Viral Satya : वेगावरील नियंत्रण सुटलं अन् ट्रक दरीत कोसळला (Video)

Viral Satya : वेगावरील नियंत्रण सुटलं अन् ट्रक दरीत कोसळला (Video)

रस्त्यावरून वेगानं गाड्या चालल्या होत्या. सुस्साट वेगानं जात असलेल्या ट्रक ड्रायव्हरचं वेगावरील नियंत्रण सुटलं आणि काय झालं पाहा. रस्ता सोडून तब्बल 80 मीटर खोल दरीत ट्रक कोसळला. किती भयानक अपघात झाला. ट्रकमधील ड्रायव्हरची काय अवस्था झाली असेल याचा विचारही न केलेलाच बरा. समोरचा ट्रक दरीत कोसळला हे पाहून मागून येणाऱ्या ट्रक ड्रायव्हरनं जोरात ब्रेक दाबला आणि याचाही अपघात झाला.

जोरात ब्रेक दाबल्यानं जागेवरच हा ट्रक 180 डिग्री फिरला. मागून येणाऱ्या कारनं या ट्रकला जोरात धडक दिली. एकाच वेळी तीन गाड्यांचं नुकसान झालं. हा धक्कादायक प्रकार रस्त्यावर लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि अपघात झालेल्या ट्रकमधून ड्रायव्हर आणि सहकाऱ्याला बाहेर काढलं. त्यावेळी दोघेजण गंभीर अवस्थेत आढळून आले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण, वेगावरील नियंत्रण सुटल्यानं किती भयानक अपघात झालाय हे चीनमध्ये पाहायला मिळालंय. त्यामुळं गाडी चालवताना वेगावर नियंत्रण ठेवा.

**************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com