व्हायरल-सत्य

Viral Satya : शेळीचं दूध डेंग्यू करतो बरा? (Video) 

सकाळ वृत्तसेवा

डेंग्यू झाला की अनेकजण घरगुती उपचार करतात. कुणी किवी खातं तर कुणी पपईचा रस पितो. पण, आता एक मेसेज व्हायरल होतोय. शेळीचं दूध प्यायल्याने प्लेटलेट वाढून डेंग्यू बरा होतो असा दावा करण्यात आलाय. पण, खरंच शेळीचं दूध डेंग्यूसाठी उपयुक्त आहे का? डेंग्यू झाल्यावर प्लेटलेट अचानक कमी होतात. प्लेटलेट वाढवण्यासाठी शेळीचं दूध फायदेशीर असतं. शेळीचं दूध प्यायल्याने डेंग्यू बरा होतो.

शेळीचं दूध अनेकजण पितात. पण, यामुळं डेंग्यू बरा होतो का...? याबद्दल अधिक माहिती डॉक्टर देऊ शकतात...त्यामुळं आमचे प्रतिनिधी डॉक्टरांना भेटले...त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि खरंच शेळीचं दूध प्यायल्याने डेंग्यू बरा होतो का हे जाणून घेतलं. शेळीचं दूध प्यायल्याने प्लेटलेट्स वाढतात हे सिद्ध झालेलं नाही. शेळीच्या दुधात प्रोटीन, मिनरल्स, सेलिनीयम असे पोषक घटक असतात. प्लेटलेट्स वाढवण्यासाठी आवश्यक असलेले हे घटक इतर पदार्थांमधून मिळतात. प्लेटलेट्स वाढवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आणि प्रोटीनयुक्त डाएट आवश्यक आहे. प्रोटीनयुक्त डाएटने पाच ते सात दिवसात प्लेटलेट्स नॉर्मल होतात

फळं, भाज्या, चिकन अशा विविध पदार्थांमधूनही आपल्याला प्रोटीन, सेलिनीयम आणि इतर मिनरल्स मिळतात. डेंग्यू झाल्यास रुग्णाने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी भरपूर पाणी पिणे आणि आराम करणं गरजेचं आहे. प्लेटलेट्स वाढवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने प्रोटीनयुक्त डाएट घ्यावा. आमच्या पडताळणीत शेळीचं दूध प्यायल्याने डेंग्यू बरा होतो हा दावा असत्य ठरला.

***************************************************************

आणखी वाचा  : 

***************************************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT