवानगी देखी नहीं कहीं, मैने इसलिये जानेजाना दिवाना... तेरा नाम रख लिया...' असं म्हणत दिव्या भुलते. फिल्म मध्ये ऋषी कपूरची रिएन्ट्री होऊनही शेवटी ती शाहरुख खानलाच मिळते. नुसतं एवढच नाही, इतकं इम्प्रेस करतो हा पठ्ठ्या ऋषी कपूरला क ऋषीच त्याच्या बायकोचा हात शाहरुखच्या हातात देतो.

'आय लव्ह यू क क क किरन' शाहरुख खानला त्याची ओळख मिळाली ती या डायलॉगमुळे. आपण कधीच विसरू शकणार नाही 'ड'र या फिल्म मधील शाहरुखचा तो psycho लव्हर वाला अंदाज. की कसं 'जादू तेरी नजर.. खुशबू तेरा बदन... तू हा कर... या ना कर... तू है मेरी किरन..' हे गाणं म्हणत शाहरुखनं जूहीला अख्ख्या कॉलेजमध्ये त्याला शोधत फिरवलं होतं. तिला वाटलं कि ती ज्याच्यावर प्रेम करतेय तो सनी देओलच तिच्यासाठी गाणं म्हणतोय पण जेव्हा तिला कळलं कि हा तर वेगळाच आशिक आहे तेव्हा मात्र तिची भंभेरी उडाली.

यामध्ये किरण म्हणजे जुही चावला ही सनी देओलची बायको असते आणि शाहरुखची कॉलेजची मैत्रीण असते, पण शाहरुख खान तिच्यावर एकतर्फी प्रेम करत असतो. तिचे लग्न झाल्यानंतरही शाहरुख हार मानत नाही. उलट त्यांच्या हनिमूनला सुद्धा तो या कपलच्या म्हणजे अर्थातच किरणच्या मागे जातो. तिच्यावर असलेल्या शाहरुखच्या या अशा जीवघेण्या प्रेमामुळे बिचारी जुही घाबरत घाबरतच अख्ख्या फिल्ममध्ये वावरली. यात त्याला किरण तर मिळाली नव्हती पण या भूमिकेमुळे 'भाव' मात्र इतका मिळाला कि 'बेस्ट व्हिलन' म्हणून त्याला नॉमिनेट केलं गेलं आणि त्याने वठवलेल्या या अतरंगी भूमिकेमुळे फिल्म इतकी पॉप्युलर झाली कि 'नॅशनल फिल्म अवॉर्ड'ही मिळालं.

तुम्ही म्हणाल एखाद दुसरा असा पिक्चर केला हा तर योगायोग असेल पण तसं नाही पुढे पहा.

'माया मेमसाब' मध्ये तर शाहरुखने हाईटच केली होती... आठवतोय ना शाहरुखचा दीपा साही बरोबरच्या रोमांसचा तो कॉंट्रोव्हर्शिअल सीन.. यात दीपा साही जी फारूख शेख ची बायको असते. शाहरुखने तिच्याशीच अफेअर केलं. माया मेमसाबचा डॉक्टर असलेला नवरा इकडे पेशंट्सना पाहण्यात व्यस्त असतो आणि इकडे बोअर झालेल्या या हाउस वाइफला तिच्यापेक्षाही वयाने लहान असलेला शाहरुख एका passionate अफेअर मध्ये गुंतवतो...अहो किती हा चालूपणा !

'आना मेरे प्यार को ना तुम झूठा समझो जाना' असं म्हणत दीपक तिजोरीवर प्रेम करत असलेल्या सुचित्रा कृष्णमूर्तीला उर्फ ऍनाला शाहरुख पटवतो आणि ती हि दीपक तिजोरी बद्दल झालेल्या गैरसमजामुळेच का होईना पण 'कभी हा कभी ना' करत शाहरुखवर प्रेम करते.

शाहरुखला माहीत असतं कि त्याचा मित्र दिपक तिजोरी ऍना वर प्रेम करतोय आणि ती ही त्याला पसंद करतेय तरीही तो त्या दोघांमधलं कन्फयुजन वाढवायचाच प्रयत्न करतो. म्हणजे यातही त्यानं दुसऱ्याच्या प्रेमावर डोळा ठेवलाच आहे.

यानंतर शाहरुख "बडी मुश्किल है खोया मेरा दिल है कोई उसे ढुंढ के लाए ना, जाके कहा मैं रपट लिखाऊ कोई बतलाए ना, मैं रोऊ या... हसू करू मैं क्या करू..." असं म्हणत एअर पोर्टवर पार लोळत एअर हॉस्टेस असणाऱ्या माधुरीला हाथ धुवूनच नाही तर पार अंघोळ करून मागं लागला. आता तुम्हीच सांगा कोण घेईल हो याची रपट लिहून? इतका पागल झाला या कोल्हापूरच्या मिरचीच्या मागे कि तो पाहतही नाही कि ती आपल्यावर प्रेम करतेय का नाही करतेय... तीचं, या अठरा बरसच्या कवारीचं दीपक तिजोरीशी लग्न होतं, तिला मुलं होतात, पण यानंतरही पिच्छा सोडेल तो शाहरुख कसला, हट्टालाच पेटला गडी तिला आपलं बनवायच्या नादात तिच्या नवऱ्याला म्हणजे दीपक तिजोरीला मारून तिचं आयुष्य उद्धवस्त केलं , पण पिच्छा काही सोडला नाही आणि म्हणूनच 'अंजाम'साठी बेस्ट परफॉर्मन्स इन निगेटिव्ह रोलचं अवॉर्ड जिंकून गेला. अहो लिस्ट अजून संपली नाही. अजून बऱ्याच जणांच्या बायका शाहरुखने पळवल्यात.

"राज अगर ये तुझे प्यार करती है तो ये पलट के देखेंगी" आठवला 'डीडीएलजे' मधला हा फंडा? आजही कित्येक तरुण आपल्या रिअल लाईफ मध्ये हा आजमावतात. "रुक जा दिल दिवाने पुछू तो मैं जरा" म्हणत युके ट्रीपवर आलेल्या सिमरनला म्हणजे काजोलला पटवायचा प्रयत्न करतो. दोघांचीही ट्रेन मिस होते, तेव्हाही 'तो तुम मेरे साथ हो सिमरन अब कोई गडबड नही होगी' असं म्हणत अखडू वाटणाऱ्या सिमरनलाही पटवतो. आता इतके प्रयत्न केल्यावर रोमान्सच्या किंगची ही ट्रिक फेल कशी जाईल. काजोलही इतकी इम्प्रेस होते शाहरुखवर की ट्रीपवरून परतताना तिलाही जाणवतं 'हो गया तुझको तो प्यार सजना... लाख करले तू इन्कार सजना...'. पण तिच्या वडिलांनी म्हणजे अमरीश पुरीने काजोलचं लग्न आपल्या लहानपणीच्या मित्राच्या मुलाशी म्हणजे परमजित सेठी(कुलजित सिंग)ठरवलेलं असतं. पण म्हणून मागे हटेल तो शाहरुख कुठला.

तोही सिमरनशी लग्न करण्यासाठी पंजाबला येतो. तिचा साखरपुडा कुलजित बरोबर होऊनही तिथे "मेहेंदी लगाके रखना डोली सजाके रखना... लेने तुझे ओ गोरी आएंगे तेरे सजना" इतकं कॉन्फीडन्टली म्हणतो आणि तिच्या सगळ्या घरच्यांनाही पटवतो कि शेवटी अमरीश पुरीही म्हणतो "जा सिमरन जा इस लडके से ज्यादा प्यार तुझे और कोई नही कर सकता... जा सिमरन जा जीले अपनी जिंदगी"! काय म्हणावं आता या पठ्ठ्याला ! बापालाही कन्व्हिन्स करून दुसऱ्याची बायको पळवतो. यात तो सिमरन तर घेऊन गेलाच शिवाय बेस्ट ऍक्टर म्हणून फिल्मफेअर अवॉर्डही घेऊन गेला.

