व्हायरल-सत्य

Viral Satya : चेहऱ्याला मुखवटा लावल्याने वाघ घाबरतो? (Video)

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर, नागपूरसारख्या भागात वाघांची प्रचंड दहशत आहे. वाघ केव्हाही हल्ला करत असल्याने गावात राहणंही अवघड झालं. पण, गावकऱ्यांची ही भन्नाट युक्ती पाहा. वाघांना भुलवण्यासाठी ग्रामस्थ चेहऱ्याला मुखवटे लावून फिरतायत. नागपूरजवळील फेटरी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये वाघांची दहशत आहे. त्यामुळं वाघांना घाबरवण्यासाठी वनविभागाच्या मदतीनं गावकऱ्यांनी ही शक्कल लढवलीय.

खास करून वनविभागानं गावकऱ्यांना चेहऱ्यावर लावायला विशेष मुखवटे दिले आहेत. शेतात काम करताना, किंवा कुठे जंगलातून गावाबाहेर जायचं असेल. तर गावकरी चेहऱ्याला मुखवटे लावून फिरतात. पण, ही युक्ती कितपत यशस्वी ठरलीय. मुखवटे लावल्यामुळं वाघ हल्ला करत नाही का? 

- वाघ हा बसून काम करणाऱ्या माणसांवर हल्ला करत असल्याचं लक्षात आलं
- लक्ष नसलेल्या व्यक्तींवर वाघ हल्ला करतो 
- तुमचं लक्ष वाघाकडे असेल तर सहसा वाघ हल्ला करत नाही
- वाघाचा वावर असलेल्या ठिकाणी मुखवटे घालण्याचा प्रयोग करण्यात आला
- मुखवटे लावल्यानंतर वाघ हल्ला करत नसल्याचा प्रयोग यशस्वी झाला

सुंदरबन जंगलामध्ये नाव चालविणाऱ्या आणि वाघाकडे लक्ष नसलेल्या व्यक्तीवर वाघ हल्ला करायचा. त्यामुळं त्या ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला आणि यशस्वी झाला. आमच्या पडताळणीत मुखवटे घातल्यामुळं वाघ हल्ला करत नसल्याचा दावा सत्य ठरला.

***************************************************************

आणखी वाचा  :  

***************************************************************

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: लग्नाला जात असताना भीषण अपघात; खडी भरलेला हायवा 3 स्कॉर्पिओवर उलटला अन्..., 6 जणांचा मृत्यू

Share Market Today: शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहील का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT