Viral Satya : मासा कोल्ड्रिंकमध्ये ठेवल्यानं विरघळतो? (Video)

Viral Satya : मासा कोल्ड्रिंकमध्ये ठेवल्यानं विरघळतो? (Video)

कोल्ड्रिंक आपल्या आरोग्यास किती घातक आहे हे दाखवणारा व्हिडीओ व्हायरल होतोय. कोल्ड्रिंकमध्ये मासा ठेवल्यानंतर माशाची काय अवस्था झालीय हे व्हिडीओतून दाखवण्यात आलंय. माशाचं पाणी पाणी झाल्याचं व्हिडीओत दिसतंय. त्यामुळं आपण पित असलेलं कोल्ड्रिंक किती हानिकारक आहे हे व्हिडीओ पाहिल्यानंतर लक्षात येईल. 

कोल्ड्रिंकमध्ये मासा काट्यासकट पूर्ण विरघळला.विचार करा तुमच्या पोटाचे, आतड्यांचे, दातांचे आणि हाडांचे काय हाल होत असतील. हा मेसेज व्हायरल होत असल्यानं याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. अनेकजण कोल्ड्रिंक पित असतात त्यामुळं याबद्दल अधिक माहिती मिळवण्याचा आमच्या व्हायरल सत्य टीमनं प्रयत्न केला. याची माहिती आहारतज्ज्ञ देऊ शकतात. आहारतज्ज्ञांना भेटून खरंच कोल्ड्रिंकमध्ये मासा विरघळतो का हे जाणून घेतलं.

कोल्ड्रिंक्स हे ऍसिडीक असतात, मात्र मासा त्यात पूर्ण विरघळत नाही
कोल्ड्रिंक्समुळे माशाची त्वचा आणि काही मांसल भाग काही प्रमाणात नष्ट होऊ शकतात
कोल्ड्रिंकमध्ये काट्यांसकट पूर्ण मासा नष्ट होऊ शकत नाही

कोल्ड्रिंक्समध्ये पोटॅशियम आणि सोडियम बेंझोईट, आर्टिफिशियल कलर आणि स्वीटनर असतात. त्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. कोल्ड्रिंकमध्ये साखरेचं प्रमाण अधिक असल्यानं स्थूलता, मधुमेह, हृदयविकार होण्याचा धोका आहे. आमच्या पडताळणीत मासा कोल्ड्रिंकमध्ये ठेवल्यानं विरघळतो हा दावा असत्य ठरला. पण, कोल्ड्रिंक पिणं आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.

***************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com