करण-अर्जुन मध्येही काजोलला हॉर्स रायडींग शिकवून झाल्यावर 'जाती हू मैं' असं जर काजोल म्हणाली तर शाहरुख विचारायाचा 'जल्दी है क्या', यातही काजोलच्या वडिलांनी तिचं लग्न त्यांच्या मित्राच्या म्हणजे अमरीश पुरीच्या मुलाशी ठरवलेलं असतं.

आणि यातही शाहरुख त्याच्या स्वभावाप्रमाणे काजोलशी लग्न करण्यासाठी तिच्या मागे जातो आणि कामयाबही होतो.

एकदा तर शाहरुखने आपल्या मालकाच्या बायकोलाच पळवलय. वयाने म्हातारा असलेला त्याचा मालक राजा साब म्हणजे अमरीश पुरी गौरी नावाच्या आपल्या मुलीसामान वयाच्या मुलीशी म्हणजे माधुरी दीक्षितशी जबरदस्ती धोक्याने लग्न करतो. यात शाहरुख मुका असला तरी फक्त बासरी वाजवून माधुरीला पटवतो. कमाल आहे कि नाही! साध्या आणि वयाने तरुण असलेल्या शाहरुखवर एकटी पडलेली माधुरीही प्रेम करायला लागते. आणि अशा तऱ्हेनं 'कोयला'मध्ये पुन्हा एकदा अमरीश पुरीच्या बायकोला शाहरुख खान पळवतो.

येस बॉस, येस बॉस म्हणत आपल्या बॉसला आवडणाऱ्या मुलीवरच लाईन मारायचा आज्ञाधारकपणा फक्त शाहरुखच करू शकतो. 'बस इतनासा ख्वाब है, बस इतनासा ख्वाब है' करत बॉसला म्हणजे आदित्य पांचोलीला आवडत असलेल्या मुलीवरच म्हणजे जुही चावलावर तो प्रेम करतो. 'सुनीये तो रुकीयो तो क्यू है खफा कहीये तो ' करत बॉससाठी जुहीला पटवायला जातो आणि "मैं कोई ऐसा गीत गाऊ... के आरजू जगाऊ अगर तुम कहो" स्वतःच तिला पटवतो. आहे कि नाही भन्नाट गडी!

पहिल्या भेटीतच गंगाला पाहून क्लीन बोल्ड झालेला अर्जुन म्हणजे शाहरुख अमरीश पुरीच्या उपकाराखातर आपल्या भावना आवरतो आणि तिचं अपूर्वशी लग्न जमवायचं आणि लग्नासाठी अपूर्वाला कन्व्हिन्स करायचं काम करतो. अपूर्व आणि महिमाचा साखरपुडाही होतो. दोघांना एकमेकांच्या लाईफ स्टाईल बद्दल माहीत व्हावं म्हणून गंगाला अमेरिकेला पाठवतात. पण तिकडे गेल्यावर मात्र हिंदुस्थानी दिल असलेल्या शाहरुखलाच महिमाही पसंद करायला लागते. अन तुम्ही योगायोग म्हणा हवं तर पण इथेही "जरा तस्वीर से निकल के सामने आ मेरी मेहबूबा" म्हणत असलेल्या शाहरुखला त्याची मेहबूबा हाक देतेच.

