Viral Satya video bamboo bridge built by the children for the school 
व्हायरल-सत्य

Viral Satya : शाळेसाठी मुलांनीच बांधला बांबूचा पूल (Video)

सकाळ वृत्तसेवा

नदीवर असलेला हा बांबूचा पूल. बांबूच्या पुलावरून प्रवास करत असलेली ही मुलंच या पूलाचे इंजिनियर आहेत. शाळेत जायचं म्हटलं तर नदीवर पूल नाही. पूल बांधण्यासाठी अनेकवेळा सरकार दरबारी विनंत्या केल्या. पण, पूल काही झाला नाही. पाऊस पडला की शाळेला दांडी मारावी लागत होती. त्यामुळं मुलांच्या अभ्यासाचंच नुकसान होऊ लागल्यानं मुलांनी स्वत:च पूल बांधला. विद्यार्थ्यांनीच बांबूचा पूल बांधल्यानं शाळेत जाण्याचा मार्ग सुकर झाला.

अतिदुर्गम अशा अजिंठा डोंगररांगेच्या पायथ्याशी दोन टेकड्यांमध्ये निमचौकी खोरे गाव. आहे. याठिकाणी पहिली ते पाचवीपर्यंत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी शिक्षण घेतात. उन्हाळा, हिवाळ्यात मुलांचा किलबिलाट डोंगरदऱ्यांमध्ये ऐकू येत होता. मात्र, तीन महिन्यांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसामुळं विद्यार्थ्यांच्या गैरहजेरीचे प्रमाण वाढत होतं. त्यामुळं शिक्षक हैराण झाले होते. पण, पूल बांधल्यानं पुन्हा सगळे विद्यार्थी शाळेत जाऊ लागले आहेत.

शिक्षकांनी पालक, ग्रामस्थांनी बांबूच्या लाकडी पूल तयार केला. बांबूचा पूल बनविल्यापासून गावाची मूळ समस्या दुरही झाली. महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यात अनेक ठिकाणी ही स्थिती आहे. पण समस्या म्हणून रडत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग काढणे हा आदर्श या गावकऱ्यांनी घालून दिला आहे.

***************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Strait of Hormuz: 'होर्मुझ'चं सोडा, इराणची नवीनच खेळी; अरबी समुद्रापर्यंत ‘रेस्ट्रिक्टेड झोन’ करण्याची योजना, जगावर नवं संकट

SCROLL FOR NEXT