"मोहोब्बत क्या है.. मोहोब्बत जिंदगी है .. मेरा विश्वास है के भगवान ने सारे दिल के रिश्ते पहलेसेही जोड दिये है.. बस उनका मिलना हम पे छोड दिया है ... उसने हम सबको जोडीयो में बनाया है और हर एक के लिए कोई एक जीवनसाथी है... मुझे तो पुरा भरोसा है के कही ना कही कोई ना कोई मेरे लिए बनाया गया है... और कभी ना कभी मै उससे जरूर मिलूंगी.. अच्छा, लेकिन मुझे कोई बतायेगा प्लीज के मुझे कैसे मालूम पडेगा के मेरे लिये कौन बनाया गया है, मेरा मतलब क्या वो मेरे नाम का बोर्ड लेकर घूम रही होगी? या फिर उसको देखकर कुछ बादल गरजने लगेंगे? बिजली कडकने लगेगी क्या होगा? मै उसे कैसे पेहचानूंगा? दुसरों का तो मै नही जानती लेकिन मै पेहेचान लुंगी.. वो मुझे एक इशारा करेगा और मेरा दिल समझ जायेगा" 'दिल तो पागल हैं' मधला हा रोमँटिक सीन ! यातही या माधुरीचं तिच्या लहानपणीच्या मित्राशी म्हणजे अक्षय कुमारशी लग्न होणार असतं.

पण ड्रामा डायरेक्टर शाहरुख असे काही आपल्या रोमान्सचे जलवे दाखवतो कि माधुरी शाहरुखचीच होऊन राहते. अन इथेही बाजी शाहरुख मारून जातो आणि अक्षय कुमार मात्र खाली हाथच राहतो.

"हम एक बार जीते है, एक बार मरते है और प्यार भी एकही बार होता है। राहुल इज अ चीटर। कुछ कुछ होता है अंजली तुम नही समझोगी।" राहुल म्हणजे शाहरुखला राणी मुखर्जीच्या डेथनंतर काजोलच्या प्रेमाची प्रचिती येते जी त्याची कॉलेजची मैत्रीण असते. आठ-दहा वर्षानंतर भेटलेल्या कॉलेज मधल्या या बेस्ट फ्रेंड्स ना एकमेकांबद्दल पुन्हा एकदा प्रेम वाटायला लागतं. पण काजोलच लग्न अमन उर्फ सलमान खान सोबत ठरलेलं असतं. एंगेजमेंटही होते. आता राहुलच्या परत येण्याने अंजलीचं कन्फयुजन वाढतं आणि शेवटी ऑफकोर्स 'लडकी बडी अंजानी है' म्हणत शाहरुखच जिंकतो... अंजलीलाही आणि फिल्म फेअर अवॉर्डही.

"क्या आज रात को मेरा हाथ थाम के तुम भाग सकती हो? ये तुम क्या कह रहें हो.." ठाकूर भुवन चौधरीच्या पत्नीला पारोला म्हणजेच ऐश्वर्या रॉयला तो लग्नानंतरही हाथ पुढे करतो. चल माझ्याबरोबर पळून आणि समोरून तसा रिस्पॉन्स न आल्याने एकच शब्द उच्चारतो तो तिच्यासाठी "दुष्ट!" अॅन्ड द फिल्म फेअर अवॉर्ड फॉर बेस्ट ऍक्टर गोज टू अगेन द वन अँड ओन्ली शाहरुख खान! यात भुवन चौधरीची बायको पारो ही देवची लहानपणीची मैत्रिण असते. लंडन रिटर्न या देवची अन पारोची ही लहानपणीची मैत्री प्रेमात बदलते पण घरच्यांच्या विरोधामुळे हे लग्न होत नाही. पारोचं लग्न श्रीमंत जमीनदार भुवन चौधरीशी होतं. देव स्वतःला दारूत बुडवून घेतो. पारो.. पारो हाच शेवटचा शब्द असतो देवच्या तोंडी आणि त्याच्या आयुष्याची ज्योत विझते.

काय हे प्रेम! कारण या देवदास मध्येही शाहरुख फक्त पारो जी जमीनदाराची बायको असते तिच्यासाठी जगतो आणि तिलाही आपल्यात इतकं गुंतवतो कि लग्नानंतरही ती देवदासवरच प्रेम करत राहते.

'चलते चलते' मध्ये तर तो राणी मुखर्जीला खरंच चलते चलतेच पटवतो. 'सुनो ना सुनो ना सुन लो ना, हमसफर मुझिको चुन लो ना' गात अख्या सफर मध्ये राज म्हणजे शाहरुख प्रियाला उर्फ राणी मुखर्जीला पटवायचा प्रयत्न करतो. विश वेल मध्ये तिनं टाकलेल्या कॉईनसाठी स्वतः अशी डुबकी मारतो कि त्याची स्वतःची नय्या मात्र पार लागते.

राणी जी स्वतःच्या एंगेजमेन्ट साठी चाललेली असते ती इतकं इम्प्रेस होते कि तिच्या लहानपणीच्या मित्राशी समीर उर्फ जस अरोराशी होणारी एंगेजमेन्ट तोडून शाहरुखशी लग्न करते. बघा याला म्हणतात किस्मत!

"तेरे लिए हम है जीए हर आसू पीए दिल मे मगर जलते रहे चाहत के दिये तेरे लिये" आठवलं का बावीस वर्षानंतर एकमेकांना भेटलेले वीर-जारा. आजीच्या अस्थिविसर्जनासाठी भारतात आलेल्या जाराला एका अपघातातून शाहरुख म्हणजे वीरप्रतापसिंह वाचवतो. पण स्वतःचं मन मात्र हरवून बसतो.

पाकिस्तानी जाराचं म्हणजे प्रीती झिंटाचं रझा शिराझी म्हणजेच मनोज वाजपेयींशी लग्न ठरलेलं असतं. "कभी भी कही भी अगर आपको दोस्त की जरुरत पडे तो याद रखियेगा कि सरहद पार एक ऐसा शक्स है जो आपके लिये अपनी जान भी दे देगा।" रेल्वे स्टेशन वर बोललेले हे शब्द जाराच्या मनावर असा काही परिणाम करून जातात कि खरंच पाक मध्ये शाहरुखला कैद झाल्यावर जारा तिच्या पुढच्या आयुष्याची बावीस वर्ष शाहरुखच्या प्रेमात घर-दार, देश, लग्न सगळं सोडून भारतात येऊन वीरच्या स्वप्नासाठी जगत राहते. बघा पाहिलंत ना यातही मनोज वाजपेयीची एन्गेजमेण्ट तोडूनच तो जाराला मिळवतो.

"अलविदा नही.. अलविदा कहने से फिर मिलने की उन्मीद मर जाती है"...ऐसा कहनेवाली मायाको भी कहा पता था के इसके बाद हुई मुलाकात इतने गेहेरे रिश्ते में बदल जायेगी! देव आणि माया म्हणजे शाहरुख आणि राणी मुखर्जी दोघंही आपापल्या लग्नात खुश नसतात.

फुटबॉल कोच असलेला देव आणि टीचर माया दोघंही आपापलं लग्न वाचवण्यासाठी एकमेकांना आयडिया शेअर करत असतात. पण असं करताना दुसऱ्याच्या बायकोवर लाईन न मारेल तर तो शाहरुख कसला. यातही देव मायाच्या प्रेमात पडतो. रिया सरन म्हणजे प्रीती झिंटाला हे कळल्यावर तीही शाहरुख बरोबरचं लग्न मोडते. मग काय शेवटी लग्नानंतर मिळालेलं हे प्रेम राणीही कबूल करते. एकूणच काय तर शेवटी इथेही शाहरुखची जादू चालतेच आणि राणी मुखर्जी ऋषी म्हणजे अभिषेक बच्चन बरोबरच आपलं लग्न तोडून शाहरुखकडे जाते.

"इतने शिद्दत मैने तुम्हे पाने की कोशिश कि है के हर जररे ने मुझे तुमसे मिळणे कि साजीश कि है"। आपल्या प्रेमासाठी आपला हक्क मागणारी एक हिरोईन... डायरेक्टर-निर्माता असलेला तिचा नवरा..या सर्वांत एक जुनिअर आर्टिस्ट जो त्या हिरोईनवर लाईन मारत असतो तिला पटवायला फूल टू ट्राय करत असतो. आठवलं ना मी कशाबद्दल बोलतोय.

'ओम शान्ती ओम' मध्येही हिरोईन दीपिका अर्जुन रामपालची बायको असते आणि त्याच्या बाळाची आई होणार असते आणि हे माहित असूनही शाहरुख तिच्यावर लाईन मारत असतो. तिच्या पोस्टर्सशी एकांतात बोलत असतो. अहं इथेच शाहरुखचे हे असले किस्से संपत नाही बरं का.. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त।

'तेरी आखों कि नमकीन मस्तिया, तेरी हसी कि बेपर्वा गुस्ताखीया, तेरी जुल्फो कि लेहेराती अंगडाईया नही भुलुंगा मै 'जब तक है जान'। मीरा थापरला एका सक्सेसफूल बिझनेसमनच्या मुलीला गिटारवर पंजाबी गाणं शिकायचं असतं आपल्या वडिलांना सरप्राईज गिफ्ट म्हणून.

त्यासाठी ती समरकडे येते आणि त्या काही दिवसांतच समर म्हणजे शाहरुख तिला पटवतो. कटरिनाचं रॉजर बरोबर लग्न ठरलेलं असतं. शाहरुख तर तिच्यावर प्रेम करतच असतो आणि गाणं शिकता शिकता तीही समरच्या प्रेमात पडते. ती इतकी की "हीर हीर ना आखो अडीयो मै तो साहिबा हुई घोडी लेके आवे ले जावे व मेनू ले जाये मिर्झा कोई" म्हणत अशी पागल होते. कटरिना आपली ठरलेली एंगेजमेन्ट मोडते आणि शाहरुखच्या आठवणीत जगत राहते. आता काय म्हणावं याला शाहरुखचं लक कि योगायोग!

"डोन्ट अंडरएस्टीमेट द पॉवर ऑफ कॉमन मॅन" असं कॉन्फिडन्टली म्हणणाऱ्या शाहरुखला 'चेन्नई एक्सप्रेस' पकडून तर फारच फायदा झाला.

आजीला धोका देऊन गोवा ट्रीपला चाललेल्या राजला या चेन्नई एक्सप्रेसमध्ये मिनम्मा जी भेटते. यातही 'काश्मीर मैं तू कन्याकुमारी' करत दोघांची नोकझोक प्रेमात बदलते. अपघातानेच भेटलेल्या या मिनम्माशी म्हणजे दीपिकाशी तो फ्लर्ट करायला लागतो अन नंतर प्रेमही करायला लागतो. तिचं पण लग्न थंगबलीशी ठरलेल असतं. पण आशा सोडेल तो शाहरुख कुठला "मेहेरबानी नही तुम्हारा प्यार मांगा है, तुम्हे मंजूर है तभी तो यार मांगा है, गैरो के डर से तेरे शहर से ए कसम रिश्ता तोडू ना तेरा रस्ता मै छोडू ना" करत तिला तिच्या वडिलांकडून मिळवण्यासाठी परत तिच्या गावात जातो आणि थंगबली बरोबर लढतो आणि जिंकतोही.

आता तुम्हीच सांगा किंग खान हा दुसऱ्यांच्या बायका पळवणारा खान आहे कि नाही ते?

कदाचित बॉलिवूडचा किंग होण्यामागचं हेच सिक्रेट असू शकतं. तुम्हाला काय वाटतं! हे सगळं ऐकल्यावर लागला कि नाही झटका ?

भारतीयच काय तर जगातील सर्व देशातील चित्रपट सृष्टीत “ दुसऱ्यांच्या बायका पळवून “ सुपरस्टार झालेला एकमेव नट असेल…!

शाहरुख तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….!

हेमंत पाटील यांनी हा ब्लॉग लिहिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT